Out of School Student: जुलै महिन्यात २०९ मुले शाळाबाह्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या सर्वेक्षणात २०९ मुलांनी शाळा सोडल्याचे आढळले आहे. दौंड तालुक्यात सर्वाधिक मुले शाळाबाह्य असल्याचे आढळले, तर बारामती, पुरंदर, भोर, इंदापूर, जुन्नर, खेड, मुळशी, वेल्हे या तालुक्यात मात्र एकही विद्यार्थी शाळाबाह्य नसल्याची माहिती समोर आली आहे.

वंचित समाजाचे स्थलांतर अधिक
करोनाकाळात दोन वर्षांत अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. त्यात तीन ते १८ वर्षे वयातील अनेक मुले शाळाबाह्य झाल्याचे आढळले आहे. निम्न आर्थिक स्तर असलेल्या वंचित समाजातील गटातील, भूमिहीन किंवा अल्पभूधारक गटातील कुटुंबे सप्टेंबर ते मेदरम्यान मोठे स्थलांतर करतात. वीटभट्टी, दगडखाण, कोळसा खाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय; तसेच रस्ते, नाले, जिनिंग मिल या प्रकारच्या कामासाठी ही कुटुंबे स्थलांतर करतात.

मुलांसाठी शोधमोहीम
स्थलांतरित, शाळाबाह्य मुलांचे शिक्षण थांबविले जाऊ नये, यासाठी राज्यात मार्च २०२१ आणि या वर्षीच्या मार्चमध्ये शाळाबाह्य मुलांसाठी विशेष शोधमोहीम घेण्यात आली होती; परंतु करोनामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू नव्हत्या. त्यामुळे या शोध मोहिमांत अडथळा निर्माण झाला असून, ही मोहीम प्रभावीपणे पूर्ण करता आली नाही.

Distance आणि Online पदवींना नियमित मान्यता, यूजीसीच्या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
Irrigation Department Job: राज्याच्या पाटबंधारे विभागात भरती, जाणून घ्या तपशील
जिल्ह्यात १० लाखांचे सर्वेक्षण
पुणे जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रॉपआउट’ ही मोहीम पाच ते २० जुलैदरम्यान राबविण्यात आली. त्यातून शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी मोहीम राबवली गेली. जिल्ह्यातील आठ लाख आठ हजार ९२३ कुटुंबातील १० लाख २३ हजार ७७५ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पहिली ते आठवीतील सहा ते १४ वर्षे वयातील २०९ शाळाबाह्य मुले आढळली. या मुलांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले दौंड तालुक्यात आढळली असून, तेथे १२६ मुले होती. आंबेगाव तालुक्यात चार, तर हवेली तालुक्यात १३, मावळमध्ये ३१, शिरूरमध्ये ३५ शाळाबाह्य मुलांचा समावेश होता.

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेसाठी गाव, वाडी, वस्ती ते तालुका आणि जिल्हास्तरावर जबाबदारी देण्यात आली होती. उपक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवी संस्था, तालुका; तसेच जिल्हास्तरावरील पदाधिकारी यांचाही सहभाग होता अशी प्रतिक्रिया आयुष प्रसाद यांनी दिली.

धक्कादायक! एड्सबाधित मुलाला शाळेत प्रवेश नाहीच

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

अमेरिकेत शिक्षणासाठी ८२ हजार विद्यार्थ्यांना व्हिसा

म. टा. प्रतिनिधी, पुणेअमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, यंदा अमेरिकेच्या दूतावास …

Asha Swayamsevika Job: आशा स्वयंसेविका पदांची भरती, आठवी उत्तीर्ण महिलांना सरकारी नोकरीची संधी

Asha Swayamsevika Recruitment: तुमच्या ओळखीत कोणी आठवी उत्तीर्ण महिला नोकरीच्या शोधात असेल तर तुम्ही त्यांची …