राज्य शिक्षण मंडळाला नाकारणारी अट शिथिल

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

नामांकित कंपनीच्या उपकंपनीमध्ये ठाणे शाखेत मुलाखतीसाठी लावण्यात आलेल्या फलकावर पदवीधर ही किमान अट असून उमेदवाराचे बारावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई किंवा आयसीएसई मंडळातूनच झालेले असावे, असेही नमूद केल्याचा तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर अखेर ही अट रद्द करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विविध मराठीप्रेमी संस्थांनी संबंधित कंपनीच्या कार्यालयात जाऊन भेट घेतल्यानंतर अखेर त्या अटीवर कागद लावण्यात आला.

एका नामांकित कंपनीने त्यांच्याच एका उपकंपनीच्या ठाण्यातील पोखरण रस्ता क्र. २ येथील शाखेत भरती प्रक्रिया सुरू केली. ही भरती करताना किमान शैक्षणिक पात्रतेत पदवीधर ही अट दिली आहे. याचबरोबर कंसात बारावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई किंवा सीबीएसई मंडळातील शाळांमधून झालेले असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. यामुळे हा प्रकार म्हणजे राज्य शिक्षण मंडळातून शिक्षण घेतलेल्या हजारो इच्छुक उमेदवारांवर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत होती.

याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेने याची दखल घेत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी मनसे कार्यकर्ते अतुल पिंगळे यांना संबंधित कार्यालयाने ही नियमावली दिल्ली येथून आली होती. त्यानुसार हे फलक तयार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच राज्य मंडळाच्या कोणत्याही उमेदवारावर अन्याय न करता त्यातील काही उमेदवारांची नियुक्ती केल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय यापुढे खबरदारी घेतली जाईल, असेही स्पष्ट केल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सांगितले. ठाणे मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनीही या ठिकाणी जाऊन याबाबत हरकत नोंदविली होती.

हेही वाचा :  दहावी-बारावीची परीक्षा खुल्या पुस्तकात पाहून देता येणार? बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, 'येत्या वर्षात...'

एका नामांकित कंपनीच्या भरती प्रक्रियेत राज्य मंडळाच्या शिक्षणाला नकार!

RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, अर्जांना सुरुवात
इंडियन लॉ सोसायटीमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …