पेकोटी पद्धत किंवा पेकोटी सेवन पद्धत या कल्पनेवर कार्य करते. या पद्धतीत नाभीच्या आजूबाजूला विशेष तेल लावले जाते. त्याचा शरीराला विविध प्रकारे फायदा होतो. यामागची धारणा अशी आहे की नेव्हल ऑइलिंग म्हणजेच नाभीमध्ये तेल टाकल्यानंतर शरीरातील मज्जासंस्था सुधारते. आयुर्वेदानुसार, नाभी शरीराचा केंद्रबिंदू आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आणि विकासात महत्वाची भूमिका बजावते. त्यावर लावलेल्या वस्तूचा त्वचेसह संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.
(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )
नारळ आणि कडुलिंबाचे तेल
या तेलासाठी एका भांड्यात नारळ आणि कडुलिंबाचे तेल एकत्र करा. रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रित तेलाचे दोन थेंब नाभीमध्ये टाका. थोडा वेळ तसाच राहू द्या. यानंतर बोटांच्या मदतीने हलके मसाज करा. हे दोन्ही तेल एकत्रितपणे त्वचेला आतून चमकण्यास मदत करतात.
(वाचा :- पार्लरमध्ये जायला वेळ नाही? मग या साणांच्या दिवसात घरीच करा मेनिक्युअर, जाणून घ्या प्रत्येक स्टेप)
मुरुम-पुरळ निघून जातील
त्वचेवर दिसणारे पुरळ आणि पिंपल्स अजिबात चांगले दिसत नाहीत. हे मुरुम त्वचेवर खुणा सोडतात. या समस्येवर मात करण्यासाठी दररोज सुमारे 10 मिनिटे कडुलिंबाच्या तेलाचे दोन थेंब नाभीमध्ये टाका. नंतर कोमट पाण्यात भिजवलेल्या टॉवेलच्या मदतीने स्वच्छ करा.
(वाचा :- गेलेले केस पुन्हा येतील व हेअरफॉल पूर्णपणे थांबेल, करीनाची डाएटिशियन ऋजुताने सांगितले केसांसाठी 3 घरगुती पदार्थ)
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करा
यासाठी लिंबू आणि बदाम तेल एका वाडग्यात मिसळा. मिश्रित तेलाचे दोन थेंब नाभीत टाका आणि १५ मिनिटांनी स्वच्छ करा. हे दोन्ही तेल एकत्रितपणे चेहऱ्यावरील काळे डाग हलके करण्यास तसेच चमक वाढविण्यास मदत करतील.
(वाचा :- World Coconut Day: नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचे आश्चर्यकारक फायदे,आता टॅनिंगची समस्या होणार कायमची दूर)
तूप करेल त्वचा मुलायम
तेलांसह, तुम्ही तूप देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त शुद्ध तुपाची गरज आहे, जे तुम्ही घरी बनवलेले असेल. नाभीत कोमट तूप लावून २० मिनिटे असेच ठेवल्यानंतर मसाज करा. तुपामुळे त्वचा चमकण्यास मदत होते त्याच प्रमाणे कोरड्या त्वचेची समस्याही दूर होईल. कोरड्या ओठांची समस्याही दूर करते.
(वाचा :- प्रियांका चोप्राचे लॉस एंजेलिसमधील अलिशाल घर, पण तिच्या चेहऱ्यावरील चमक घरा पुढेही फिकी)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या