टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाला कोणताही धोका पत्करायचा नसल्याने संघात मोठे बदल केलेआहेत. त्यांनी तीन मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस हे दुखापतीमुळे भारत दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मिचेल स्टार्कचा गुडघा, मिचेल मार्शच्या घोट्याला आणि मार्कस स्टॉइनिसच्या बाजूला दुखापत झाली आहे.
मुंबई इंडियन्समध्ये झाला मोठा बदल, आता झहीर खानवर नवी जबाबदारी तर महेला जयवर्धने…
या तीन खेळाडूंच्या जागी नॅथन एलिस, डॅनियल सॅम्स आणि शॉन ॲबॉट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून आधीच विश्रांती देण्यात आली होती.
भारताविरुद्धची मालिका खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकाही खेळायची आहे, त्यानंतर टी-२० विश्वचषक सुरू होईल, या चषकाचे सामने देखील ऑस्ट्रेलियातच होणार आहेत. अशा परिस्थितीत संघ कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू इच्छित नाही.
आता विराट कोहलीचा खास मित्र होणार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? ही नावं चर्चेत
ऑस्ट्रेलिया संघ हा टी-२० विश्वविजेता आहे, त्यामुळे यावेळी घरच्या मैदानावरच विजेतेपद वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. यूएई मध्ये झालेल्या टी २० विश्वचषक २०२१ चे जेतेपद पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने पटकावले होते.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
• २० सप्टेंबर – पहिला सामना – मोहाली
• २३ सप्टेंबर – दुसरा सामना – नागपूर
• २५ सप्टेंबर – तिसरा सामना – हैदराबाद
ऑस्ट्रेलिया संघ:
शॉन ॲबॉट, ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ॲरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ॲडम झम्पा
भारतीय संघ :
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या