भारत आणि पाकिस्तान यांची आज मॅच; दोघांना कोणत्याही परिस्थितीत हवाय विजय, फक्त…

नवी दिल्ली: क्रिकेटमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धा भारत आणि पाकिस्तान आज मैदानावर भिडणार आहेत. आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान अशा दोन लढती झाल्या होत्या. त्यानंतर दोन्ही संघात थेट वर्ल्डपकमध्ये मॅच होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे असताना दोन्ही संघाची मॅच कशी काय होणार. तर त्याचे असे आहे की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या आज लढती होणार असून फरक इतकाच की दोघांचे प्रतिस्पर्धा वेगवेगळे असणार आहेत.

भारताची लढत आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे होईल. तर पाकिस्तानची लढत इंग्लंडविरुद्ध कराची येथे होणार आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप होणार आहे, त्याच्या आधी हे चारही संघ जोरदार तयारी करण्याचा प्रयत्न करतील.

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये झाला नवा वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त ३ ओव्हरमध्ये संपली, स्कोअरबोर्ड पाहाच!

ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल संघात दाखल झाले आहेत. दोन्ही संघात आतापर्यंत २३ मॅच झालेत त्यापैकी भारताने १३ तर ऑस्ट्रेलियाने ९ मध्ये विजय मिळवलाय. या मालिकेतून टीम इंडिया वर्ल्डकपसाठीचा परफेक्ट संघ निवडण्याचा प्रयत्न करेल.

वाचा- सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमधील मोठा विक्रम धोक्यात; ऑस्ट्रेलियात हा दिग्गज खेळाडू..

दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा संघ १७ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघात सात सामन्यांची टी-२० मालिका होणार असून पहिली मॅच आज करातीच होईल. मालिकेतील पहिल्या चार लढती कराचीत होतील तर अखेरच्या ३ लढती लाहोरमध्ये होणार आहेत. इंग्लंडचा संघ गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकपच्या आधी पाकिस्तान दौऱ्यावर येणार होता. मात्र तेव्हा सुरक्षेचे कारण देत त्यांनी तो रद्द केला. इंग्लंडचा नियमीत कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे खेळणार नाही. त्याच्या जागी मोईन अली नेतृत्व करेल. टी-२० क्रमवारीत इंग्लंड दुसऱ्या तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘या स्टार खेळाडूच्या नावाची चर्चासुद्धा नाही’, BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दावा

मुंबई :  टी-20 वर्ल्ड कप, तसंच 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) …

IND vs AUS: पराभवात मिळाली भारताला आनंदाची बातमी, आता वर्ल्डकपसाठी या फलंदाजावर मोहर पक्की

मोहाली: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला …