गांगुली यांना सहजासहजी आयसीसीचे अध्यक्षपद देण्यासाठी पाकिस्तान तयार नसल्याचे सध्याच्या घडीला दिसत आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी जर कोणी उमेदवार उभा केला नाही तर गांगुली हे बिनविरोध निवडून येऊ शकतात. पण पाकिस्तानला ही गोष्ट घडू द्यायची नाही. भारत ही क्रिकेट विश्वातील महासत्ता आहे. पण क्रिकेटमधील महासत्ता असलेल्या देशांविरोधात अन्य काही देशांतील संघटना नाराज असल्याचे काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर आयसीसीच्या मिळकतीवरून काही महिन्यांपूर्वी वादही झाला होता. या गोष्टीचा फायदा आपल्याला मिळू शकतो का, हे पाकिस्तान चाचपडून पाहणार आहे. त्यासाठी पाकिस्तानने या निवडणूकीसाठी आपला उमेदवार तयारही केला आहे.
आयसीसीच्या निवडणूकीसाठी पाकिस्तानने आता आपला उमेदवार सज्ज ठेवला आहे. पाकिस्तान सौरव गांगुलींच्या विरोधात पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. रमीझ हे यापूर्वी समालोचकही होते. त्यामुळे बऱ्याच देशांतील संघटनांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर माजी खेळाडू आणि समालोचक म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख होती. त्यामुळे या गोष्टीचा फायदा त्यांना होऊ शकतो. त्यामुळे आता गांगुली आणि रमीझ राजा यांच्यातील जंगी लढाई ही आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पाहायला मिळेल, असे दिसत आहे.
सध्याच्या घडीला न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले हे आयसीसीचे अध्यक्ष आहेत. बार्कले यांनी नोव्हेंबर २०२० साली आयसीसीचे अध्यक्षपद स्विकारले होता. बार्कले यांच्या अध्यक्षपदाचा काळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकही याच कालावधीमध्ये आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येईल आणि सौरव गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी उभे राहतील. जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर गांगुली हे आयसीसीच्या अध्यक्षपदार विराजमान होतील. पण जर गांगुली यांच्यासमोर जर कोणी उभे राहिले तर निवडणूक घेण्यात येईल.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या