Tag Archives: mumbai news

Video : लग्नात फुकटचं जेवायला गेला ‘रँचो’, मग करावं ‘हे’ काम…

Trending Video :  लग्न (Marriage Video) म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट्य जेवणाची मेजवाणी…आजकाल तर लग्नातील जेवणावर (Wedding food) इतक्या खर्च केला जातो की बघायला नको. पाणीपुरी स्टॉलपासून (Panipuri Stall)  डोसा पिझा व्हेज नॉनव्हेजसोबत अनेक स्वीटचे पदार्थ…ते पाहून तर खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेक वेळा तर नवरा नवरी (bride groom video) स्टेजवर राहतात आणि सगळ्यात जास्त गर्दी ही जेवण्यासाठी असते.  तुम्हाला …

Read More »

मुंबईत गोवरचा विळखा, ६ मुले ऑक्सिजनवर.. खरंच गोवर बालकांसाठी धोकादायक आहे का?

मुंबईत गोवर संसर्गाची तीव्रता वाढत आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सहा बालक ही ऑक्सिजनवर आहेत. सोमवारी १२ मुलांची या दोन्ही लक्षणांसाठी नोंद करण्यात आली. गोवर रुबेलाच्या लसीकरणाकडे योग्य वेळी लक्ष न दिलेल्या मुलांमध्ये आजाराची तीव्रता वाढली तर न्यूमोनियाचा त्रास बळावू शकतो. त्यामुळे पालिकेसह राज्य सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची गरज बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मुंबईमध्ये गोवर या आजाराची लागण बालकांना झाली आहे. …

Read More »

शरीरातील अवयव स्वत:चाच दुरूस्त करणारा मासा कोणता? पुण्यात सुरू आहे मोठं संशोधन

सागर आव्हाड, झी मीडिया: माणसाच्या जीवनात शरीरातील अवयवांना इजा झाल्यास ते अवयव (Human Body) बदला येत नाही. माणूस कमजोर होत जातो. त्यात जर मेंदू (Brain) आणि हृदयात (Heart) काही इजा झाल्यास तर आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. अश्या वेळी आयुष्याबद्दल चिंता वाटत असते. पुढे माणूस जिवंत असणार की नाही अशी चिंता असते. पण एक मासा (Fish) असा आहे. ज्याच्या शरीरावर …

Read More »

बालदिनानिमित्त बच्चे कंपनीसाठी सायक्लोथॉनचं आयोजन; मुलांकडून गॅजेट न वापरण्याचं घेतलं वचन

Childrens Cyclothon : मुंबईत बालदिनानिमित्त (Childrens day) सायक्लोथॉनच आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही काळात मुलांमध्ये सातत्याने विविध गॅझेट वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांना गॅझेट कमी वेळ वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे या हेतून सूर्या हॉस्पिटलकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायक्लोथॉनमध्ये 150 हून अधिक 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचा सहभाग होता. यावेळी मुलांनी गॅझेट वापरणं सोडणार …

Read More »

मुंबईत अचानक पसरला गोवर, ४८ तासांत तिघांचा मृत्यू, सुरूवातीला दिसतात फक्त ही ४ लक्षणे

Measles Outbreak in Mumbai: भारतात गोवरचा अचानक उद्रेक झाला आहे. 48 तासांत 3 मुलांचाही मृत्यू झाला आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, तिन्ही मुले एकाच कुटुंबातील होती. महत्वाची बाब म्हणजे गोवर या आजारावर अद्याप कोणताही इलाज नाही. म्हणून, तुम्हाला गोवरच्या लक्षणांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळेवर प्राथमिक उपचार घेणे सोईचे होऊ शकते. गोवर म्हणजे रूबेला आजाराची लक्षणे. Measles Rubella: मुंबईत …

Read More »

मुंबईत रंगणार सायक्लोथॉन, विविध वयोगटातील सायकलपटू येणार मुंबईच्या रस्त्यांवर, कसा घ्याल सहभाग?

Jio Mumbai Cyclothon : सध्या वाढत्या प्रदूषणात सायकलचा वापर अधिक करणं गरजेचं आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनने मुंबई पोलिस, महानगरपालिका, एमएमआरडीए, एनसीबी, एमएसआरडीसी आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या भागीदारीने एक भव्य अशी सायक्लोथॉन जिओ मुंबई सायक्लोथॉनच्या (Jio Mumbai Cyclothon) रुपात 13 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पेल्क्स अर्थात बीकेसी ते वरळी या मार्गे ही सायक्लोथॉन पार पडणार असून राजीव …

Read More »

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

सागर आव्हाड, झी मीडिया: अंधेरी पोटनिवडणुकीचा(anedheri east elections) निकाल आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आलं आहे. हे मतदान भाजपने केलं आहे, अशी टीका देखील होत आहे. यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता (Maharashtra Politics) ते म्हणाले की, ”कोणी कोणावर काय आरोप करावे यावर बंधने आणता येत नाही. लोकांना वस्तुस्थिती माहिती (Latest political …

Read More »

मालमत्ता करमाफीवर मोहर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवर विधिमंडळात शिक्कामोर्तब मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवर बुधवारी विधिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत यासंदर्भात मांडलेले विधेयक एकमताने संमत झाले. त्यामुळे १६ लाखाहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिका …

Read More »

पुनर्रचित इमारतींनाही चार इतके चटईक्षेत्रफळ

नव्या नियमावलीमुळे पुनर्विकास शक्य निशांत सरवणकर मुंबई : मुंबईत जागा उपलब्ध नसली तरी जुन्या इमारतींचा पुनर्विकास हाच सध्या विकासकांकडे पर्याय आहे. त्यातही जुन्या पुनर्रचित इमारतींसाठी नियमावलीत तरतूद नसल्यामुळे रस न घेणाऱ्या विकासकांना महाविकास आघाडी सरकारने संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडा व पालिकेच्या पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासास दाखविलेला हिरवा कंदील हा त्याचाच भाग आहे.    जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास …

Read More »

प्रवासी वाढविण्यासाठी मोनो रेलची धाव आता महालक्ष्मीपर्यंत

विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा;  अर्थसंकल्पात १५६.८६ कोटी रुपयांची तरतूद मुंबई : मोनो रेलला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी तसेच मोनोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेलच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संत गाडगे महाराज चौक ते मेट्रो ३ मार्गातील महालक्ष्मी मेट्रो स्थानक असे ७०० मीटपर्यंत विस्तारीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) करण्यात येणार आहे. भूसंपादनासह इतर कामांसाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १५६.८६ कोटी रुपयांची …

Read More »

सागरी सेतूवरील मेट्रो मार्गिकेविषयी लवकरच निर्णय

व्यवहार्यता अभ्यास अहवाल महिन्याभरात अपेक्षित मंगल हनवते मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचे अंतर शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूवरून (मुंबई पारबंदर प्रकल्प) मेट्रोद्वारे काही मिनिटांत पार करण्याचे प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सागरी सेतूवरून मेट्रो नेण्यासाठी मेट्रो १९ (प्रभादेवी – शिवडी – नवी मुंबई विमानतळ) मार्गिकेची आखणी (एमएमआरडीए) केली आहे. …

Read More »

सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल मुंबई : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कारवायांना पैसे पुरविल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, सरकार पडण्याच्या भीतीपोटीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही, असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का, असा सवाल बुधवारी केला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजपने मुंबईत …

Read More »

मालमत्ता, मद्य, वाहन, ई-कॉमर्स, इंधनावरील कराचा तिजोरीला हातभार; आदरातिथ्य, पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवनाची प्रतीक्षा

|| सौरभ कुलश्रेष्ठ आदरातिथ्य, पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवनाची प्रतीक्षा मुंबई : आर्थिक वर्ष सुरू होत असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल ते जून या तिमाहीचा मोठा फटका करसंकलनावर झाला असला तरी त्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत असून मुद्रांक व नोंदणी शुल्क, उत्पादन शुल्क, वाहन कर, इंधनावरील विक्री कर आदी महसुलाच्या राज्य सरकारच्या स्रोतांनी तिजोरीला हातभार लावला आहे. पहिल्या तिमाहीनंतर जीएसटी संकलनही वाढले असून …

Read More »

भाजपा नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढतेय असं पत्रकारांनी म्हणताच राऊत म्हटले, “मला असं वाटतं की…”

या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय. महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मंगळवारी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या …

Read More »

फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “१२५ तास रेकॉर्डिंग केल्याचं….”

राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला. फडणवीसांनी यावेळी पेनड्राईव्हच्या माध्यमातून उपाध्यक्षांकडे पुरावेदेखील सादर केले. फडणवीसांनी केलेल्या आरोपांमध्ये शरद पवारांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. दरम्यान यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तपास यंत्रणांचा वापर करूनही महाराष्ट्रातील …

Read More »

आरोपांची धुळवड : ‘भाजप नेत्यांविरोधात सरकारचे कारस्थान’

महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात मंगळवारी आरोपांची धुळवड रंगली़ राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला़  दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीच्या कारस्थानानुसार मुंबईत छापेसत्र सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोमय्या पिता-पुत्रासह भाजपला लक्ष्य केल़े  मुंबई : राज्य सरकारने …

Read More »

‘ईडी म्हणजे भाजपचे एटीएम’

मुंबई : चौकशी सुरू करून खंडण्या वसूल करायच्या हा सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांचा उद्योगच झाला आहे. ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील, असा इशारा मंगळवारी दिला़ ‘ईडी’चे अधिकारी खंडणीतून वसूल होणारी रक्कम जितेंद्र नवलानी याच्या सात कंपन्यांच्या खात्यांमध्ये जमा करत होत़े  या …

Read More »

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढील आठवडय़ात ? ; विनंती करूनही राज्यपालांकडून मान्यता नाहीच

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची योजना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मान्यता मिळाली नसल्याने प्रत्यक्षात येऊ शकली नाही. दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ न शकल्याने काँग्रेस पक्षावर नामुष्कीची वेळ आली आहे. आता पुढील आठवडय़ात निवडणूक घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. …

Read More »

अ‍ॅप आधारित टॅक्सींसाठी नियमांचा विसर ; केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे कागदावरच

मुंबई: केंद्र सरकारची मार्गदर्शक नियमावली लागू न होणे आणि अ‍ॅपआधारित टॅक्सी या परवानाशिवाय धावणे यावर राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने नुकतेच ताशेरे ओढले. त्यानंतर राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीवर काम सुरू असल्याचे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्राची मार्गदर्शक नियमावली लागू झाल्यास अ‍ॅपआधारित टॅक्सीसाठी कमी गर्दीच्या वेळी ५० टक्क्यांपर्यंत भाडेदर, तर गर्दीच्यावेळी दीडपट अधिक भाडेआकारणी यासह अन्य नियम …

Read More »

शिक्षण जगत : सेंट झेवियर्समध्ये मराठी दिन साजरा

मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने ‘अभिजात मराठी’  या  कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन केले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटय़, नृत्य, साहित्य, संगीत, इत्यादी कला सादर केल्या. कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी देशपांडे व रुत्वि चौधरी यांनी केले. यावेळी मराठी अभिमान गीताचे संगीतकार कौशल इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी साकारली होती. संगीत विभागाने काही …

Read More »