करिअर

School Summer Vacation: राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी २ मेपासून

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या शाळा एप्रिलअखेरपर्यंत सुरू ठेवण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयावरून बराच गदारोळ झाला. याबाबत विविध स्तरांतून टीका झाल्यानंतर आता शिक्षण संचालनालयाने २०२२ ची उन्हाळी सुटी २ मेपासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान …

Read More »

KDMC Recruitment: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, जाणून घ्या तपशील

KDMC Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivli Corporation KDMC) काम करण्याची संधी आहे. केडीएमसीमध्ये सहायक परिचारिका प्रसविका (auxiliary Nurse Midwifery, ANM) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सहायक परिचारिका प्रसविका (auxiliary …

Read More »

Merchant Navy Week: महिलांना शिपिंग क्षेत्रात मोठ्या संधी

महिलांनी अधिकाधिक प्रमाणात शिपिंग क्षेत्रात यावे यादृष्टीने प्रयत्न केले जात असून मरीटाईम शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महिलांना प्रतिवर्षी १ लाख रु. शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार यांनी दिली. शिपिंग क्षेत्रात व्यापार सुलभीकरणासाठी (इज ऑफ डुईंग बिझनेस) विशेष प्रयत्न केले जात असून वर्ष अखेर पर्यंत शिपिंग संबंधी सर्व सेवा ऑनलाइन देण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. …

Read More »

NEET UG २०२२ च्या नोटिफिकेशनसंदर्भात महत्वाची अपडेट

NEET UG 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) अंडर ग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट २०२२ चे अधिकृत नोटिफिकेशन संदर्भात महत्वाची अपडेट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज याचे नोटिफिकेशन जाहीर केले जाऊ शकते. यासोबतच एप्रिलमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक देण्यात येणार आहे. त्यानंतरच उमेदवारांना परीक्षेच्या खऱ्या …

Read More »

NEET PG समुपदेशन प्रक्रियेतील मॉप अप राऊंड सुप्रीम कोर्टाने केला रद्द

पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेतील मॉप अप राऊंडसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नीट पीजीचा मॉप राऊंड रद्द केला आहे. कोर्टाने केंद्र सरकारला १४६ नव्या जागांसाठी विशेष काऊन्सेलिंग राऊंड आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना काऊन्सेलिंग फेरीत सहभागी होण्याचे दिले निर्देश सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्ता विद्यार्थ्यांना निर्देश दिले की …

Read More »

IBM Recruitment 2022: इंडियन ब्युरो माइन्समध्ये दहावी उत्तीर्णांना संधी, ६३ हजारपर्यंत मिळेल पगार

IBM Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना भारतीय खाण ब्युरो नागपूर (Indian Bureau of Mines Nagpur) येथे नोकरीची संधी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भारतीय खाण ब्युरो, नागपूर अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर (Staff Car Driver) च्या एकूण ९ रिक्त जागा भरल्या …

Read More »

बॅंक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केटमध्ये भरती, येथे करा अर्ज

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केट लिमिटेडमध्ये (Bank of Baroda Capital Markets Ltd Recruitment) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केटमध्ये बॅक ऑफिस ऑपरेशन्स (Back Office Operations) आणि सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) …

Read More »

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती, मुंबईत काम करण्याची संधी

MahaTransco Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) च्या मुंबई ब्रांचमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये कार्यकारी संचालक (Executive Director,), मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager,), उपमहाव्यवस्थापक (Deputy …

Read More »

मराठवाडा विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा शुक्रवारपासून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदव्युत्तर प्रथम सत्रातील परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत. यामध्ये विद्यापीठातील विभागांचाही समावेश आहेत. प्रशासनाने विभागांची शैक्षणिक लवचिकता काढून घेत संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील अभ्यासक्रमात समानता आणली. यावरून विभागातील शिक्षकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी समोर आली होती.विद्यापीठाने परिसरातील तसेच उपपरिसरातील आपल्या सर्व पदव्युत्तर विभागांची शैक्षणिक लवचिकता कमी केली. अभ्यासक्रम समान पातळीवर आणत अभ्यासक्रमातील …

Read More »

विद्यापीठ प्रवेश परीक्षांसंदर्भात अपडेट, करोनामुळे अनाथ विद्यार्थ्यांनाही मिळणार दिलासा

CUET 2022: विद्यापीठ अनुदान आयोगाचे (University Grant Commission, UGC) अध्यक्ष जगदीश कुमार सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (Common University Entrance Test, CUET) च्या माध्यमातून होणाऱ्या पदवीपूर्व स्तरावरील प्रवेशासाठी पत्र लिहिणार आहेत. गुजरातमधील २५ विद्यापीठांच्या कुलगुरूंशी बोलल्यानंतर आता ते इतर राज्य अनुदानित विद्यापीठांच्या कुलगुरूंची भेट घेणार आहेत. सीयूईटी पात्रतेच्या आधारे राज्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येण्यासंदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश …

Read More »

पश्चिम विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ४२५ जगाची बंपर भरती; ‘असा’ करा अर्ज

अमरावती: करोना काळात मोठ्या प्रमाणात नोकर भरती बंद होती हीच नोकर भरती (Placement) पुन्हा सुरू करून सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम अमरावती व यवतमाळ कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (Rojgar Melava Amravati) दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन पध्दतीने आयोजित केला आहे.रोजगार मेळाव्यात ऑनलाइन सहभागी होण्याची प्रक्रियेसाठी एम्पॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. …

