Breaking News

Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ; तरीही सत्तेच्या चाव्या अपक्षांकडेच

MP Exit Poll Result 2023 : तेलंगणात आज मतदान झाल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एकीकडे मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये कोणाचे सरकार सत्तेत येणार उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे मात्र एक्झिट पोलनुसार, देशातील महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ ठरणार आहे. मात्र सत्तेच्या चाव्या या अपक्षांकडेच असणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात 230 जागांसाठी मतदान झाले होते. एक्झिट पोलच्या आकड्यांनी मध्य प्रदेशात कोणतं सरकार सत्तेवर हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 111 ते 121 जागा, भाजपला 106 ते 116 जागा मिळाल्या आहेत. 

मध्य प्रदेशात प्रत्येक वेळेप्रमाणे भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत आहे. आम आदमी पार्टी, बसपा, सपा या पक्षांनीही राज्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. यावेळी आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान मध्य प्रदेशात झाले आहे. मध्य प्रदेशात या निवडणुकीत 76.1 टक्के मतदान झाले होते. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 75.3 टक्के मतदान झाले होते. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. काँग्रेसला 114 तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. मात्र कॉंग्रेसमधल्या फुटीनंतर भाजप सत्तेवर आली होती.

हेही वाचा :  अभिनेत्री मयुरी देशमुखचा 'लग्नकल्लोळ'; मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

टीव्ही 9 भारतवर्ष

भाजप – 106 – 116
काँग्रेस – 111 -121
आप – 0
इतर – 0 -6

रिपब्लिक भारत

भाजप – 118 – 130
काँग्रेस – 97 -107
आप – 0
इतर – 0 -2

पोल स्टेट एक्झिट पोल

काँग्रेस – 111-121 
भाजप – 106-116

MATRIZE एक्झिट पोल 

भाजप -118-130
काँग्रेस – ​​97-107
इतर – 00 ते 02

मध्य प्रदेशातील गेल्या निवडणुकीत आकडेवारी

एकूण जागा 230
भाजप – 127
काँग्रेस – 96
बसप – 2
सप – 1
अपक्ष – 4



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर हेतू साध्य होणार नाही,’ सुप्रीम कोर्टाचा अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार; पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय चर्चेत

पुण्यात बेदरकारपणे कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अल्पवयीन चालकाला कोर्टाने जामीन दिल्यानंतर नाराजी व्यक्त …

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 …