Sai Baba Gold : शिर्डीच्या साईचरणी नवरत्न जडीत हार; किंमत ऐकून डोळे फिरतील

Sai Baba of Shirdi Get Gold Gift : शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी दानाचा ओघ सुरूच आहे.  साईचरणी नवरत्न जडीत हार अर्पण करण्यात आला आहे. साईबाबांना मिळालेली ही आणखी एक मौल्यवान भेट मानली जात आहे. नवरत्न आणि सोन्याची घडणावळ असलेल्या या हाराची किंमत तब्बल 20 लाख रुपये इतकी आहे. 

हैदराबाद येथील साईभक्त भूपाल कामेपल्ली आणि राजलक्ष्मी कामेपल्ली यांनी साई चरणी हा हार दान म्हणून अर्पण केला आहे.  310 ग्रॅम वजनाच्या या हाराची किंमत तब्बल 20 लाख रुपये आहे. नवरत्न जडीत हा सुवर्णहार हा अत्यंत मौल्यवान दागिना आहे.

विशेष म्हणजे हा हार राजलक्ष्मी यांनी स्वतःच्या हाताने बनवला आहे. त्याचप्रमाणे 1176 ग्रॅम वजनाचे 31 हजार रुपये किंमतीचे चांदीचे ताट, वाटी, प्‍लेट, ग्‍लास तर दोन लाख रुपये देणगीचा धनादेश देखील कामेपल्ली कुटुंबियांनी साई संस्थानला देणगी स्वरूपात दिला आहे..

साई चरणी साईचरणी 12 लाखांचे सुवर्णफुल

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साईभक्‍त नागम अलिवेणी यांनी  12 लाखांचे सुवर्णफुल साई चरणी अर्पण केले होते. नागम यांनी पतीच्‍या स्‍मरणार्थ हे फुल फुल साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले आहे. 233 ग्रॅम वजनाचे हे सुवर्ण फुल १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे आहे. 

हेही वाचा :  धावत्या लोकलमध्ये भैय्या विकतोय पाणीपुरी; मुंबईकरांनी घेतला आस्वाद

साई चरणी सोन्याचा मुकुट

गेल्या वर्षी 2022 मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशीच शिर्डीतील (Shirdi Sai Baba)साईबाबांच्या चरणी एका भाविकाने सोन्याचा मुकुट (Gold Crown)अर्पण केला होता.  अन्नम सतीश प्रभाकर नावाच्या साई भक्ताने  36 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट आणि 33 हजारांचे चांदीचे ताट (Silver Plate)अर्पण  केले.  770 ग्राम वजनाचा सोन्याचा मुकुट आणि 620 ग्राम वजनाचे  चांदीचे ताट आहे. 

साई चरणी कोट्यावधीचे दान

आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी आणि शिर्डीतील साईबाबा संस्थान ही देशातील श्रीमंत देवस्थाने म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्र, आंध्र, गुजरात यासह अनेक राज्यांतून दररोज हजारो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. वर्षागणिक साई संस्थानाला मिळत असलेल्या देणग्या या कोट्यवधींच्या घरात आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …