ताज्या

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून पदभरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  कल्याण डोंबिवली …

Read More »

‘अजिबात खपवून घेणार नाही’; संघर्ष केला नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या (NCP) वैचारिक मंथन बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. 1 मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असा अजित पवार यांनी म्हटलं. यासोबत अजित पवार यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावरही टीका केली होती. …

Read More »

नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो, घोड्यावर का बसत नाही? अन् तेही पांढरीत घोडी का?

Wedding Rituals : लग्नाचा सिझन सुरु झाला असून पुढील 23 दिवसात 35 लाख लग्न होणार आहेत. एका रिपोर्टनुसार 4.25 कोटींची उलाढाल फक्त या लग्न समारंभातून होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. लग्न हे दोघांचं मनोमिलनसोबत दोन कुटुंबाचा सोहळा…पण गेल्या काही वर्षांमध्ये लग्नाचा हा सोहळा एक भव्यदिव्य सोहळा आणि कोटी रुपयांची उधळणपट्टी झाली आहे. असो, प्रत्येक समाजानुसार लग्नाच्या पंरपेरा आणि …

Read More »

‘राजकारणात सारेच असूर नसतात’; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावले होती. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात, असे म्हणत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी महोत्सवाचे आयोजक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने उपस्थित …

Read More »

निवडणूक आयोगाने बदलली मिझोरामच्या मतमोजणीची तारीख, पाहा नेमकं कारण काय?

ECI reschedules vote counting for Mizoram : भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) मिझोराम विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेत मोठा बदल केला आहे. मिझोरामची मतमोजणी 3 डिसेंबर 2023 रोजी होणार होती. मात्र, आता त्यात सुधारणा करण्यात आली असून आता 4 डिसेंबर 2023 रोजी मतमोजणी (Mizoram Assembly elections) होणार असल्याचं केंद्रिय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय का …

Read More »

केंद्र सरकारचा ‘डिजिटल स्ट्राइक’, युट्यूबर्ससाठी धक्कादायक बातमी

Government Blocks 120 Youtube Channels: युट्यूबवरुन फेक न्यूज पसरवणाऱ्यांची आता काही खैर नाही. केंद्र सरकारने फेक न्यूज संदर्भात कडक पावले उचलली आहेत. सध्याच्या काळात युट्यूब हे कमाईचे मोठे साधन झाले आहे. युट्यूब व्हिडीओची कमाई क्लिक्सवर आधारित असते. अनेक युट्यूबर्स याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.  युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या …

Read More »

Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं ‘मोये मोये’ आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या

Moye Moye Trend : सोशल मीडियावर कधी कुठल्या ट्रेंड येईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक वेगळा आणि अजब ट्रेंड आला आहे. मोये मोये या गाण्याने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्युब अगदी सोशल मीडियाच्या कुठलाही प्लॅटफॉर्म ओपन करा तुम्हाला या गाण्यावर असंख्य रील्स मिळतील. या क्रेझमुळे नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. या गाण्याला युट्यूबवर 57 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालंय. (What …

Read More »

कर्जाच्या नादात घराच्या दुप्पट रक्कम भरताय? फक्त ‘हे’ काम करून वसूल करा एक एक रुपया

आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोजावी लागणारी किंमतही मोठी असते. यामुळेच अनेकांना बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्जामुळे आपलं स्वप्न तर पूर्ण होतं, पण आपण कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरील व्याजही फेडत असतो. कर्जाची रक्कम जास्त असल्याने अनेकजण वर्षंही जास्त ठेवतात.  गेल्या काही वर्षांपासून जसजशी महागाई वाढत आहे, व्याजदरही वाढत आहे. व्याजदर …

Read More »

पती जेवायला हॉटेलमध्ये घेऊन जात नाही, पत्नीने त्याचा जीव घेतला

Crime News In Marathi: पती हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात नाही, या क्षुल्लक कारणावरुन पत्नीने पतीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून ही विचलित करणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना रेल्वे रूळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.  मुजफ्फरपूर येथे राहणाऱ्या राजवीरचं लग्न 9 महिन्यांपूर्वी निशा नावाच्या महिलेसोबत झालं होतं. निशा बहादुरपूर येथील रहिवाशी आहे. राजवीरच्या हत्येनंतर …

Read More »

वंदे भारत स्लीपर ट्रेन कशी असेल? अखेर आलं समोर; RCF मध्ये डब्यांची निर्मिती सुरु

वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही अत्याधुनिक रेल्वे सेवेत आल्यापासूनच प्रवाशांच्या पसंतीस पडली आहे. दरम्यान वंदे भारत सेवेत आल्यानंतर स्लीपर कोचची मागणी केली जात होती. त्यानंतर रेल्वेने वंदे भारत स्लीपर व्हर्जनही येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार या स्लीपर एक्स्प्रेसच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. रेल्वे कोच फॅक्टरीत डब्यांची निर्मिती केली जात आहे.  विमान प्रवाशांप्रमाणे सुविधा वंदे भारत …

Read More »

पतीने पत्नीच्या हत्येसाठी दिली 6 लाखांची सुपारी, पण शुटर्सने पतीलाच गोळ्या घातल्या; कारण ऐकून पोलीसही चक्रावले

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी …

Read More »

मावळच्या रावण थाळीची ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद, कुठे मिळते ही थाळी? वाचा

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया Pune Ravan Thali: विविध गोष्टींचे वर्ल्ड रेकॉर्ड होताना आपण नेहमीच पाहतो. पण एखाद्या खाद्यपदार्थ किंवा थाळीचा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण आता मावळ मधील एका हॉटेलच्या थाळीची नोंद थेट वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये झाली आहे. या थाळीच नाव पण “रावण थाळी” असं आहे. पण आता नोंद होण्यासारख या थाळीत आहे …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही? अखेर ठरलं!

Government Jobs : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांच्या खात्यात जमा होणारा पगार आणि त्या पगारात सातत्यानं विविध भत्ते आणि वेतन आयोगांच्या रुपात होणारी वाढ पाहता जवळपास सर्वांनाच सरकारी नोकरीचा हेवा वाटतो. अशा या सरकारी अख्त्यारित येणाऱ्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.  आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच 2024 च्या निवडणुकंपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा …

Read More »

LPG cylinder price : निवडणूक निकालांपूर्वी गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार

LPG cylinder price : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतातील राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ आणि मिझोरममध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकालही आता अवघ्या 48 तासांमध्ये म्हणजेच 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. त्यामुळं या घडामोडींना आणखी वेग आला आहे. या निकालांपूर्वी डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. …

Read More »

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगना आणि मिझोराम या  पाच राज्यात कोणाची सत्ता येणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येईल तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये …

Read More »

कोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे.  खेड लोटे एमआयडीसी (Khed-Lote MIDC) इथं हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे (Coca-Cola Brewery Project) भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

SIM Card विकत घ्यायचंय, 1 डिसेंबरपासून ‘हे’ कडक नियम लागू होणार

New SIM Card Rules: देशात 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे सर्व बदल दोन महिन्यांपूर्वी अंमलात आणले जाणार होते, पण सरकारने अंमलबजावणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. आता 1 डिसेंबर 2023 पासून सिम (SIM Card) खरेदी करण्यासाठी, तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावं लागणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशात सायबर फसवणुकीच्या घटना कमी होतील अशी अपेक्षा …

Read More »

एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? निकालाचा अंदाज कसा लावतात?

Exit Poll Definition and Meaning : लोकसभेची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालंय. आता सर्वांना प्रतिक्षा लागलीये ती निकालाची… कोणत्या राज्यात कोणाती सत्ता येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल (Exit Poll) आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट …

Read More »

Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ; तरीही सत्तेच्या चाव्या अपक्षांकडेच

MP Exit Poll Result 2023 : तेलंगणात आज मतदान झाल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एकीकडे मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये कोणाचे सरकार सत्तेत येणार उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे मात्र एक्झिट पोलनुसार, देशातील महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ ठरणार आहे. मात्र सत्तेच्या चाव्या या अपक्षांकडेच असणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात 230 …

Read More »

Rinku Singh : ‘फिनिशर म्हणून नाही तर…’, टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहराने केली मोठी भविष्यवाणी!

Ashish Nehra Prediction on Rinku Singh : व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये युवराज सिंग आणि एमएस धोनीची भूमिका बजावू शकणाऱ्या फिनिशरची टीम इंडिया (Team India) बऱ्याच दिवसांपासून शोध घेत आहे. फिनिशर असा असावा की कधी कधी टॉप ऑर्डर कोसळल्यावर तो डाव सांभाळू शकेल. आयपीएलमध्ये (IPL 2024) चमक दाखवणाऱ्या रिंकू सिंह (Rinku Singh) याची प्रतिभा उंचावली आहे. त्यामुळे आता फिनिशर म्हणून त्याच्या नावाची …

Read More »