संजनानं हे काय केलं?; नवीन लूक पाहून चाहत्यांना धक्का

मुंबई, 16 सप्टेंबर :  ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आजच्या घडीला मराठीतील टॉपच्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अरुंधतीचं पात्र जेवढं लोकप्रिय आहे तितकच लोकप्रिय आहे यात नकारात्मक भूमिका साकारणार ‘संजना’. संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारते. हिंदीतील काही मालिका, बिग बॉस मराठी त्यानंतर आता आई कुठे काय करते मधील ही अभिनेत्री सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. तिचे छान पारंपरिक लूक बघायला चाहत्यांना आवडतं . पण आता बऱ्याच काळानंतर तिने तिचा लूक बदलला आहे. या लूकमध्ये रुपाली धड ओळखूही येत नाहीये. सोशल मीडियावर बिफोर अँड आफ्टर असा लूक शेअर करत तिने चाहत्यांना धक्काच दिला आहे.

रुपाली भोसलेचे विविध फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे हे सगळे फोटो मुख्यतः पारंपरिक वेशातील किंवा साडीतील असतात. पण तिने आता बऱ्याच दिवसानंतर तिचा लूक बदलला आहे. रुपालीने नवीन हेयरकट केला आहे. सोशल मीडियावर बिफोर अँड आफ्टर असा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. रूपालीने खूपच शॉर्ट हेयरकट  केला आहे. ‘या  हेयरकटने  बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या.’ असा कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

रुपालीच्या या नवीन लूकमुळे चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय. काहींनी तिचा हा लूक पसंत पडलाय तर काहींनी कमेंट करत नाराजी व्यक्त केलीये. एका चाहत्याने लिहिलंय, ‘तू अशीही सुंदर दिसत आहेस’, ‘सगळ्या लूक मध्ये तू आम्हाला आवडतेस’, पण त्याचबरोबर काही चाहत्यांनी तिच्या नवीन लुकविषयी ‘तू हे काय केलंस’, ‘तुला मोठे केसच छान दिसतात’ अशाही भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा – Thank God Movie : ‘थँक गॉड’ समोरच्या अडचणीत वाढ; अजय आणि सिद्धार्थच्या चित्रपटावर बॉयकॉटची होतेय मागणी

दरम्यान रुपाली बिग बॉस मराठी 4′ मुले चर्चेत आली होती.  रुपालीनं तिला बिग बॉस मराठी 4मध्ये गेस्ट म्हणून यायचं आहे असं सांगितलं होतं.  तिच्या या इच्छेनंतर सर्वत्र चर्चा रंगल्या असून रुपालीला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

रुपालीनं इन्स्टाग्रमावर ‘विचारा प्रश्न’ हा गेम खेळला होता. त्यात तिला तिच्या चाहत्यांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात एका चाहत्यानं तिला ‘बिग बॉस मराठी 4 मध्ये गेस्ट अपिरिअन्स करायला आवडेल का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत रुपाली भोसले ‘हो’ असं म्हणाली.  रूपालीच्या उत्तरानंतर अनेकांनी तिला असं न करण्याचा सल्ला दिला आहे. कमेंट्मध्ये ‘रुपाली आई कुठे काय करते मालिकेतच छान दिसतेय’, असं म्हटलं आहे.पण आता तिचा हा नवीन लूक पाहून ती मालिकेतून ब्रेक घेतीये का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …