Tag Archives: desh videsh News in Marathi

Hijab Row : “आमच्या अंतर्गत गोष्टींवर…”, हिजाब वादावरून टीका करणाऱ्या देशांना भारतानं ठणकावलं!

हिजाब प्रकरणावरून टीका करणाऱ्या देशांना भारतानं ठणकावलं असून परराष्ट्र विभागानं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात हिजाब घालण्यावरून मोठा वाद सुरू आहे. कर्नाटकमधल्या उडुपीमध्ये महाविद्यालयात हिजाब घालणाऱ्या मुस्लीम मुलींना प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या असून आता त्यावर इतर देशांमधून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी …

Read More »

युक्रेन सोडा, अमेरिकेचा नागरिकांना सल्ला; रशिया आक्रमणाच्या तयारीत?

रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती जगभरामध्ये आहे. युद्ध थांबवण्यासाठी चार देशांदरम्यान सुरू असलेली चर्चाही निष्फळ ठरली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रशिया बीजिंग ऑलिम्पिक संपण्याची वाट बघणार नाही. युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याचा मोठा जमाव वाढत आहे आणि युद्ध टाळण्याच्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही. या सर्व परिस्थितीमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. …

Read More »

महागाई नियंत्रणातच; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यात अधिक यश आले आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना राज्यसभेत केला. जागतिक आर्थिक संकटाच्या काळात म्हणजे २००८-०९ मध्ये महागाई अर्थात चलनवाढीचा दर ९.१ टक्के होता आणि आर्थिक घट २.२१ लाख कोटी झाली होती. २०२०-२१ …

Read More »

‘सीएए’ निदर्शकांवरील वसुली नोटिसा मागे घ्या!; उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी (सीएए) आंदोलकांना बजावलेल्या वसुलीच्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात, अन्यथा त्या रद्द करण्याची कारवाई करावी लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला शुक्रवारी दिला. उत्तर प्रदेश सरकारने कथित आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करताना स्वत: ‘‘तक्रारदार, वकील आणि न्यायाधीश’’ यांचे काम केले आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती डी. …

Read More »

राहुल गांधींमुळेच काँग्रेस पक्ष संपला; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची टीका

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या ऱ्हासाला राहुल गांधीच जबाबदार असल्याचं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटलं आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ईशान्येतील राज्यांवर बहिष्कार घातल्याचा आरोप केला आहे. ईशान्य भारतात राहुल गांधींचे अज्ञान हे पक्ष नष्ट होण्याचे प्रमुख कारण आहे, असंही ते म्हणाले. राहुल …

Read More »

गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना; सहाव्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जणांचा मृत्यू

दिल्ली लगत असलेल्या गुरुग्राममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १०९ मधील द्वारका एक्स्प्रेसमधील २२ मजली इमारतीचा काही भाग तिथे बांधकाम सुरू असताना कोसळला. या अपघातात दोन जणांचा मृत्यु  झाला आहे. इमारतीचा काही भाग कोसळला असता गोधळ उडाला. A portion of the roof of the sixth floor of D tower of Chintels Paradiso housing complex in Gurugram's Sector 109 …

Read More »

करोना संकट संपण्याची चर्चा असतानाच WHO चा इशारा; म्हणाले, “ओमायक्रॉन हा काही शेवटचा…”

करोना संकटाचे ढग हळूहळू कमी होत असून ते लवकरच संपेल असं सांगितलं जात असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मात्र महत्वाचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचे नवे व्हेरियंट वाइल्ड कार्ड असल्याचा उल्लेख करताना ओमायक्रॉन हा काही शेवटचा व्हेरियंट नसून अजून काही नवे व्हेरियंट समोर येण्याची मोठी शक्यता असल्याचं सांगितलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रश्नोत्तराचं सत्र आयोजित …

Read More »