Breaking News

Uric Acid वाढल्यावर घाबरू नका; ‘हा’ एक पदार्थ काही दिवसांतच करेल कंट्रोल

How To Control Uric Acid: शरीरात वाढलेल्या यूरिक ऍसिडमुळे अनेक व्याधी डोकं वर करतात. किडनी ज्यावेळी यूरिक ऍसिडला चांगल्याप्रकारे फिल्टर करत नाही तेव्हा हा त्रास होतो. एवढंच नव्हे तर यूरिक ऍसिड सांध्यांमध्ये जमा होतात. ज्यामुळे सांधेवातीचा त्रास उद्भवतो. यामुळे पायांमध्ये सूज देखील जाणवते.

शरीरात प्युरीनचे पचन व्यवस्थित होत नसेल तर युरिक ऍसिडची पातळी वाढते. हे कमी करण्यासाठी आहारात बदल केले जातात. अक्रोड हे असेच एक ड्राय फ्रूट आहे जे युरिक ऍसिड कमी करू शकते. यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी अक्रोडाचे सेवन कसे करावे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा – ३ अधिक प्रमाणात असते. तसेच यामध्ये एँटी इंफ्लेमेटरी गुणांसोबतच विटामीन बी ६, कॉपर, फॉस्फोरस आणि मॅग्निशिअम सारखे पोषण तत्व आणि खनिज असतात.

अक्रोडमध्ये निरोगी प्रथिने देखील असतात जे यूरिक ऍसिडमुळे होणारे संधिरोग कमी करतात. जे गुडघ्यांमध्ये तयार होणारे यूरिक ऍसिड क्रिस्टल्स कमी करण्यास देखील उपयुक्त आहेत. या कारणास्तव, यूरिक ऍसिड आहारात समाविष्ट करण्यासाठी अक्रोड हे एक चांगले अन्न आहे.

(वाचा – Omicron Symptoms : भयंकर झालाय ओमिक्रॉन! पाठीच्या या भागाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांचा इशारा)

​कधी आणि कसं खावं अक्रोड

दररोज २ ते ३ अक्रोड खाल्यामुळे यूरिक ऍसिड कमी होण्यासाठी मदत मिळते. अक्रोड सलाडमध्ये टाकून खाऊ शकता किंवा स्मूदीसोबत, शेकसोबतही अक्रोड खाऊ शकता. अक्रोडने गार्निशिंग देखील केलं जातं. काहीजणांना अक्रोड रात्रभर भिजून खायला आवडतात.

(वाचा – Diet Plan : ‘फुल गोभी चावल’ आणि साध्या भातात काय फरक? आदित्य नारायणच्या डाएट प्लानमधील महत्वाचा पदार्थ

​अक्रोड बजावतो महत्वाची भूमिका

  • हाडे मजबूत करते
  • हृदयासाठी फायदेशीर
  • मेंदू धारदार होतो
  • मधुमेहावर प्रभावी
  • पचन चांगले होते
  • तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त
  • वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त
  • बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळेल
  • गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते

(वाचा – दररोज ‘हे’ एक काम करून 80 किलोच्या मुलाने घटवलं तब्बल 20 किलो वजन, बदललेला लुक पाहून व्हाल हैराण..!))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

​अक्रोडचे शरीराला इतर फायदे

अक्रोड खाल्ल्याने युरिक ऍसिड कमी होते, त्याचबरोबर शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. याचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. मन तीक्ष्ण करणे, शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, तणाव कमी करते आणि वजन कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.

(वाचा- महाभयंकर, कोरोनानंतर Marburg Virus ने वाढवली जगाची चिंता, ‘ही’ 10 लक्षणं दिसल्यास व्हा सावध नाहीतर विषय कट…!)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous मोदींनी उद्घाटन केलेल्या एक्सप्रेसवेवर पडला मोठा खड्डा, अखिलेश यांचा भाजपवर हल्लाबोल, योगींच्या मंत्र्याने दिले उत्तर !
Next Emergency- पुन्हा एक वाद! कंगना रणौत तर भाजपची दलाल, काँग्रेसचा खळबळजनक आरोप

Check Also

पॅरालिसिसच्या अटॅकने TV अभिनेत्री Nishi Singh Bhadli यांचे निधन, जाणून घ्या आजार आणि उपचाराची माहिती

‘इश्कबाज’, ‘कुबूल है’ आणि ‘तेनाली रामा’ सारख्या शोमधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री निशि सिंह भदली (Nishi …

माझी कहाणी : मी सुंदर असूनही माझा नवरा इतर स्त्रियांकडे टक लावून पाहतो

प्रश्न: मी एक विवाहित स्त्री आहे. मी लव्हमॅरेज केले. लहानपणापासून मी त्याला ओळखत होते. त्यामुळे …