कतरिना विकीवर नाराज
करणच्या शोमध्ये फोन भूत सिनेमाचे कलाकार आले होते. कतरिना कैफ, ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी शोमध्ये आले होते. त्यावेळी एक गेम राउंड होता. विकीनं फोन उचलला असता, तर कतरिनाला पाॅइंट मिळणार होते. पण तसं झालं नाही. विकीचा फोन बिझी लागत होता. ती नाराज होऊन म्हणाली, माझ्या नवऱ्याचा फोन बिझी लागतोय. चाललंय काय?
रणबीर- आलियासाठी मला वाईट वाटलं, अयानने बोलून दाखवली खंत
त्यानंतर बराच वेळ फोन ट्राय केल्यानंतर विकी फोन उचलतो. तेव्हा कतरिना त्याला विचारते, इतका वेळ तू कोणाशी बोलत होतास? करणही त्याच्याशी बोलतो. पण विकी म्हणतो, हा पहिलाच फोन आहे, जो मी उचललाय.
चाहत्यांना आवडला दोघांचा वाद
कतरिना-विकीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. चाहत्यांची बाॅलिवूडमधली ही आवडती जोडी आहे. कतरिना विकीला माझा पती म्हणाली, हे तर फॅन्सना भारीच आवडलंय. या शोमध्ये कतरिना अगदी मनमोकळं बोलली आहे.
सोनाली कुलकर्णीचं पैठणी प्रेम, फोटो शेअर करत म्हणाली सांगा मी कशी दिसते?
शोचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात करण जोहर म्हणतो की, आलिया भट्टनं याच कार्यक्रमात सांगितलं होतं की, सुहाग रात्र अशी काही गोष्ट नसते. कारण लग्नाच्या दिवशी नवरा नवरी खूप दमलेले असतात. त्यावर उत्तर देताना कतरिना लगेचच म्हणते की, ‘एकदम बरोबर आहे. प्रत्येकवेळेला सुहागरात्रच असायला पाहिजे असं काही नाही. सुहाग दिन देखील असूच शकतो.’ कतरिनाचं हे उत्तर ऐकून करण जोहर, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी या तिघांनाही धक्का बसतो.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या