जगावर किरणोत्सर्गाचा धोका वाढला! युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीवर रशियाचा हल्ला

नवी दिल्ली : युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने झापोरीझ्या (Zaporizhzhia plant) अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलाय.

जगाला ज्या गोष्टीची भीती होती. ती आता घडतेय की काय अशा घडामोडी सध्या रशिया युक्रेन युद्धादरम्यान घडत आहेत. युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे.
 
अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्याने रेडिएशनची लेवल वाढल्याचाही दावा करण्यात आलाय. हा प्रकल्प सर्वात मोठा असून, स्फोट झाल्यास चेरनोबिलपेक्षा दहापट नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधींचीही मनुष्यहानीही होऊ शकते.

अणुयुद्धाच्या धमकीमुळे युरोपात दहशत; प्रचंड मागणीमुळे Iodine च्या गोळ्यांचा तुटवडा

मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार रशियन न्यूक्लियर डेटरन्स फोर्स अलर्ट मोडवर आहे. 

गेल्या काही दशकात प्रथमच एखाद्या देशाने उघडपणे अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे अणुयुद्धात रूपांतर होऊ शकते, हे पुतिन यांच्या हेतूवरून स्पष्ट झाले आहे. पुतीन यांच्या धमकीमध्ये युरोपीयन देशांमध्ये दहशत पसरली आहे.

हेही वाचा :  अॕडिनोव्हायरसचा त्रास, मुलांमध्ये ताप येणे, घसा खवखवणे आणि डोळे लाल होणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका

युरोपात दहशत, गोळ्यांचा तुटवडा
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुतीन यांच्या धमकीमुळे युरोपमध्ये विशेषतः मध्य युरोपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलंडपासून बेलारूस आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर तयार झालेल्या स्वतंत्र देशांपर्यंत ही लढाई होण्याची भीती आहे. अणुहल्ल्याच्या भीतीने लोक आयोडीनच्या गोळ्या विकत घेण्यासाठी धावत आहेत. अणुहल्ला झाला तर हे आयोडीन त्यांना किरणोत्सर्गापासून वाचवेल असा लोकांचे म्हणणे आहे. आयोडीनच्या गोळ्या ते सिरपची मागणी एवढी वाढली आहे की युरोपातील अनेक देशांमध्ये त्याचा तुटवडा आहे.

काही देशांमध्ये स्टॉक संपला
फार्मसी युनियनचे अध्यक्ष निकोले कोस्तोव यांच्या म्हणण्यानुसार, ‘गेल्या सहा दिवसांत, बल्गेरियाच्या फार्मसीने इतके आयोडीन विकले आहे. की वर्षभरातही इतके आयोडीन विकले गेले नव्हते. अनेक मेडिकल दुकानदारांनी नवीन मालाची ऑर्डर दिली आहे.

अधिकाऱ्यांचा सल्ला
आयोडीन हे गोळ्यांच्या किंवा सिरपच्या स्वरूपात घेतले जाते. किरणोत्सर्गाच्या धोक्यात, थायरॉईड आणि कर्करोगासारख्या आजारांपासून मानवी शरीराचे संरक्षण करण्यासाठी आयोडीन प्रभावी मानले जाते. 2011 मध्ये, जपानी अधिकाऱ्यांनी शिफारस केली होती की अपघातग्रस्त फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ राहणाऱ्या लोकांनी आयोडीन घ्यावे. त्यामुळे आता अणुयुद्धाच्या  अनेक देशांमध्ये साठा संपला आहे.

हेही वाचा :  Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

अणुयुद्ध झाल्यास आयोडीन उपयोगी ठरणार नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चेक स्टेट ऑफिस फॉर न्यूक्लियर सेफ्टीचे प्रमुख दाना ड्रबोवा यांच्या म्हणण्यानुसार, ‘लोक आयोडीन गोळ्यांबद्दल विचारत आहेत, परंतू अणुयुद्ध होऊच नये यासाठी प्रार्थना करावी. कारण त्यापासून कोणीही वाचू शकणार नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

फडणवीसांच्या ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ टीकेवर पवार म्हणाले, ‘त्यांना पराभवाची..’

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी …