majhinews

हवाई वाहतूक सक्षम करण्यासाठी दोन विमान कंपन्यांशी चर्चा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून होणारी हवाई वाहतूक वाढावी यासाठी दोन कंपन्यांबरोबर सध्या बोलणी सुरू असून आकाश एअरलाइन्स व गुवाहाटीमधील अन्य एका कंपनीबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी दोन विमाने औरंगाबाद येथेच ठेवून वेगवेगळय़ा शहरात सेवा उपलब्ध होईल काय, याची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.  औरंगाबाद विमानतळाचे भाडे तुलनेने कमी असून औरंगाबाद हे विमानांचे तळ …

Read More »

धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला अटक

धावत्या रेल्वेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. काशी एक्सप्रेसमध्ये मुलीच्या आईने आरडाओरड केल्यावर प्रवाशांनी विकृताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्यप्रदेश प्रदेश मधूनआलेल्या या एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेत रेल्वे पोलिसांनी आरोपींला ताब्यात घेऊन तेथील इटारसी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू प्रजापती (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव …

Read More »

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात ; शालिनीताई पाटील यांना मोठा धक्का!

अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला असून, साखर कारखान्याच्या अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने इतर अनेक बँकांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी लिलावात काढला. गुरु कमोडिटी प्रा. लि. या खासगी कंपनीने …

Read More »

“राज्यात अजित पवारांचं नव्हे तर उद्धव ठाकरेंचं सरकार” ; नाना पटोलेंचं विधान!

राज्याचे सरकार हे अजित पवार यांचं नसून उद्धव ठाकरे यांचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने तुमच्यावर अन्याय होतोय का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे सरकार उद्धव ठाकरेंचं असल्याचं म्हटलं. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे आमच्या ज्या मागण्या असतील त्या त्यांच्यासमोर मांडणं आमचं काम आहे, असंही नाना पटोले म्हणाले. रत्नागिरी येथे आयोजित …

Read More »

डॉ. नितीन राऊतांचा भाजपावर निशाणा; म्हणाले, “महावितरणच्या खासगीकरणाच्या वावड्या….”

महावितरणच्या खासगीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही अपयशी झाल्याच्या नैराश्यातून महावितरणच्या सोळा विभागाच्या खाजगीकरणाबाबत भाजपा वावड्या उठवीत आहे, असे वक्तव्य ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. खासगीकरणविषयक बातम्या जनतेची निव्वळ दिशाभूल करणाऱ्या असून असा कोणताही प्रस्ताव कोणत्याही पातळीवर महावितरण वा राज्य शासनाच्या विचाराधीन नसल्याचे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले आहे. “भाजपासारखे राजकीय पक्ष वा काही संघटना स्वार्थी व राजकीय हेतूने प्रेरित …

Read More »

“राऊतांना मातोश्री डळमळीत करायची आहे का? ते कुणाच्यातरी इशाऱ्यावर…”, चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी कोर्लाईमधील कथित १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे”, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी लावला होता. त्यापाठोपाठ आज भाजपा आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात गंभीर आरोप करत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर कोर्लाईमधील …

Read More »

दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करुन हत्या, नारायण राणेंचं खळबळजनक ट्वीट; सुशांतचाही उल्लेख

नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतने २०२०मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. सुशांतसिंहच्या आत्महत्येला आता दीड वर्ष उलटली आहेत. दरम्यान, आता नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे. “मातोश्रीच्या चौघांविरोधात ईडीची नोटीस तयार,” नारायण राणेंचा ट्विट करत इशारा “खासदार …

Read More »

“यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी…”, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ! म्हणाले, “शब्दांविना…”

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यशस्वी वैवाहिक आयुष्यावर केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे त्यांच्या हटके ट्वीट्ससाठी नेहमीच चर्चेत असतात. राजकीय मुद्द्यांपासून करोनापर्यंत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून कौटुंबिक समस्यांपर्यंत अशा सर्वच विषयांवर आनंद महिंद्रा ट्वीट करत असतात. स्पोर्ट्सवर देखील त्यांनी केलेले ट्वीट्स बरेच व्हायरल झाले आहेत. आता आनंद महिंद्रा यांनी केलेलं एक नवीन ट्वीट तुफान …

Read More »

मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या आहेत याची स्पष्टता व्हायला पाहीजे – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचताच शिवसेना-भाजप कार्यकर्ते आले आमनेसामने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गाव गाठले. तर सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहचताच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि …

Read More »

२८ फेब्रुवारीपर्यंत ‘हे’ काम करा पूर्ण, अन्यथा LIC मध्ये गुंतवणूक करू शकणार नाही

LIC IPO : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी, मार्च २०२२ मध्ये आपला आयपीओ (IPO) लॉन्च करू शकते. यासाठी एलआयसी प्राइस बँड २००० ते २१०० रुपयांपर्यंत ठेवू शकते. तुम्हालाही एलआयसीच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची असेल तर २८ फेब्रुवारीपूर्वी तुम्ही काही गोष्टी कराल्या हव्यात. जर तुम्ही ही कागदपत्रे पूर्ण केली नाहीत तर …

Read More »

Hijab Row: हिजाब काढायला लावल्यानं प्राध्यापिकेचा राजीनामा; म्हणाली, “हा निर्णय माझ्या स्वाभिमानाला….”

कर्नाटकमधील हिजाब प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शाळेत मुलींनी शाळेच्या गणवेशातच यावं, धार्मिक वस्त्र परिधान करू नये, असा आदेश देत हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मुलींना हिजाब काढायला लावून शाळेत प्रवेश दिला जातोय. अनेक ठिकाणी लोक न्यायालयाच्या या आदेशाचा विरोध करताना दिसून येत आहेत. दरम्यान, हिजाब काढायला लावल्यामुळे  आज एका महिला शिक्षिकेनं राजीनामा दिल्याचं …

Read More »

वर्ल्डकप जिंकणाऱ्या ‘मराठी’ खेळाडूनं केली फसवणूक? BCCIकडं दाखल झाली ‘गंभीर’ तक्रार!

