माझं यश माझ्या नात्यातील सर्वात मोठी अडचण झाली आहे

प्रश्न: माझ्या पतीने माझ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मला व्यवसाय सुरु करायला सांगितला. मला असा पती मिळाला म्हणून घरातील प्रत्येक व्यक्ती माझा हेवा करत होती. पण आता माझ्या व्यवसायाने वेग घेतला आहे. मला यश मिळाल्यावर माझा पती मात्र अस्वस्थ झाला आहे. माझं यश माझ्या नात्यातील सर्वात मोठी अडचण झाली आहे. माझा पती मला नेहमी सांगतो की माझ्याकडे त्याच्यासाठी किंवा आमच्या मुलीसाठी वेळ नाही आणि मी माझ्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहे. पण तसे नाही आहे मला जेवढे जमेल तेवढे मी माझ्या घरासाठी आणि माझ्या मुलासाठी करत आहे. पण यावेळी माझ्या पतीच्या डोळ्यात माझे यश खुपताना मला दिसत आहे. या सर्वाचा परिणाम माझ्या वैयक्तिक आयुष्यावर होताना दिसत आहे. मला कळत नाही आहे मी काय करु ? (सर्व फोटो सूचक आहेत, आम्ही वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या कथांमध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवतो)

तज्ञांचे उत्तर

यावेळी डॉ चांदनी तुगनाईत म्हणतात ही परिस्थिती कशी हाताळायची याबद्दल तुम्ही संभ्रमात आहात ही गोष्ट स्पष्ट आहे. तुमचा व्यवसाय आणि तुमचे आयुष्य सांभाळ्यासाठी तुम्हीला फार कठीण जात आहे ही गोष्टी स्पष्ट आहे.तुमच्या जोडीदाराशी मजबूत नातेसंबंध राखून व्यवसाय चालवताना संतुलन राखणे कठीण होऊ शकते. या सर्वामध्ये तुमचा पती खूप सपोर्टिव्ह आहे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण तुमच्या यशावर तुमच्या पतीचे असे वागणे अयोग्य आहे. यासाठी तुमच्या वैयक्तिक कामांमध्ये तुम्ही दोघे एकमेकांना कसे सहकार्य कसे मिळवू शकता यासंबंधी चर्चा करा.

(वाचा :- प्रेमासाठी वाट्टेल ते! राणी एलिझाबेथसाठी प्रिन्स फिलिपने सोडला होता राजपाट… या लव्हस्टोरीतून तुम्ही काय शिकणार?)

​मुलीसाठी वेळ काढा

तुमच्या वस्त आयुष्यातून तुमच्या परिवारासाठी आणि मुलीसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक आठवड्यात काही तासांचा असला तरी तुमच्या परिवाराला देण्याचा प्रयत्न करा. तुम्‍ही तुमच्‍या पतीला व्‍यवसायात त्‍याला शक्य तितका सामील करण्‍याचा प्रयत्‍न करू शकता. एकत्र काम करून, तुम्ही तुमच्या पतीला तुमच्या कामात सामील करण्याचा प्रयत्न करा. कुटुंब प्राधान्य राहील याची खात्री करेल. यामुळे तुमच्या नात्यात एक नविन धाका निर्माण होईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखणे देखील महत्त्वाचे आहे.

(वाचा :- नोकरदार महिलांचे लग्न कसे टिकते? सुधा मूर्ती यांनी यशस्वी स्त्रियांच्या सुखी वैवाहिक जीवनाचे सांगितले रहस्य)

​प्रत्येक नाते वेगळे आहे

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की प्रत्येक नातेसंबंध वेगळे असतात आणि एका जोडप्यासाठी जे कार्य करते ते दुसऱ्यासाठी कार्य करू शकत नाही. हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की पतीने आपल्या पत्नीच्या व्यवसायाला पाठिंबा दिल्याने त्याचा अर्थ असा नाही की जेव्हा तिला गरज असते तेव्हा तिला पाठिंबा न देणं नातेसंबंधात दोन्ही एकसमान असतात. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या.

(वाचा :- ब्रेकअपनंतरही एक्सची आठवणीने असह्य त्रास होतोय?, जाणून घ्या यातून वेदनेतून कसं बाहेर पडावं)

​संतुलन आणण्याचा प्रयत्न करा

तुम्ही तुमच्या व्यवसायात जास्त वेळ घालवत असल्यामुळे तुमच्या पतीकडे दुर्लक्ष होत असेल असे तुमच्या पतीला वाटत असेल तर त्याच्याशी बोला आणि कुटुंब आणि व्यवसाय यांच्यात तुमचा वेळ संतुलित करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होईल.

(वाचा :- ही आहेत फसवणूक करणाऱ्या जोडीदाराची लक्षणे, या मार्गांनी ओळखा तुमचा जोडीदार कसा आहे)

​संवाद साधा

या स्थितीत समजूतदारपणा, दयाळूपणा आणि धीराने काम करा. नवीन बदलाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागेल पण ही गोष्ट अशक्य नाही. या स्थितीत तुमच्या पतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- माझी कहाणी : माझा पती जुन्या विचारांचा आहे,माझ्या आयुष्यात आता फक्त बंधने आणि संशय राहिला आहे मी काय करु?)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Interesting News : हिटलरच्या नाकावर टिच्चून काम करणाऱ्या ‘या’ भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर कोण, माहितीये?

Indian female spy : Detective, Spy अर्थात गुप्तहेर, त्यांची काम करण्याची पद्धत या साऱ्यावर बरेच …

मी ज्या मुलीवर आकंठ प्रेम केलं ती माझी वहिणी बनणार आहे

ते म्हणतात ना काही गोष्टी या तुम्हाला जन्मत: मिळालेल्या असतात. म्हणजे कितीही काही करून तुम्ही …