सुष्मिताच्या लेकीचा वाढदिवस, पार्टीमध्ये पोहोचले अभिनेत्रीचे दोन एक्स बॉयफ्रेंड
पुष्पा सिनेमाचा सीक्वल येत आहे. त्यासाठी अल्लू अर्जुननं किती फी आकारलीय ठाऊकेय का ? तो घेतोय १२५ कोटी रुपये. हा आकडा ओळखीचा वाटत असेल, तर मुकतच सलमान खानच्या सिनेमाचं मानधन समोर आलं होतं. ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमासाठी सल्लूमियाँनंही १२५ कोटी रुपये फी घेतली आहे. म्हणजे आता अल्लू अर्जुन सलमान खानच्या बरोबरीन फी घेतोय. त्यानं अक्षय कुमारलाही मागे टाकलं आहे. हायेस्ट पेड स्टारमध्ये आता हा अभिनेता वरच्या स्थानावर पोहोचलाय.
अलिकेडच सिनेमाच्या निर्मात्यांनी ‘पुष्पा द रूल पार्ट २’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून त्याआधी सेटवर पूजा करण्यात आली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सिनेमाचे लेखन सुकुमार यांनी लिहिला असून त्याची निर्मिती मॅथरी सिनेमानं केली आहे. सोशल मीडियावर सेटवर झालेल्या पूजेचे फोटो निर्मात्यांनी शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, ‘#PushpaTheRule पूजा विधीचे काही हायलाइट.’
ऐश्वर्या राय आणि विक्रम यांचा ‘पोन्नियन सेल्वन’ चा तुफान ट्रेलर रिलीज
या सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याबरोबर या सिनेमात फहाद फाजिल, धनुंजया, सुनील, अनसूया भारद्वाज हे कलाकारदेखील आहेत. तर टेक्निकल टीममध्ये लेखक, पटकथा लेखक, निर्माता म्हणून सुकुमार बांद्रेदी यांचा समावेश आहे. सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर मिरेस्लो कुबा ब्रोसक आहेत. सिनेमाचं बजेट ४५० कोटी रुपये असल्याचं म्हणतायत.
आदित्य ठाकरेंची बाप्पाच्या दर्शनासाठी अर्पिता खानच्या घरी हजेरी
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या