Breaking News

RTE: नामांकित शाळेत मोफत प्रवेशासाठी पालकांची शक्कल, धक्कादायक प्रकार समोर

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शिक्षणहक्क कायद्यातंर्गत (Right to Education, RTE) नामांकित खासगी शाळांमध्ये (Private School Admission) मोफत प्रवेश मिळण्यासाठी, आपण शाळेच्या परिसरातील रहिवासी असल्याचे भासविण्यासाठी पालकांनी चुकीच्या पद्धतीने भाडेकरार केले आहेत. या भाडेकरारांमुळे मुलांचे प्रवेश शाळेत जाहीर झाले असून, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी (Document Verified) सुरू आहे. एकाच व्यक्तीने शाळेजवळील स्वत:च्या मालमत्तेच्या साधारण २७ पालकांसोबत भाडेकरार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. भाडेकरार हे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत असल्याने, शिक्षण विभागाला कारवाई करता येत नसल्याचे चित्र आहे.

‘आरटीई’च्या अंतर्गत राखीव प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना घरापासून तीन किलोमीटरपर्यंत अंतरावरील खासगी शाळेतील २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतात. आगामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या पुण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. या प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या पालकांना लॉटरी पद्धतीने प्रवेश जाहीर झाले असून, या पालकांना आपल्या मुलांचे प्रवेश येत्या २९ एप्रिलपर्यंत निश्चित करायचे आहे. प्रवेश निश्चत करण्यासाठी पालकांनी ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, निवासी पुरावा अशा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि पडताळणी करायची आहे.

MBBS Admission: वैद्यकीय प्रवेशासाठी आणखी एक संधी; मुंबईत जेजे, कूपरसारख्या कॉलेजांमध्येही जागा
SSC HSC Result: दहावी-बारावी पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात, निकालाबद्दल जाणून घ्या
मात्र, या पडताळणीदरम्यान नामांकित शाळा मिळण्यासाठी काही पालकांनी भाडेकराराची मदत घेतली आहे. हे भाडेकरार तयार करणारे ठराविक एजंट व्यक्ती असून, ते पालकांकडून जादा पैसे घेउन अशा पद्धतीने चुकीचे भाडेकरार तयार करून देत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासोबतच राज्यात काही ठिकाणी अशाच पद्धतीने चुकीच्या भाडेकराराद्वारे प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

SSC Result Date 2022: दहावीचा निकाल कधी? अकरावी प्रवेशांच्या संभाव्य वेळापत्रकात दडलंय उत्तर
मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, ७५ हजारपर्यंत मिळेल पगार
पालकांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी ही प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून नेमलेल्या समितीकडून करण्यात येते. मात्र, कागदपत्रे ही सक्षम प्राधिकरणाकडून दिली असल्यास, त्याबाबत आक्षेप घेण्यास अडचणी येतात. अशावेळी कागदपत्रे देणाऱ्या संबंधित प्राधिकरणाने योग्य काळजी घेतल्यास, पुढील असे प्रकार घडणार नाहीत अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.

RTE Admissions 2022: आरटीई प्रवेशांना मुदतवाढ; कधीपर्यंत निश्चित करता येणार प्रवेश…वाचा
FYJC Online Admission 2022: अकरावी प्रवेशांसाठी आता कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous पंजाब आणि चेन्नईच्या ‘किंग्ज’मध्ये आज रंगणार सामना, अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
Next रिलेशनशिपच्या सुरूवातीलाच कपलने कटाक्षाने टाळाव्यात ५ गोष्टी, अन्यथा नातं सुरू व्हायच्या आधीच अविश्वास निर्माण होईल

Check Also

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागांतर्गत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा मार्ग …

Indian Knowledge System: भारतीय ज्ञानपरंपरा रुजणार अभ्यासक्रमात

Indian Knowledge System: मंत्रालयाच्या बरोबरीने विद्यापीठ अनुदान आयोगाचाही या उपक्रमात समावेश आहे. अनेक प्राचीन भारतीय …