Read More »

Cyber Security: यूजी आणि पीजीमध्ये शिकविणार सायबर सुरक्षेचा अभ्यासक्रम

Cyber Security in UG and PG Course: विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी सायबर सुरक्षेचा अभ्यास करु शकणार आहेत. पदवी अभ्यासक्रमांमध्ये सायबर सिक्योरिटीचे बेसिक्स आणि मिड लेव्हल कोर्स शिकवला जाणार आहे. यामध्ये चार क्रेडीट्स असतील. ज्यात पदव्युत्तर प्रोग्राममध्ये मिड आणि अॅडव्हान्स लेव्हलचा अभ्यासक्रम असेल, ज्याला चार क्रेडीट्स असतील. डिजिटल शिक्षणाच्या युगात विद्यार्थ्यांना …

Read More »

Pariksha Pe Charcha: ‘परीक्षा पे चर्चा’साठी शाळांमध्ये व्यवस्था करा; शिक्षण विभागाच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ‘परीक्षा पे चर्चा-५’ (Pariksha Pe Charcha) कार्यक्रमांतर्गत एक एप्रिल रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन कार्यक्रम दाखविण्यात यावा, याबाबत शाळांना शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथून विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत. सहावी ते बारावी वर्गातील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार …

Read More »

RRB NTPC परीक्षेचा निकाल, कटऑफ आणि स्कोअर कार्ड जाहीर

RRB NTPC CBT 1 Exam 2021: रेल्वे भरती बोर्डातर्फे आरआबी एनटीपीसी सीबीटी १ (RRB NTPC CBT १) परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर निकाल पाहता येणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने डिसेंबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत झालेल्या रेल्वे एनटीपीसी परीक्षेचा निकाल, कटऑफ आणि स्कोअर कार्ड प्रसिद्ध केले आहे. …

Read More »

RTE प्रवेशासाठी चुरस; एक लाख जागांसाठी तीन लाख अर्ज!

म. टा. प्रतिनिधी, पुणेशैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी राज्यात १ लाख १ हजार ९७७ जागा उपलब्ध होणार आहेत. या जागांसाठी राज्यभरात एकूण २ लाख ८२ हजार ७७८ अर्ज दाखल झाले आहेत. पुणे (Pune) जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक अर्ज दाखल झाले असून जिल्ह्यातील १५ हजार १३१ जागांसाठी ६२ हजार ९५६ अर्ज दाखल झाले आहेत. …

Read More »

Scholarship to Study Abroad:’या’ शिष्यवृत्तींमधून मिळेल परदेशात विनामूल्य शिक्षण

Scholarship to Study Abroad: परदेशात शिक्षण (Abroad Education) घेणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते पण प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होत नाही. दरम्यान, आजच्या काळात हुशार विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती (Scholarship) उपलब्ध आहेत, ज्याद्वारे विद्यार्थी त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात. जर तुम्ही परदेशात शिकण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ठराविक रक्कम गोळा करावी लागेल. ज्यामध्ये कॉलेजची फी, राहण्याचा खर्च यासारख्या गोष्टींचाही …

Read More »

TATA STEEL मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

Tata Steel Recruitment: टाटा स्टील व्यवस्थापनातर्फे (Tata Steel Management) महाराष्ट्रातील प्लांटसाठी ज्युनिअर इंजिनीअर ट्रेनी (Junior Engineer Trainee, JET) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.टाटा स्टीलमध्ये मेकॅनिकल (Mechanical), इलेक्ट्रिकल (Electrical), मेटलर्जी (Metallurgy), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation), माइनिंग आणि माइन …

Read More »

राज्य शिक्षण मंडळाला नाकारणारी अट शिथिल

म. टा. प्रतिनिधी, मुंबईनामांकित कंपनीच्या उपकंपनीमध्ये ठाणे शाखेत मुलाखतीसाठी लावण्यात आलेल्या फलकावर पदवीधर ही किमान अट असून उमेदवाराचे बारावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई किंवा आयसीएसई मंडळातूनच झालेले असावे, असेही नमूद केल्याचा तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर अखेर ही अट रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विविध मराठीप्रेमी संस्थांनी संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन भेट घेतल्यानंतर अखेर त्या अटीवर कागद …

Read More »

MHT CET 2022: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या नोंदणीची मुदत वाढविली

MHT CET 2022: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell, Maharashtra) विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहेत. आता उमेदवारांना १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यासाठी ३१ मार्च ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला …

Read More »

SSC Paper Leak: ‘अशी’ पसरली दहावीचा पेपर फुटल्याची अफवा

कोल्हापूर: केवळ पाचशे रुपयात दहावीचा पेपर मिळाल्याच्या आनंदात अनेकांनी तो विकत घेतला आणि पेपर फुटल्याची अफवा (SSC Paper leak 2022) कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने पसरली. पण प्रत्यक्षात जयसिंगपूर येथे जुनाच पेपर आजची तारीख टाकून पैसे मिळवण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले.सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ चा पेपर होता. सकाळी दहावीचा पेपर फुटल्याची अफवा पसरली. जयसिंगपूर येथे …

Read More »