अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा रशियाला कडक इशारा, हल्ला केल्यास युक्रेनला पाठिंबा

वॉशिंग्टन :  Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. आता या वादात अमेरिकेने उडी घेतली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेभोवती सैन्य तैनात केले आहे. यानंतर अमेरिकेने रशियाला कडक शब्दात इशारा दिला आहे. रशियाकडून हल्ला केला तर आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनला पाठिंबा देणारे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देश रशियाशी चर्चेतून तोडगा काढण्याची चर्चा करत आहेत. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील वाद अजूनही सुरूच आहे. (US President’s warning to Russia, said – will support Ukraine if attacked)

आम्हाला संघर्ष नकोय – अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करत रशियाला इशारा दिला आहे. “आम्हाला संघर्ष नको आहे, परंतु रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची कारणे देखील समर्थनीय असू शकत नाहीत.” ते पुढे म्हणाले, रशियाने आपल्या योजनांवर ठाम राहिल्यास, ते विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी जबाबदार असेल.

हेही वाचा :  साडी नेसल्यावर जान्हवी कपूर दिसते हुबेहूब आईसारखी, साडीतले ग्लॅमरस लुक पाहून येते श्रीदेवीची आठवण

‘युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न’

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करत म्हटले की, रशियाने युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबतच्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. हा युद्धबंदी नियमांचे उल्लंघन आहे. रशिया याआधीही असे खेळ खेळत आला आहे. युनायटेड स्टेट्स आणि आमचे मित्र राष्ट्र युक्रेनच्या लोकांना पाठिंबा देत राहतील. आम्ही रशियाला त्याच्या कृतींसाठी जबाबदार धरु. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास पाश्चात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादू शकतील, अशी तयारी केली आहे, असे इशारा देण्यात आला आहे.

वाटाघाटीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न

जो बायडेन म्हणाले, रशिया-युक्रेन वादावर चर्चेतून वाद मिटवता येईल. आताही उशीर झालेला नाही. रशिया अजूनही राजनैतिक मार्गाने या समस्येवर उपाय काढू शकतो. बायडेन म्हणाले की, दक्षिणेतील रशियन सैन्य अजूनही काळ्या समुद्राजवळ बेलारूसमध्ये तैनात आहे. त्यांनी युक्रेनला वेढा घातला आहे. रशियाचे सैन्य येत्या काही दिवसांत युक्रेनवर हल्ला करण्याचा विचार करत आहे.

‘युक्रेनला पॅकेज दिले जाईल’

त्याचवेळी, व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र युक्रेनला पॅकेज देण्यावर विचार करत आहेत. सायबर स्पेसमध्ये रशिया अत्यंत आक्रमक पावले उचलत आहे. यासाठी वॉशिंग्टन रशियाला उत्तर देण्याची तयारी निश्चित करत आहे.

हेही वाचा :  हार्ट अटॅकला या ५ सवयी ठरतात घातक, आताच बदला नाही हृदय बंद पडण्याची येईल वेळ



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

4 लाखाची पर्स घेऊन ४९ व्या वर्षी मलाकाची ढासू एंट्री

मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशनसेन्सने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्याच्या जिम लूकपासून ते एअरपोर्ट …

नियमित हुक्का पिण्याने होऊ शकतो फुफ्फुसाचा कॅन्सर, वेळीच व्हा सावध!

धुम्रपान हे शरीराला हानिकारक ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता हुक्का ओढणे हा प्रकार …