फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं

आयुष्य हे एक असं बुचकळ्यात टाकणारं कोडं आहे, ज्यात कधी काय होईल याचे उत्तर कोणाकडेच नाही. ज्या गोष्टीपासून आपण रात्रंदिवस दूर धावत असतो ती गोष्ट आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग कधी बनते हे आपल्यालाच कळत नाही. माझ्या बाबतीतही असंच काहीसं झालं. अनेक वर्षांपूर्वी मी ज्या माणसापासून दूर जाण्यासाठी मी सर्व प्रकारचे मार्ग शोधत होती त्याच्याशीच मी लग्न केले. प्रेम खरोखरच एक चमत्कारिक गोष्ट आहे आणि त्याचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे.

खरं सांगायचं तर हे संपूर्ण प्रकरण त्यावेळचे आहे जेव्हा सोशल मीडियावर अनेक महिलांची फसवणूक होत होती. अशा परिस्थितीत मी स्वतःला प्रेम प्रकरणापासून जाणूनबुजून दूर ठेवले होते. हे देखील एक कारण आहे की एकमेकांना नीट ओळखूनही मी कोणत्याच अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवायला तयार नव्हते. पण मला माहित नव्हतं की सगळं काही इतकं अचानक बदलणार आहे. जे घडलं त्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) (फोटो सौजन्य :- iStock)

आमची फेसबुकवर मैत्री झाली

आमची फेसबुकवर मैत्री झाली

खरं तर, ही गोष्ट 2016 सालची आहे, जेव्हा मी फेसबुकवर एका मित्राला भेटले. त्याने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मग आम्ही आवडीनिवडी आणि कामाशी संबंधित गोष्टींबद्दल बोलू लागलो. मला तो खूप आवडला. खरे सांगायचे तर मी त्याच्या बाबतीत खूप इम्प्रेस होती, पण तरीही ही गोष्ट मी त्याला जाणवू दिली नाही आणि नेहमी त्याच्यापासून दूर राहिले. आम्ही मात्र रात्रंदिवस बोलायचो. खूप काळ निघून गेला आणि आमची मैत्री घट्ट होत गेली. एके दिवशी त्याने मला प्रपोज केलं व “माझी बायको होशील का?” असे थेट विचारले.

हेही वाचा :  काश ! हनिमूनच्या पहिल्या रात्री मला या गोष्टी माहित असत्या तर माझी आज ही अवस्था झाली नसती

(वाचा :- या 5 प्रकारच्या मुलांवर अक्षरश: वेड्यासारखं प्रेम करते बायको,नवरा म्हणेल तिच त्यांच्यासाठी पूर्व व पश्चिम दिशा)​

सगळं अनपेक्षित होतं

सगळं अनपेक्षित होतं

त्याच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला, पण मी त्याला डेट करायला तयार झाली. आम्ही एकाच शहरात राहत असलो तरी त्यानंतर आम्ही कधीच एकमेकांना भेटलो नाही. कदाचित मला माझ्या मर्यादा माहित होत्या म्हणून. मात्र, तो मला भेटायला सांगत होता. अशा स्थितीत त्याने आग्रह धरल्यावर मी त्याला नम्रपणे सांगितले की, मला त्याला भेटायचे नाही कारण अनोळखी व्यक्तींकडून फसवणूक होण्याची भीती नेहमी माझ्या मनात असते. माझे म्हणणे ऐकून तो काहीच बोलला नाही.

(वाचा :- नणंदेवर प्रेम जडलं म्हणून जगाला दाखवण्यापुरतं केलं नव-याशी लग्न, पण पुढे जे झालं ते अक्षरश: हादरवून सोडणारं..!)​

मी प्रेमात पडली

मी प्रेमात पडली

मात्र, हे सर्व घडल्यानंतरही आमचं बोलणं सुरूच होतं. आम्हा दोघांना एकमेकांशी बोलणे सुरू करून आता जवळपास दीड वर्ष झालं होतं. मी माझ्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी दुसऱ्या देशात गेल व तिथूनही आम्ही दोघं सतत संपर्कात होतो. पुढे काही वर्षांनी मलाही तो आवडू लागला आणि मी त्याच्या प्रेमात पडले. मी जेव्हा विदेशातून परत आले तेव्हा त्याने मला कॅफेमध्ये सरप्राईज दिले. तो खूप स्मार्ट आणि देखणा दिसत होता आणि हो पहिल्यापासूनच माझं त्याच्यावर क्रश होतं. आमची भेट होताच त्याने मला लग्नासाठी प्रपोज केले. त्याने मागणी घालताच मला धक्काच बसला आणि मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही, उलट असं म्हणाली की आपण यावर नंतर बोलू. अर्थात माझी अशी प्रतिक्रिया पाहून त्याला खूप वाईट वाटलं.

हेही वाचा :  राजकुमाराचे बंडखोर रूप; Prince Harry का चढले कोर्टाची पायरी?

(वाचा :- माझ्या गुरूने घरात गुप्तपणे एक स्त्री लपवून ठेवली होती,ज्यामागील भयंकर सत्य समोर आलं अन् पायाखालची जमीनच सरकली)​

घरच्यांनी होकार दिला

घरच्यांनी होकार दिला

काही दिवसांनी तो अचानक माझ्या घरी आला. मी खूप घाबरली होती. कारण माझ्या आई-वडिलांना याबद्दल काहीच माहित नव्हती. पण चहा[पानाचा कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तो कोण आहे आणि इथे का आला आहे. माझ्या आईने हे नाते स्वीकारले. मी खूप आनंदी होते. पण तरीही मनात भीती होती. कारण त्याच्या बाबतीत मी अजूनही कन्फ्युज होते. आता तर मी त्याच्याशी लग्न करावे अशी माझ्या आईवडिलांची इच्छा होती.

(वाचा :- हनीमूनच्याच दिवशी होईल नात्याचा कायमचा THE END, तुमच्या या 5 सवयी देतात आधीच धोक्याचा इशारा, वेळीच व्हा सावध.!)​

काही गोष्टी कल्पनेपलीकडच्या असतात

काही गोष्टी कल्पनेपलीकडच्या असतात

कदाचित ते त्याच्या व्यक्तिमत्त्वाने आणि वागण्याने इम्प्रेस झाले असावेत. म्हणूनच मी पण त्याच्याशी लग्न करायला हो म्हटलं. तो माझ्यावर खूप खुश होता. आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत आणि आम्ही एकत्र खूप आनंदी आहोत. तो माझ्यावर इतकं प्रेम करतो की मी त्याला एवढ विअत समजून त्याच्या पासून दूर पळायची याची मलाच आता लाज वाटते. सोशल मिडिया वरून मला इतका चांगला जोडीदार मिळाले याचा मी विचारही केला नव्हता आणि ती गोष्ट झाली.

हेही वाचा :  विरारमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा! 55 इमारतींचा घोटाळा उघड

(वाचा :- एकाचवेळी एक नाही तर अनेक मुली माझी पत्नी बनण्यास तयार झाल्या, अचानक एक भयंकर प्रसंग ओढावला व सा-याची माती झाली)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …