ताज्या

Paytmवरील संकट वाढले! शेअर्स 40 टक्क्यांनी कोसळले, कंपनी शोधणार नवा मार्ग

Paytm Shares: ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस देणारी पेटीएमवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर कंपनीच्या संकटात वाढ झाली आहे. पेटीएमच्या बँकिग सेवांवर आरबीआयने बंदी घातल्यानंतर त्याचा परिणाम शेअरवरही होताना दिसत आहे. शेअर बाजार उघडताच कोसळला आहे.  पेटीएमवर आरबीआयने कारवाई केल्यानंतर गुरुवारी म्हणजेच बजेटच्या दिवशीच पॅरेंट कंपनी one97 communication च्या शेअरवरती थेट परिणाम झाल्याचे दिसत आहे. स्टॉक मार्केट सुरू होताच पेटीएमचे शेअर कोसळले आहेत. गुरुवारी …

Read More »

भाजपामध्ये जाणार का? छगन भुजबळ थेट म्हणाले, ‘माझी काही घुसमट…’

Anjali Damania On Chhagan Bhujbal: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. परंतु मराठा आरक्षणाला काही ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यातच आता भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या चर्चांना उधाण आलं आहे ते सामाजिक …

Read More »

‘दोन गुजरात्यांच्या हाती रं आज…’; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा

Maharashtra Politics : शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका अद्यापही सुरु आहे. नेते मंडळींसोबत कार्यकर्तेही एकमेकांवर सोशल मीडियापासून प्रत्यक्षात टीका करताना दिसत आहेत. अशातच नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अभिनेते किरण मानेंनी देखील शिंदे गटावर गाण्यातून टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खरी शिवसेना कुणाची हे गाण्याच्या माध्यमातून सांगितलं आणि शिंदे गटावर …

Read More »

सुट्टी संपवून परतलेल्या जवानाला पहिल्याच दिवशी वीरमरण; नाशिकच्या सुपुत्राचा लडाखमध्ये मृत्यू

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या मांडवड गावातील भारतीय सैन्यातील एका जवानाला लडाखमध्ये वीरमरण आलं आहे. कर्तव्यावर असताना नाशिकचा हा सुपुत्र शहीद झाला आहे. नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील संदीप भाऊसाहेब मोहीते (33) यांस लेह येथे वीरमरण आले. जवान संदीप मोहितेंचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संदीप मोहितेंच्या निधनाने नाशिकवर शोककळा पसरली आहे. भारतीय लष्करातील लेह …

Read More »

‘ऐवढा पैसा जातो कुठे? आज कुठे, कशी, काय वाट लागली आहे ते…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Criticise FM Nirmala Sitharaman Budget 2024: “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा सोपस्कार गुरुवारी संसदेत पार पाडला. सोपस्कार यासाठी म्हणायचे की, या अर्थसंकल्पात ठोस म्हणावा असा कुठलाच संकल्प शोधूनही सापडत नाही. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ या धाटणीच्या निरोपाचे भाषण वाटावे याच पद्धतीने अर्थमंत्र्यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेच्या …

Read More »

Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची मोठी भूमिका

Maratha Reservation News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक घडामोडी सुरु असतानाच आता मराठा आरक्षण सर्वेक्षणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सरकारनं मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे.  राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत 2 कोटी 12 लाखांहून अधिक …

Read More »

‘शिवाजी महाराज कुणाच्या बाजूने उभे राहिले असते? बिल्किस बानो की..’; आव्हाडांचा भाजपाला सवाल

Maharashtra Politics Ashish Shelar Vs Jitendra Awhad: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावरुन भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये सोशल मीडियावर बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी रायगडमध्ये बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख केल्याने आशिष शेलार यांनी खोचकपणे त्यांच्यावर टीका केली. मात्र या टीकेला उत्तर देताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

Weather Updates : देशभरात थंडीमुळं ‘मौसम मस्ताना’; पाहा राज्यात कुठं वाढणार गारठा

Weather Updates : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले असून, आता हेच किमान तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. ज्यामुळं आता महाराष्ट्रातील थंडी काहीशी कमी होताना दिसत आहे. निफाडमध्ये 9.1 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असली तरीही, राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र किमान तापमान 10 अंशांपेक्षा जास्तच असणार आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली …

Read More »

महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये नेहमीच दिसणारी ही महिला कोण? जाणून चकित व्हाल

Who Is This Women With Mahatma: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळामध्ये एका महिलेचाही समावेश होता. ही महिला अनेकदा महात्मा गांधींबरोबर फोटोंमध्येही दिसून यायची. तुम्हीही महात्मा गांधींच्या अनेक जुन्या फोटोंमध्ये या महिलेला पाहिलं असेल. विशेष म्हणजे महात्मां गांधीच्या सांगण्यावरुनच या महिलेला देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळालं होतं. मात्र ही महिला नेमकी होती तरी कोण? …

Read More »

शिक्षकांनी दाखवली टॉपर मुलाची उत्तरपत्रिका, पैकीच्या पैकी मार्क… तुमच्या मुलांनाही हा Video दाखवा

Viral Video : नवीन वर्षाचा जानेवारी महिना संपलाय आणि आता फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झालीय. या बरोबरच शाळा-कॉलेजच्या परीक्षांची (Exam) चाहूलही लागलीय. शाळेतलं, घरातलं वातावरण परीक्षामय झालंय. परीक्षेला अवघा एक महिना राहिल्याने विद्यार्थी अभ्यासात मग्न झालेत. ज्या घरातील मुलं दहावी-बारावीला (SSC-HSC) आहेत, त्या घरातील वातावरण तर एकदम तणावाचं बनलंय. घरात टीव्ही बंद झालेत, मुलं केवळ जेवणासाठी रुममधून बाहेर पडताना दिसतायत. खेळाची …

Read More »

चंद्रावर लँड होण्याआधी ‘येथे’ फिरवले होते भारताचे दोन्ही चांद्रयान

Chandrayaan : 23 ऑगस्ट 2023… तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. याच दिवशी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि भारताने नवा इतिहास रचला. संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान-3 या मोहिमेकडे होते. भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आणि ISRO ने अंतराळ क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता Chandrayaan-3 आणि Chandrayaan-2 मोहिमेच्या …

Read More »

मध्य रेल्वेवरील ‘या’ स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आणि गर्दी यांचे समीकरण तर तुम्हाला माहीती असेलच. ट्रेन दोन ते तीन मिनिटे उशीरा असली तरी वेळेचे पूर्ण गणित चुकते. गेल्या काही दिवसांपासून बदलापूरकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय. एक नंबर प्लॅटफॉर्मवर नियोजित जागेपेक्षा पुढे थांबत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत होता. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंदच करण्यात आला आहे. नव्या होणाऱ्या …

Read More »

बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबईतील नोकरी सोडणाऱ्या सूर्यकांत दळवींनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा सविस्तर पत्र

Suryakant Dalvi Joins BJP: बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) निष्ठावंत आणि कडवे शिवसैनिक अशी ओळख असणारे सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी भाजपात (BJP) प्रवेश करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला आहे. मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेशादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. दरम्यान पत्र लिहून त्यांन पक्ष सोडण्यामागील कारणांचा खुलासा केला आहे.  सूर्यकांत दळवी …

Read More »

महाविकास आघाडी संभाजी राजेंना लोकसभेचे तिकीट देणार; पण ‘या’ एका अटीवर

Maharashtra Politics : छत्रपती  संभाजी राजे हे लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी यापूर्वीच केली होती. मात्र, अद्याप संभाजी राजेंना कोणत्याही पक्षानं पाठिंबा जाहीर केलेला नाही. अशातच आता महाविकास आघाडीने संभाजी राजे यांना लोकसभेचे तिकीट देऊ अशी ऑफर दिली आहे. मात्र, तिकीट पाहिजे असेल तर महाविकास आघाडीने राजेंसमोर एक अट ठेवली आहे.  संभाजी …

Read More »

उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच धक्का, निष्ठावंत आमदाराचा भाजपात प्रवेश

Suryakant Dalvi joins BJP: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कोकण (Konkan) दौरा सुरु केला असून, पहिल्याच दिवशी त्यांना धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षं आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. सूर्यकांत दळवी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी भाजपात प्रवेश कऱणार असल्याची चर्चा रंगली …

Read More »

‘अर्थमंत्री फक्त थापा मारण्यात आणि…’; अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकारांची टीका

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार आयकरासह सर्वसामान्यांशी संबंधित अनेक क्षेत्रात मोठी घोषणा करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नसल्या तरी ग्रामीण भागातील जनतेसाठी आणि महिला वर्गासाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी भाष्य केलं आहे. …

Read More »

मोठी बातमी! CSK चे श्रीनिवासनही ED च्या रडारवर; चेन्नईत India Cements वर छापेमारी

India Cements ED Raid: एकीकडे झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने थेट मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कारवाई केली असतानाच तामिळनाडूमधूनही एक बातमी समोर येत आहे. राज्याचे राजधानीच्या शहरामधील म्हणजेच चेन्नईमधील इंडिया सीमेंट्सच्या परिसरामध्ये सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने छापेमारी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे इंडिया सीमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय निर्देशक आणि उपाध्यक्ष आहेत. इंडिया सीमेंट्स ही भारतामधील आघाडीच्या सीमेंट कंपनीपैकी …

Read More »

RBI ने Paytm वर कारवाई केल्याने अशनीर ग्रोव्हर संतापले, मोदींचा उल्लेख करत म्हणाले ‘जगासमोर हा दुटप्पीपणा…’

Ashneer Grover on RBI Action against Patym: रिझर्व्ह बँक  ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बुधवारी पेटीएमच्या (Paytm) व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमला नवीन ठेवी स्वीकारण्यावर बंदी घातली असून, नवीन पत व्यवहारांवरही निर्बंध आणले आहेत. याशिवाय अनेक प्रकारच्या सेवांसाठी नव्याने ग्राहक जोडता येणार नाहीत. दरम्यान आरबीआयच्या कारवाईवर शार्क टँक इंडियाचे माजी जज आणि उद्योजक …

Read More »

दर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?

Union Budget 2024: 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 58 मिनिटांच्या आपल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी ते महिला वर्गांसाठी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या सूर्योदय योजनेबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे की, सरकारने सूर्योदय योजनेची सुरुवात …

Read More »

‘ज्ञानवापी मशीद’ नाही ‘ज्ञानवापी मंदीर’; कोर्टाच्या निकालानंतर वाराणसीतील ‘तो’ Video Viral

Varanasi court Order Gyanvapi Mosque Signboard: उत्तर प्रदेशमधील वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणामध्ये बुधवारी मोठा निर्णय देत मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का दिला. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये असेलल्या व्यासजीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयानंतर गौदोलिया चौकामध्ये स्थानिक प्रशासनाने लावलेल्या दिशादर्शक फलकावर लिहिण्यात आलेल्या ‘ज्ञानवापी मशीद’ या नावाशी छेडछाड करण्यात आली आहे. नावातील मशीद या …

Read More »