सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले मराठी-कोकणी कुटुंबातून आल्या. वयाच्या 9व्या वर्षीच त्यांनी वडील गमावले. त्यानंतर, त्यांची बहीण आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गाणे आणि चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. 16 व्या वर्षी आशा भोसले यांनी 31 वर्षीय गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले, त्यांना तीन मुले झाली. अखेरीस 1960 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. 1980 मध्ये त्यांनी राहुल देव बर्मन यांच्याशी लग्न केले. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)
गाणं जमलं नसतं तर स्वयंपाक हीट झाला असता
आशा भोसले यांची कारकीर्द वाढत असताना मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. एक गोष्ट त्यांच्यासोबत राहिली ती म्हणजे त्यांची स्वयंपाकाची आवड, जो त्यांचा आवडता छंद. बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेले पदार्थ म्हणजे बिर्याणी, कढई घोश्त, गोवन फिश करी आणि डाळ हे आशा भोसले यांचे सर्वात लोकप्रिय पदार्थ आहेत.
यामुळेच त्यांना दुबई आणि कुवेतमध्ये यशस्वी रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केले. एवढेच नव्हे तर आशा भोसले यांनी तेथे वैयक्तिकरित्या शेफला सहा महिने प्रशिक्षण दिले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने असेही सांगितले की, जर त्यांची गाण्याची कारकीर्द सुरू झाली नसती तर त्यांनी स्वयंपाक करायला घेतला असता.
(वाचा – Diabetes Myths: डायबिटीज कधीच बरा होत नाही असं तुम्हाला पण वाटतं? तर 5 मधुमेहासंबंधातील गैरसमज जाणून घ्या)
आशा भोसले छंद जोपासताना
छंद मानसिक आरोग्य राखण्यास करते मदत
आशा भोसले यांच्यासाठी, गायनाची कारकीर्द यशस्वी असूनही स्वयंपाक हा त्यांचा आवडता छंद राहिला. जेव्हा बहुतेक लोक आपल्या आवडीच्या गोष्टी जपण्यासाठी धडपडत असतात तेव्हा याची जाणीव प्रकर्षाने जाणवते. मग ते कामाचा ताण, स्पर्धा किंवा इतर कोणताही ताण असो, मनाला समाधान देणाऱ्या उपक्रमांसाठी वेळ काढू शकत नाही तेव्हा चिडचिड होते. मग ते गिटार वाजवणे, पुस्तक वाचणे किंवा व्यायाम करणे असो यामधून प्रत्येकाचा छंद जोपासला जातो.
(वाचा – फक्त डाएट आणि वर्कआऊटच नाही तर अतुल कुलकर्णीची ‘ही’ गोष्ट अतिशय खास, ज्यामुळे 57 व्या वर्षी दिसतो चिरतरूण)
छंद मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचे
- तणाव कमी होतो
- सामाजिक संवाद सुधारतो
- चिंता आणि नैराश्याचा कमी धोका
- इच्छाशक्ती वाढते
- नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो
- काम आणि शैक्षणिक दबावापासून ब्रेक
(वाचा – Low Blood Pressure ला 2 मिनिटांत नॉर्मल करेल आयुर्वेदिक डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला, स्वस्त आणि अतिशय प्रभावी उपाय))
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या