मौनी रॉयने या वर्षी जानेवारीत बिझनेसमॅन सूरज नांबियारसोबत लग्न केलं आहे. मौनीला नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं की, दोनाचे तीन कधी होणार आहात?’ अर्थातच बेबी प्लॅनिंग, यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आणि सूरजच्या लग्नाला फक्त 8 महिने झाले आहेत. आणि त्यांचे कुटुंबीय खूप सपोर्ट करत आहेत. सध्या माझ्यावर आई होण्यासाठी कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा कोणताही दबाव नाही. माझ्या करिअरबद्दल घरातील लोक फार आनंदी आहेत. त्यामुळे मी सध्या निवांत आहे.
मौनी रॉय पुढे म्हणाली, ‘जिथे माझ्या प्रायॉरिटीचा प्रश्न आहे, आई बनणं माझ्या प्रायॉरिटीत सर्वात शेवटी आहे’. मौनी सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. मौनीने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 2019 मध्ये ती अयान मुखर्जीसोबत मनालीमध्ये दिसली होती. ही छायाचित्रे पाहून चाहते चित्रपटातील अभिनयासाठी मौनीचं कौतुक करत आहेत.या चित्रपटात मौनी जुनून या खलनायिकेच्या भूमिकेत दिसली आहे.
(हे वाचा:Brahmastra Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’चा बोलबाला; पाचव्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई )
मौनी रॉयने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. देवों के देव महादेव आणि नागिन या मालिका विशेष गाजल्या होत्या. या मालिकेतून मौनी घराघरात पोहोचली होती. त्यानंतर ती गोल्ड या सिनेमातून अक्षय कुमारसोबत झळकली होती. तसेच ती एका डान्स रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता मौनी ब्रह्मास्त्रमुळे चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या