केआरकेने नुकतंच एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या ट्विटमध्ये केआरकेने आपल्याला 10 दिवस तुरुंगात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला. आणि आपण तुरुंगात कसे दिवस काढले याबाबत सांगितलं आहे. अभिनेत्याचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये केआरकेनं ज्या अंदाजात सर्वकाही सांगितलं आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे. नेटकरी त्याची प्रचंड खिल्ली उडवत आहेत.
केआरकेनं ट्विट करत लिहलंय, ‘मी 10 दिवस तुरुंगात केवळ पाणी पिऊन काढले आहेत. त्यामुळे माझं तब्बल 10 किलो वजन घटलं आहे’. अभिनेत्याच्या या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकरी यावर मजेशीर कमेंट्स करत केआरकेला धारेवर धरत आहेत. अनेकांनी प्रतिक्रिया देत केआरकेची खिल्ली उडवली आहे. हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लगेचच केआरकेने ट्विट करत पुहा एकदा खळबळ माजवली आहे.
I was surviving with only water for 10 days in lockup. So I have lost 10 kg weight.
— KRK (@kamaalrkhan) September 13, 2022
(हे वाचा:अजय देवगण-सिद्धार्थ मल्होत्राला ‘ते’ दृश्य भोवलं; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल )
केआरकेला त्याच्या दोन वर्षामागील एका ट्विटमुळे अटक करण्यात आलं होतं. या अभिनेत्याने 2020 मध्ये एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. मालाड पोलिसांनी अभिनेत्याला एयरपोर्टवरुनच चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला बोरिवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं होतं. अशाप्रकारे केआरके तब्बल १० दिवस तुरुंगात होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या