Breaking News
  • पाण्याच्या टाकीत पैसे टाका, २० लाखांचे 5 कोटी होतील; पुण्यात महिलेची फसवणूक
  • कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 उशिराने, प्रवाशांचे हाल
  • Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू
  • आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा
  • Amazon Great Indian Festival 2023 सेल या दिवसापासून होणार सुरू, यावर भरघोस ऑफर्स

करोना संकट संपण्याची चर्चा असतानाच WHO चा इशारा; म्हणाले, “ओमायक्रॉन हा काही शेवटचा…”


करोना संकटाचे ढग हळूहळू कमी होत असून ते लवकरच संपेल असं सांगितलं जात असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मात्र महत्वाचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचे नवे व्हेरियंट वाइल्ड कार्ड असल्याचा उल्लेख करताना ओमायक्रॉन हा काही शेवटचा व्हेरियंट नसून अजून काही नवे व्हेरियंट समोर येण्याची मोठी शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रश्नोत्तराचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड १९ तांत्रिक प्रमुख मारिया वॅन केरखोव्ह यांनी आरोग्य संघटना ओमायक्रॉनच्या चार वेगवेगळ्या प्रकारांची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे.

“आपल्याला या व्हायरसबद्दल बरीच माहिती आहे. पण आपल्याला सर्वच माहिती नाही. खरं सांगायचं तर हे व्हेरियंट म्हणजे वाइल्ड कार्ड आहेत. उत्परिवर्तित होत असताना होणाऱ्या बदलांमुळे आम्ही व्हायरसचं रिअल टाइममध्ये ट्रॅकिंग करत आहे. या व्हायरसकडे अजूनही बाहेर पडण्यासाठी बरीच जागा आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“ओमायक्रॉन हा सध्या चिंता वाढवणारा व्हेरियंट आहे. पण जागतिक आरोग्य संघटना भाष्य किंवा चिंता व्यक्त करत असलेला हा अखेरचा व्हेरियंट नसेल. पुढील व्हेरियंट कदाचित अजून थोडा वेळ घेईल. पण ज्या वेगाने हा पसरत आहे त्यातून नवीन व्हेरियंट येण्याची शक्यता खूप जास्त आहे,” असं त्यांनी यावेळी सांगितलं.

“त्यामुळे आपल्याला लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून तो रोखण्यासाठी पावलंही उचलावी लागणार आहेत,” असं मारिया यांनी सांगितलं आहे.

The post करोना संकट संपण्याची चर्चा असतानाच WHO चा इशारा; म्हणाले, “ओमायक्रॉन हा काही शेवटचा…” appeared first on Loksatta.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …