वैभव मांगलेनं सोडलं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक; खरं कारण आलं समोर

मुंबई, 16 सप्टेंबर : मराठी नाट्यक्षेत्रात अनेक बालनाट्य येऊन गेली. त्यातील काही गाजलेल्या बालनाट्यापैकी एक नाटक म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’. अभिनेता वैभव मांगलेनं आपल्या अभिनयानं आणि दमदार संवादानं हे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. लहान मुलांचा या बालनाट्याला अप्रतिम प्रतिसाद मिळत होता. नाटकातील चिंची चेटकीण वैभव मांगलेनं उत्तमरित्या साकारली मात्र हीच चिंची चेटकीण प्रेक्षकांना आता पाहता येणार नाही. अभिनेता वैभव मांगलेनं अलबत्या गलबत्या हे नाटक सोडल्याचं जाहीर केलं आहे. वैभव मांगलेकडे वेळ नसल्यानं त्यानं हे नाटक सोडल्याचं कारण समोर आलं आहे.  सोशल मीडियावर नव्या चिंची चेटकीणीचे फोटो शेअर करत ‘ती मी नव्हेच’ असं म्हणत वैभवनं नाटक सोडल्याची माहिती दिली आहे.

अभिनेता वैभव मांगलेनं अलबत्या गलबत्या हे नाटक सोडल्यानंतर आता धम्माल चिंची चेटकणीची भूमिका कोण साकारण याकडे सर्वांचं लक्ष आहे. वैभवच्या जागी आता मालिकेत अभिनेते निलेश गोपनारायण चिंची चेटकीण साकारणार आहे. अभिनेता वैभव मांगले सध्या वेगळ्या कामांमध्ये बिझी असल्यानं त्यानं हे नाटक सोडल्याची माहिती नाटकाच्या निर्मात्यांनी दिली आहे.

हेही वाचा – Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने आईला वाढदिवसानिमित्त दिली खास भेट; पाहून तुम्हीही व्हाल खुश

अलबत्या गलबत्या नाटकाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवकडे आणखी बरीच काम आहेत. अनेक नाटक आणि प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे महिन्याअखेर अलबत्या नाटकाचे फार कमी प्रयोग होत होते.  त्यामुळे नव्या कलाकारासह हे नाटक करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचप्रमाणे वैभव मांगलेनं हे नाटक सोडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात निलेश गोपनारायण हे चेटकीणीच्या भूमिकेत आहेत. नवी चेटकीण हुबेहूब वैभव मांगलेनं साकारलेल्या चेटकीणीसारखी दिसत आहे. त्यामुळे वैभवनं पोस्ट शेअर करत म्हटलंय, ‘प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीच काम सोडलं आहे . तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे कि “ती मी नाहीच”.

वेळेबरोबर आणखी कारण आहेत. पण त्या कारणांमध्ये मला पडायचं नाहीये. पोस्ट करण्याचं कारण म्हणजे जाहिरातीत जो कलाकार दिसत आहे तो मी नाहीये. त्यामुळे मी समजून नाटक पाहायला गेलेल्या प्रेक्षकांचा भ्रमनिरास होऊ नये यासाठी मी पोस्ट केल्याचं वैभवचं म्हणणं आहे. ABP माझाशी बोलताना वैभवनं ही माहिती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …

अक्षय कुमारने पुन्हा जिंकलं सगळ्यांचं हृदय; मुलीसाठी केली खास गोष्ट

मुंबई, 20 सप्टेंबर : प्रत्येक बाप हा आपल्या मुलीसाठी खूप खास असतो. त्याचबरोबर वडिलांसाठीही मुलगी …