मी माझ्या आयुष्यात काहीही करो… एक्स्टा मॅरेटिअल अफेअरच्या आरोपांवर स्पष्टच बोलली निशा रावल

मुंबई: छोट्या पडद्यावरच्या सेलिब्रिटी जोडप्यांची नेहमीच चर्चा होत असते. कपल्स गोल्स देणाऱ्या या जोडप्यांच्या आयुष्याची खरी बाजू पाहिल्यानंतर मात्र चाहत्यांना धक्का बसतो. असंच एक जोडपं म्हणजे करण मेहरा आणि निशा रावल. गेल्या वर्षी या दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतरही ते दोघं कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतात.

आता पुन्हा एकदा निशानं करणवर आरोप करत या प्रकरणाला हवा दिली आहे. काही दिवसांपूर्वी करणनं निशाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानं निशावर गंभीर आरोप केले होते. आता पत्रकार परिषद घेऊन निशानं या आरोप नाकारले आहेत. सामंजसपणे हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं निशानं म्हटलं आहे.
आम्ही बघतो म्हणून काहीही दाखवतात… ‘तो’ एपिसोड पाहून महिला प्रेक्षक भडकल्या
या पत्रकार परिषदेत निशानं तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. करण तिची बदनामी करतोय, असा आरोप केलाय. तसंच करणनं माझ्यावर केलेल्या आरोपांवर बोलण्यासाठी मी इथे आलेय, असंही निशा म्हणाली. मी गप्प आहे, शांत आहे म्हणून कोणी मला कमकूवत समजण्याची चूक करू नये. मी माझ्या आणि माझ्या मुलाच्या गरजा पूर्णकरण्यासाठी धडपडतेय. कोणावर आरोप करण्यात मला काही रस नाही. मला कोणाबद्दल काहीही बोलायचं नाही, मी फक्त माझा बचाव करतेय, कारण या माझ्या मुलाची यात काही चुक नाही, असं निशा म्हणाली.
गुटखा विकून चुकून वेळ मिळाला तर … बॉलिवूड कलाकारांवर प्रकाश झा यांची टीका
निशाचं तिच्या मानलेल्या भावासोबत सोबत एक्स्टा मॅरेटिअल अफेअर सुरू आहेस, असा आरोप करणनं केला होता. यावर निशानं तिची बाजू मांडली आहे. आम्ही आता वेगळे झालोय. त्यामुळं मी माझ्या आयुष्यात काय करते, काय नाही याचं करणशी काहीच देणं घेणं नाही. आमच्या भांडणाचा सध्या तमाशा सुरू आहे. मला हे सगळं नको, शांतपणे बोलून , समजून हा वाद मला मिटवायचाय, असं निशानं स्पष्ट केलंय.

करण आणि निशा टीव्ही इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल म्हणून ओळखलं जात होतं. २००८मध्ये ‘हंसते-हंसते’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंचर २०१२मध्ये दोघांनी लग्न केलं. तर २०१७मध्ये निशानं मुलगा कविश याला जन्म दिला.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘राजसा जवळी जरा बसा’ फेम लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेकर याचं निधन

मुंबई, 14 सप्टेंबर : महाराष्ट्राला लावणीची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक जुन्या मराठी सिनेमांमध्ये अनेक …

या दिवशी रिलीज होणार ‘आदिपुरुष’चा जबरदस्त टीझर; राम अवतारात दिसणार प्रभास

 मुंबई, 14 सप्टेंबर : भारतात बाहुबली अशी ओळख अभिनेता म्हणजेच प्रभास. बाहुबलींनंतर प्रभासने अतिशय मोजकेच …