टीम इंडियाला नुकताच अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा मराठी खेळाडू वयचोरी प्रकरणात अडकला आहे. वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याच्यावर वय कमी केल्याचा गंभीर आरोप झाल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंगरगेकरचे खरे वय २१ वर्षे आहे आणि तरीही तो अंडर-१९ वर्ल्डकप खेळला. या स्पर्धेत त्याने त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती. टीम इंडियाने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून वर्ल्डकप जिंकला. हंगरगेकरवर वय लपवल्याचा गंभीर …

Read More »

…आणि नेहमीच्या गर्दीसोबत चक्क रेल्वेमंत्रीही लोकलमध्ये चढले! ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का!

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ठाणे ते दिवा लोकलने प्रवास केला आहे. यावेळी रावसाहेब दानवे देखील त्यांच्यासोबत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ठाणे स्थानकावर लोकल ट्रेन थांबली आणि ज्या सराईतपणे बाहेरच्या प्रवाशांनी लोकलमध्ये ‘घुसखोरी’ केली, त्याच सराईतपणे आतल्या प्रवाशांनीही ‘हे तर नेहमीचंच’ अशा आविर्भावात त्या सगळ्या प्रक्रियेकडे पाहायला सुरुवात केली. पण या सगळ्यात त्यांना एक अनपेक्षित आश्चर्याचा धक्का बसला. कारण लोकलमध्ये …

Read More »

पुणे: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या जावयाचा सासूने केला खून; मुगलीही कटात सहभागी

सासूच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या जावयाचा सासू आणि पत्नीने कट रचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीसह सासू आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश अशोक गोरखे असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी ज्योती आकाश गोरखे, मृताची सासू सोनी उमेश जेगरे, सासूचा प्रियकर अक्षय लोंढे, रामविजय महातो, साहिल संजय पंचराश, रवी राठोड …

Read More »

“उगाच अंहकारामुळे हातचं घालवू नका,” आव्हाडांच्या सल्ल्यावर एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “शिवसेनेने कधीच…”

ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची सूत्रं दोन्ही नेत्यांची हाती असून त्यांच्यातील वादाचे परिणाम राज्यातील इतर जिल्हयांमध्ये उमटण्याची भीती आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी नकोच अशी ताठर …

Read More »

Astrology 2022: २४ तासानंतर गुरु ग्रह कुंभ राशीत होणार अस्त, २० मार्चपर्यंत ‘या’ राशींच्या चिंतेत होणार वाढ

गुरु ग्रह १९ फेब्रुवारी २०२२ रोजी कुंभ राशीत अस्त होणार आहेत. या काळात गुरू ग्रहाचा प्रभाव नसेल. गुरु ग्रह १९ फेब्रुवारी २०२२ रोजी कुंभ राशीत अस्त होणार आहेत. या काळात गुरू ग्रहाचा प्रभाव नसेल. वैदिक ज्योतिषशास्त्रात बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रह हा संतती, शुभ कार्यक्रम, विस्तार, भाग्य आणि ज्ञान इत्यादींचा कारक मानला जातो. त्यामुळे या काळात विवाह व इतर शुभ कार्यक्रमांचे …

Read More »

Viral Video: …आणि एका क्षणात पक्षांचा थवा आकाशातून खाली पडला

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यात काही काळे पक्षी उडण्यात यशस्वी झाले तर, अनेकांचा मृत्यू झाला. मेक्सिकोमध्ये, पक्ष्यांचा एक थवा रहस्यमयपणे आकाशातून अचानकपणे पडला, त्यापैकी बरेच पक्षी खाली फुटपाथवर कोसळले आणि मरण पावले. ७ फेब्रुवारीचा हा विचित्र घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेकडो पिवळ्या डोक्याचे काळे पक्षी दिसून येत आहेत. स्थानिक न्यूज आउटलेट एल हेराल्डो डी चिहुआहुआच्या मते, मेक्सिकोमधील …

Read More »

Video: मध्यरात्री विमानतळावरच चक्क डान्स करु लागली समांथा रुथ प्रभू

समांथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुरुवातीला ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर तिने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात पहिल्यांदाच ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँग केले त्यामुळे ती चर्चेत होती. आता समांथाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर डान्स करताना दिसत आहे. समांथा …

Read More »

विश्लेषण : पंजाबमध्ये चेहरे ठरले, आता कॅप्टन कोण?

पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस विरुद्ध अकाली दल-भाजप आघाडी असाच दुरंगी सामना झाला आहे. मात्र गेल्या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आव्हान निर्माण केले होते. आता वीस फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती अपेक्षित आहेत. पंजाबच्या राजकारणाचे हे बदलते चित्र आहे. सत्तारूढ काँग्रेस विरोधात आम आदमी पक्ष, अकाली दल-बहुजन समाज पक्ष यांची आघाडी तसेच …

Read More »

चंद्रपूर : वन्यप्राण्याने १६ वर्षीय मुलाला उचलून नेल्याने वन खात्यात खळबळ

चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपूर महाऔषणीक केंद्राच्या समोर असलेल्या दुर्गापूर नेरी येथे अल्पवयीन मुलाला वन्यप्राण्याने उचलून नेले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाडके या अल्पवयीन मुलाला वन्य प्राण्याने उचलून नेल्याने खळबळ उडाली आहे. हा मुलगा दुर्गापूर वॉर्ड नंबर १ मध्ये आदिवासी आश्रम शाळेच्या मागील परिसरात राहत होता. याच परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. …

Read More »