रणबीरनंतर ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाचं ‘बीफ प्रेम’, Video एकदा पाहाच; विवेक अग्निहोत्री ट्रोल

मुंबई: शुक्रवारी ०९ सप्टेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ हा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर (Alia Bhatt Ranbir Kapoor Brahmastra Released) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान गेल्या जवळपास महिनाभरापासून हा सिनेमा बॉयकॉट केला जावा असा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला जात आहे. सिनेमावर नेटकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याची विविध कारणं आहे. यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे, रणबीरचा ११ वर्षांपूर्वीचा (Ranbir Kapoor Beef Video) एक व्हिडिओ.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीर त्याला बीफ आवडत असल्याचे म्हणतो. त्याच्या याच व्हिडिओमुळे अभिनेत्याला आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलियाला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातही प्रवेश नाकारण्यात आल्याचे समोर आले होते. दरम्यान रणबीरच्या ‘बीफ प्रेमाची’ सोशल मीडियवर विशेष चर्चा झाली. मात्र यानंतर आणखी एका दिग्दर्शकाचा बीफ संबंधित (Vivek Agnihotri Beef Video) व्हिडिओ व्हायरल होत आहे, जे प्रेक्षकांसाठी धक्कादायक आहे. हा व्हिडिओ आहे ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा.

हे वाचा-विवेक अग्निहोत्रींसोबत रंगायच्या सुशांतच्या गप्पा! दिग्दर्शकाने शेअर केला अभिनेत्याचा हसरा सेल्फी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये विवेक हे सांगताना दिसत आहेत की ते बीफ खातात आणि त्यांना हेही ठावुक आहे की चांगले बीफ कुठे मिळते. सोशल मीडियावर एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत असे म्हटले आहे की, ‘ते तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार नाहीत, हे सांगणार नाहीत की विवेक अग्निहोत्रीदेखील बीफ खातात. पण ही त्यांची वैयक्तिक आवड आहे. पण ही बाब त्यांच्या नरेटिव्ह आणि अजेंडाला साजेशी नाही. तुम्ही अशा लोकांपासून दूर राहा आणि तिकिट खरेदी करून सिनेमागृहांमध्ये जाऊन ‘ब्रह्मास्त्र’ एंजॉय करा’.

विवेक यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या विविध पोस्टमध्येही अनेक युजर्सनी हा व्हिडिओ कमेंटमध्ये शेअर केला आहे. त्यामुळे रणबीरनंतर आता विवेक यांनाही ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले. या व्हिडिओमध्ये विवेक असं म्हणतायंत की, ‘मी हेदेखील लिहिले आहे की सर्वात चांगले बीफ तुम्हाला कुठे मिळेल. मी खूप साऱ्या गोष्टींबद्दल लिहिले आहे. मी आधीही खायचो आणि आताही खातो. माझ्या आयुष्यात काही बदलले नाही.’

हे वाचा-अंगात ताप होता, बसताही येत नव्हतं तरी… ‘आई कुठे काय करते’ फेम आप्पांचं होतंय कौतुक

रणबीर-आलियाच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ शोधून काढत विवेक यांना ट्रोल केले आहे. कारण ब्रह्मास्त्रवर टीका करण्याची संधी विवेक यांनीही सोडली नव्हती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रणबीर आणि विवेक यांचे चाहतेही एकमेकांशी भिडल्याचं दिसत आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

मुंबईच्या रस्त्यांवर सईचा कॅटवॉग; बॉयफ्रेंडच्या आयडियानं आणली रंगत

मुंबई, 10 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत आहे. सिनेमा आणि आता …

Video: जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत हृतिक रोशनची अशी वागणूक; त्या फॅनला सर्वांसमोर सुनावलं

मुंबई: अभिनेता हृतिक रोशन हा अशा स्टार्सपैकी आहे ज्याच्याभोवती नेहमीच चाहत्यांचा (Hrithik Roshan Video Viral …