‘तू तेव्हा तशी’ मालिकेत सध्या अनामिका सौरभकडे राहायला आली आहे. आता हे दोघे नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. पण आता अनामिकाचा भूतकाळ पुन्हा परतला आहे. आकाश अनामिकाच्या घरी आला आहे. त्याने सध्या अनामिकाला धमकी द्यायला सुरुवात केली आहे. त्याने अनामिकाला सौरभसोबत असलेलं नातं तोडायला सांगितलं आहे. त्याच ऐकून अनामिकाने सौरभला लग्नासाठी नकार दिला आहे. तसेच तिला पटवर्धन कुटुंबसोबत राहायचं नाही असं देखील तिने सांगितले आहे. आता अनामिकाची मजबुरी सौरभला समजेल का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.
आता सौरभ आणि अनामिकाच्या नात्यावर आकाशाचा एंट्रीचा काय परिणाम होईल. तसेच राधाने आता कुठे सौरभला स्वीकारलं आहे त्यामुळे आकाशच्या येण्यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. आकाशची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अशोक समर्थ हे साकारणार आहेत.
हेही वाचा – Atul Khatri : ब्रम्हास्त्र सिनेमाचं नाव बदलून ब्रम्हास्त्र फाइल्स ठेवा; कॉमेडियन अतुल खत्रींचं मोठ वक्तव्य
आधीच स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या मालिकेत आता अशोक समर्थ यांची एंट्री झाली आहे.
मात्र मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षकांना फारसा आवडलेला दिसत नाहीये. त्यांनी या पोस्टवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांनी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेची तुलना ‘माझी तुजी रेशीमगाठ’ मालिकेशी केली आहे. प्रेक्षकांनी या पोस्टवर ‘काही तरी वेगळं दाखवा,’ ‘प्रत्येक मालिकेत तेचतेच नको’ अशा कमेंट केल्या आहेत.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या