‘राजकारणात सारेच असूर नसतात’; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावले होती. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात, असे म्हणत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी महोत्सवाचे आयोजक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या संदर्भात मी संदर्भात मी बरच ऐकलं. राज्याच्या उपराजधानीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कलावंत इथं येतात. सुप्त कलागुणांना वाव देण्याचा एक व्यासपीठ इथं उपलब्ध करून देतात. मुंबई सारख्या मोठ्या शहरात अनेक मोठे कार्यक्रम होतात. मात्र नागपूर सारख्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट कलावंत आणून त्यांचे कार्यक्रम होते त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अभिनंदन करतो. आपला आग्रह म्हणजे प्रेमाचा आदेशच असतो. मलाही इथे उपस्थित राहताल यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंद म्हणाले.

“गडकरी साहेब जसे दर्दी आहे तसे खवय्ये सुद्धा आहेत. गडकरी यांचं बोलणं हे सावजीच्या रस्या सारखा झणझणीत असतं. त्यामुळे आपण बोलवल्यानंतर मी काय देवेंद्रजी काय नाही कसं म्हणू शकतो. आपल्या विभागामार्फत जे काम करत आहे देशभरात जे रस्त्याचं जाळ निर्माण करत आहे. ते देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. आपलं फार मोठे योगदान त्यात आहे. मला एम एस आर डी सी हे खाता जेव्हा दिल त्यावेळेस गंमत सांगायचं म्हणजे हे खातं साडेसहा कोटीने तोट्यात होतं. मला तेव्हा असं सांगण्यात आलं हे खात गडकरी साहेबांनी चालवलं. बाळासाहेबांच्या संकल्पनेतील एक्स्प्रेस हायवे त्यांनी पूर्ण केला. अनेक उड्डाणपूल बांधले. त्यावेळेस अनेक लोक म्हणतात हे कशासाठी. मात्र आज त्यांची दूरदृष्टी पाहता ते उपयोगी पडत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :  Maharastra Politics: शरद पवारांच्‍या गुगलीवर सिक्‍सर, उध्‍दव ठाकरे हिट विकेट; अजित पवारांच्या बंडानंतर नारायण राणेंचा टोला!

“मला देवेंद्रजी म्हणाले एमएसआरडीसी हे डब्यात गेलेले खातं शिंदे साहेब तुम्ही पाहा. शिंदे साहेब बघा लक्षात ठेवा तुम्ही बघा एमएसआरडीसीला इतका मोठे करू की तुम्ही एमएसआरडीसी हे खाते सोडणारच नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना समृद्धीसारखा महामार्ग झाला. अनेक प्रकल्प झाले. नितीन गडकरी आपण देशभरात रस्त्याचं जाळ निर्माण करताय. विकास पुरुष म्हणून आपली छबी निर्माण झालेली आहे. या महोत्सवातून राज्याची परंपरा संस्कृती जोपासत आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

“नितीन गडकरी पण कलाकार आहेत. त्यांनी मुझसे नाराज नही हे गाणं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझा सूर एकच आहे. पण त्यांनी गायलेलं श्रीवल्ली हे गाणं फार व्हायरल झाल आहे. दोन्ही नागपूरकर (फडणवीस, गडकरी) अस्सल कलाकार सुद्धा आहे. म्हणून राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात. आजकाल राजकीय प्रदूषण वाढलेले आहे. मी त्यावर बोलणार नाही. मात्र नितीन गडकरींसारख्या माणसांचा खेळीमेळीच्या वातावरणात हलक फुलक बोलून राजकीय प्रदूषण दूर करण्यात त्यांचा हातखंडा आहे,” असे म्हणत मुख्यंत्र्यांना टोला लगावला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …