School Summer Vacation: राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी २ मेपासून

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या शाळा एप्रिलअखेरपर्यंत सुरू ठेवण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयावरून बराच गदारोळ झाला. याबाबत विविध स्तरांतून टीका झाल्यानंतर आता शिक्षण संचालनालयाने २०२२ ची उन्हाळी सुटी २ मेपासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

दरवर्षी एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना सुटी लागते. मात्र, शिक्षकांना एक मेपर्यंत शाळेत हजेरी लावणे सक्तीचे असते. यातच यंदा एप्रिल महिन्यात शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी वर्ग भरवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावरून राज्यभरातून नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २०२२ची उन्हाळी सुटी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडून शालेय शिक्षण विभागाकडे करण्यात आले आहे. त्यामध्ये २ मेपासून उन्हाळी सुटी लागू करावी, ही सुटी १२ जूनपर्यंत असावी, असे म्हटले आहे.

प्रस्ताव असा की…

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा जूनच्या दुसऱ्या सोमवारपासून तर विदर्भामध्ये जूनच्या चौथ्या सोमवारपासून सुरू करण्यात याव्यात. जूनच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजे १३ जून रोजी विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होतील. तर विदर्भातील जूनमधील तापमान विचारात घेता तेथील शाळा चौथ्या सोमवारी म्हणजेच २७ जून २०२२ रोजी सुरू होतील, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये मांडल्या आहेत. उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्या सुट्ट्यांचे नियोजन शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने करण्यात यावे. मात्र, माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असेही शिक्षण संचालनालयाने या प्रस्तावामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा :  केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2023

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात; निर्णयाने गोंधळ

RTE प्रवेशासाठी चुरस; एक लाख जागांसाठी तीन लाख अर्ज!
MHT CET 2022: कोणत्या अभ्यासक्रमाची सीईटी कधी? जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …