Tag Archives: mumbai news

“साक्षीदारांच्या जबाबावरून मनी लॉन्डिरगमध्ये मलिकांचा सहभाग असल्याचे दिसून येतो”; न्यायालयाने नोंदवले मत

विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध मनी लॉन्डिरग प्रकरणात गंभीर टिप्पणी केली आहे. साक्षीदारांच्या जबाबात महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचा मनी लॉन्डिरगमध्ये सहभाग असल्याचे दिसून येते असे न्यायालयाने म्हटले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ‘ईडी’ कोठडीनंतर …

Read More »

एक्झिट पोलवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “खोटे सिद्ध होतील, यापूर्वीही…”

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आह़े उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आह़े पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत असून, उत्तराखंड आणि गोव्यात त्रिशंकू स्थिती राहील, तर मणिपूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा कल चाचण्यांमधून दिसतो. आता या पाच …

Read More »

संजय राऊतांचं ED विरोधात थेट मोदींना पत्र, भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे फाडण्याचा इशारा; म्हणाले…

शिवसेना खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत असून यावेळी ते काय नवा गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यावेळीही संजय राऊत यांनी शिवसेना भवनातच पत्रकार परिषद घेणार असून वेळदेखील दुपारी ४ ची आहे. संजय राऊत यावेळी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांवर निशाणा साधणार असून भ्रष्टाचारी भाजपा नेत्यांचे मुखवटे उघडे पाडण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना …

Read More »

देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट : नितेश राणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख असणारे बॅनर्स मुंबईतील घाटकोपरमध्ये झळकल्याने मागील महिन्यात राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं. मात्र नंतर या प्रकरणावरुन मनसेने पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारची बॅनरबाजी न करण्याचे आदेश दिले. असं असलं तरी आता या प्रकरणावरुन भाजपाचे नेते नितेश राणे यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता खरे हिंदुहृदयसम्राट हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

महिलांवरील अत्याचाराविरोधातील शक्ती कायद्यात दुरुस्ती ; गुन्हा नोंदविण्याबाबतची संदिग्धता दूर

मुंबई : महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती कायद्यात विधिमंडळाच्या संयुक्त समितीने सुचवलेल्या सुधारणांचा अहवाल सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. त्यामुळे महिला अत्याचारांच्या खटल्यांसाठी विशेष सरकारी वकिलांची संख्या वाढणार असून, गुन्हा नोंदवण्याबाबतची संदिग्धता संपेल़  त्यामुळे शक्ती कायदा अधिक प्रभावी होणार आहे. सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. ५२ महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित …

Read More »

महिलांविरोधातील गुन्ह्यांत शिक्षेचे प्रमाण १५.३ टक्के ; न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये सुविधा नसल्याने हजारो प्रकरणांत तपास रखडला

मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण १५.३ टक्के इतके असून सुमारे दोन लाख २९ हजार खटले विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. तर न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये अपुरे मनुष्यबळ, सामग्री व अन्य कमतरता आहेत. त्यामुळे बालकांवरील अत्याचारांसंबंधी (पोक्सो कायदा) १६१९ तर महिलांविषयक गुन्ह्यांबाबतची १०५२ प्रकरणे डीएनए चाचण्यांसाठी प्रलंबित असल्याची माहिती  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. …

Read More »

महिला पोलिसांना आठ तासच काम

पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा आदेश मुंबई : महिला दिनानिमित्त नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील महिला पोलिसांना अनोखी भेट दिली आहे. पांडे यांनी मुंबईतील महिला पोलिसांना आठ तासच काम देण्याचे कार्यालयीन आदेश दिले आहेत. कुटुंब आणि कर्तव्य अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला पोलिसांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो. विशेष म्हणजे पांडे राज्याचे पोलीस …

Read More »

अॅपआधारित विनापरवाना सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांची कोर्टाकडून दखल; परवान्यासाठी अर्ज करण्याची सूचना

महाराष्ट्र सिटी टॅक्सी अधिनियमाअंतर्गत अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असलेला शहरात वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अ‍ॅप आधारित सगळ्या टॅक्सी कंपन्या परवान्याशिवाय चालवल्या जात असल्याने उच्च न्यायालयाकडून याबाबत विचारणा करण्यात आली आहे. न्यायालयाने याप्रकरणी दखल घेत कॅब एग्रीगेटर्सना १६ मार्च पर्यंत राज्य सरकारसमोर मोटर वाहन कायद्यांतर्गत त्यांच्या टॅक्सी […] (प्रातिनिधीक छायाचित्र) महाराष्ट्र सिटी …

Read More »

परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता परवानगी ; पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक

मुंबई :  परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि करोनाची साथ किंवा सध्याची युद्धजन्य स्थितीमुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आंतरवासिता (इंटर्नशिप) पूर्ण करण्याची संधी देण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाणारी पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे, असे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच परदेशात इंटर्नशिप करत असलेल्या विद्यार्थ्यांना इंर्टनशिपचा उर्वरित भाग भारतातील …

Read More »

राखीव निधी वापरण्याची ‘एमएमआरडीए’वर नामुष्की ; १३०० कोटींच्या प्रस्तावास मंजुरी

मंगल हनवते, लोकसत्ता मुंबई : श्रीमंत प्राधिकरण अशी ओळख असणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमोरील (एमएमआरडीए) आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. कोटय़वधींचे प्रकल्प सुरू असताना निधी अपुरा पडत असल्याने आता एमएमआरडीएवर चक्क राखीव निधी (रिझव्‍‌र्ह फंड) वापरण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यानुसार राखीव निधीतील १३०० कोटी निधी खात्यात वर्ग करून ती वापरून प्रकल्प सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या १५२ व्या बैठकीत मंजुरी देण्यात …

Read More »

‘वसंतोत्सवा’त राहुल देशपांडेंच्या सुरांचा वर्षांव

मुंबई : कधी आक्रमक, कधी अलवार गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गायक पं. वसंतराव देशपांडे यांची गाणी, त्यांचे सूर, त्यांच्या आठवणी जागवणारा आगळावेगळा वसंतोत्सव रविवारी पुन्हा एकदा रसिकांनी अनुभवला. आपल्या चतुरस्र गायकीचा अलौकिक वारसा मागे ठेवून गेलेले लोकप्रिय गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीपूर्तीनिमित्त रविवारी, (६ मार्च) नेहरू सेंटर वरळी येथे ‘वसंतोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘वसंत एक स्मरण’ हा खास …

Read More »

निवडणुका टाळण्यासाठी मंत्रालयात दोन दिवस धावपळ

मुंबई: इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात धावपळ सुरु होती. नगरविकास, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच विधि व न्याय विभागाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत ही विधेयक तयार करण्याची करसत करीत होते.  राज्यातील सुमारे ५०० हून अधिक स्थानिक …

Read More »

मंत्रिमंडळ बैठकांना दांडी मारण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील एकाही मंत्र्याने  गेल्या सव्वा दोन वर्षांत मंत्रिमंडळांच्या बैठकांना १०० टक्के हजेरी लावलेली नसून दांडीबहाद्दरह्ण मंत्र्यांमध्ये शंकरराव गडाख, डॉ. राजेंद्र शिंगणे, उदय सामंत आघाडीवर आहेत. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. तेव्हापासून २३ डिसेंबर २०२१ पर्यंत मंत्रिमंडळाच्या ९४ बैठका झाल्या असून त्यात मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेच सर्वाधिक बैठकांना उपस्थित होते. …

Read More »

अनधिकृत बांधकामप्रकरणी नारायण राणे यांना नोटीस

मुंबई : मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आठ मजली बंगल्याची दोन आठवडय़ांपूर्वी पाहणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. बंगल्यातील अनधिकृत बांधकाम आणि वापरात केलेला बदल याप्रकरणी राणे यांना शुक्रवारी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. बगिचाच्या जागेचे खोल्यांमध्ये रूपांतर करण्यात आल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. जुहू …

Read More »

शीना बोरा जिवंत असल्याचा दावा सीबीआयनं फेटाळला; इंद्राणी मुखर्जी कोर्टात भडकली, म्हणे…

सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा, अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली होती. २०१२ मधील शीना बोरा हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता. कारागृहात आपली माजी पोलीस निरीक्षक आणि कैदी आशा कोरके नावाच्या महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीना बोराची भेट झाल्याचं सांगितलं होतं, असंही तिने पत्रात म्हटलं होतं. तसेच …

Read More »

राज्यात निवडणूक संभ्रम; ओबीसी आरक्षणपेच : आयोग आणि सरकारची परस्परविरोधी रणनीती

ओबीसी आरक्षणपेच : आयोग आणि सरकारची परस्परविरोधी रणनीती मुंबई, पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाविना घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने  गुरुवारी दिले. परंतु निवडणुकांबाबतचा अधिकार स्वत:कडे घेऊन त्या पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि त्याच वेळी त्या पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेली तयारी यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी, निवडणुका होणार की लांबणीवर पडणार, …

Read More »

आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात; घटनात्मक जबाबदारीनुसार सज्जता

घटनात्मक जबाबदारीनुसार सज्जता मुंबई : इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रियेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला असला तरी महापालिका निवडणुका घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निकालपत्रात काहीच भाष्य केलेले नसल्याने घटनात्मक जबाबदारीनुसार निवडणुका घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोग …

Read More »

मुंबई-ठाणे मेट्रोचे काम संथगतीने; तीन वर्षांत ३० टक्क्य़ांचाच पल्ला, ‘एमएमआरडीए’ला चिंता 

|| मंगल हनवते तीन वर्षांत ३० टक्क्य़ांचाच पल्ला, ‘एमएमआरडीए’ला चिंता  मुंबई : मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रो ४ प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून गेल्या तीन वर्षांत सरासरी केवळ ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. पाच टप्प्यांच्या या प्रकल्पातील तीन टप्प्यांतील कामे चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) चिंता वाढली आहे.  ‘एमएमआरडीए’ने वडाळा ते घाटकोपर- …

Read More »

भिवपुरी प्रकल्पात पाण्याच्या पुनर्वापराचा विचार; मुंबईच्या वीजपुरवठयाची शताब्दी

मुंबईच्या वीजपुरवठय़ाची शताब्दी मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करत या महानगरीच्या आर्थिक प्रगतीत योगदान देणाऱ्या टाटा पॉवरच्या  भिवपुरी येथील ७५ मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पाने नाबाद शतक पूर्ण केले आहे. आता १०० वर्षे झाल्यानंतर भविष्यात या ठिकाणी उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवून त्याच पाण्यातून पुन्हा वीजनिर्मितीसाठी वापर करता येईल का याची चाचपणी करण्यात येत आहे. टाटा पॉवरचा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात जुन्या …

Read More »

प्रतिज्ञा मजूर संस्थेत प्रवीण दरेकर ‘रंगारी’; एकही सदस्य मजुरी करीत नसल्याचा अहवाल

संदीप आचार्य / निशांत सरवणकर एकही सदस्य मजुरी करीत नसल्याचा अहवाल मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बँकेची निवडणूक लढविली होती त्या प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखविले आहे. याशिवाय या मजूर संस्थेतील सर्वच सदस्य मजुरी करीत नसल्याचा अहवाल सहकार खात्याच्या ए विभागाच्या उपनिबंधकांनी दिला आहे. सदर संस्थेच्या पत्त्यावर दुसरीच …

Read More »