परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता परवानगी ; पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक


मुंबई :  परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि करोनाची साथ किंवा सध्याची युद्धजन्य स्थितीमुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांपैकी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आंतरवासिता (इंटर्नशिप) पूर्ण करण्याची संधी देण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाणारी पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे, असे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने स्पष्ट केले आहे.

तसेच परदेशात इंटर्नशिप करत असलेल्या विद्यार्थ्यांना इंर्टनशिपचा उर्वरित भाग भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पूर्ण करता येईल. परंतु यासाठी त्यांनी पात्रता परीक्षा उतीर्ण होणे आवश्यक आहे, असे आयोगाचे सदस्य आणि राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाचे आवाहन युद्धग्रस्त युक्रेनमधून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची योग्य माहिती संकलित करण्याची प्रकिया महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केली आहे. याकरिता विद्यापीठाच्या  http://www.muhs.ac या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध केला आहे. या अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी योग्य माहिती द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरून पीडीएफ स्वरूपात   [email protected] या ईमेलवर पाठवावेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले.

The post परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता परवानगी ; पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक appeared first on Loksatta.

हेही वाचा :  'शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ...'; ठाकरेंचा हल्लाबोल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …