MHT CET 2022: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या नोंदणीची मुदत वाढविली

MHT CET 2022: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell, Maharashtra) विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणीची तारीख वाढविण्यात आली आहेत. आता उमेदवारांना १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यासाठी ३१ मार्च ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.

MHT CET 2022 : अशी करा नोंदणी
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जा.
होमपेजवरील MHT CET 2022 नोंदणीच्या ‘न्यू रजिस्ट्रेशन’ लिंकवर क्लिक करा.
आता ‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरावा लागेल.
संपूर्ण तपशील भरून आपली नोंदणी करा.
अर्ज फी भरा आणि पुढे जा. फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

MHT CET 2022: कोणत्या अभ्यासक्रमाची सीईटी कधी? जाणून घ्या

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
इंडियन लॉ सोसायटीमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज
महत्त्वाच्या तारखा
महाराष्ट्र सीईटी परीक्षेची तारीख – १७ आणि १९ मे २०२२

हेही वाचा :  'नेट-सेटधारकांच्या प्रश्नांकडे सरकार, प्रशासनानचे दुर्लक्ष'

नोंदणीची अंतिम तारीख- १५ एप्रिल २०२२

VSI Recruitment 2022: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भरती, १ लाख ८४ हजारपर्यंत मिळेल पगार
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर संस्थेत भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागातील आठ विषय, उच्च शिक्षण विभागाचे आठ आणि कला शिक्षण विभागाचा एक विषय अशा १७ विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सीईटीकडून जाहीर करण्यात आलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार सीईटीच्या परीक्षा ३ जूनपासून सुरू होत आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या परीक्षा ३ ते १० जूनदरम्यान होणार आहेत. तर, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ११ ते २८ जूनदरम्यान घेण्यात येणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात दहावी पास असणाऱ्यांना संधी, ६३ हजारपर्यंत मिळेल पगार
DRDO Recruitment 2022: डीआरडीओत परीक्षेशिवाय नोकरीची संधी
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असलेली एमएचटी सीईटी ११ ते २३ जूनदरम्यान होणार आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (पीसीएम) हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ ते १६ जून; तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (पीसीबी) हा ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा १७ ते २३ जूनदरम्यान होणार आहे. कला शिक्षण विभागाची परीक्षा १२ जूनला होणार आहे. यासाठी आता १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा :  राज्यात महिला दिन सप्ताह, शाळांमध्ये राबविणार विविध उपक्रम

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात नोकरीची मोठी संधी, येत्या दोन महिन्यांत पालिकेत ‘या’ पदांवर भरती
Government Job:’या’ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात भरती, १ लाखांपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …