घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर हनी सिंगचा घटस्फोट; पत्नीला द्यावी लागणार इतक्या कोटींची पोटगी

मुंबई: पंजाबी गायक यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने (Yo Yo Honey Singh and Shalini Talwar) गेल्या वर्षी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. शालिनीने यावेळी गायकवर गंंभीर आरोप ठेवत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. हनी सिंगवर त्याच्या पत्नीचे घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासह अनेक गंभीर आरोप होते. आता या दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला असून शालिनीला पोटगी म्हणून कोट्यवधींची रक्कम मिळाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार शालिनीने हनी सिंगकडून घटस्फोटासाठी १० कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. मात्र आता दोघांमध्ये एक कोटी रुपयांवर तडजोड झाली आहे. हनी सिंग आणि शालिनी यांचा आता अधिकृत घटस्फोट झाला आहे. हनी सिंगने गुरुवारी दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात शालिनीला पोटगी म्हणून एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

हे वाचा-बाॅयकाॅट करणाऱ्यांना ‘ब्रह्मास्त्र’नं दाखवला इंगा, रिलीजआधीच रेकाॅर्डब्रेक कमाई!

मारहाणीचा गंभीर आरोप

गुरुवारी न्यायालयात हनी आणि शालिनी यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचे प्रकरण मिटले. दोघांमध्ये आता एक कोटी रुपयांचा करार झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च २०२३ रोजी होणार आहे. त्यामध्ये पुढील प्रस्तावावर सुनावणी होईल. शालिनीने ३ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यात तिने रॅपर यो यो हनी सिंगवर हनी सिंगवर गंभीर आरोप केले होते. तिने हनी सिंगवर मारहाणीचा आरोप केला होता. हिरदेश सिंग उर्फ यो यो हनी सिंग याच्यासोबतच्या लग्नासाठी तिने १० वर्ष दिली, पण या बदल्यात तिला मानसिक आणि शारिरीकरित्या छळण्यात आले.

अनैतिक संबंधांचाही होता आरोप

शालिनी तलवारने आणखी एक गंभीर आरोप तिच्या पतीवर केला होता, तो म्हणजे हनी सिंगचे इतर महिलांसोबत अनैतिक शारिरीक संबंध होते. तिच्या मते त्याने आंतरराष्ट्रीय दौऱ्यांच्या बहाण्याने अनेक महिलांसोबत असे संबंध बनवले होते, त्यांच्यासोबतही तो जनावरांप्रमाणे वागत असे. त्यामुळेच तिला त्याच्यापासून वेगळे व्हायचे आहे. दरम्यान शालिनीने १० कोटींच्या पोटगीची मागणी केली होती, मात्र तिला १ कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाल्याची माहिती समोर येते आहे.

हे वाचा-गोंधळून गेलेलं मन आणि समोर आश्वासक मूर्ती, सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला

हनी सिंगने फेटाळले आरोप

या आरोपांनंतर हनी सिंगने ६ ऑगस्ट २०२१ रोजी सोशल मीडियावर एक नोट शेअर करत हे सर्व आरोप फेटाळले होते. तो म्हणाला की, माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत, हे फार दुःखद आहे. या आरोपांनी मला खूप त्रास दिला. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत निषेधार्ह असून मला त्रास देण्यासाठी करण्यात आले आहेत.

२० वर्षांची लव्ह स्टोरी आणि १० वर्षांचं लग्न

हनी सिंग आणि शालिनी यांचं शाळेत असल्यापासून एकमेकांवर प्रेम होतं. २०११ मध्ये त्यांनी लग्न केलं. त्याआधी ते शाळेपासून अर्थात साधारण २० वर्ष डेट करत होते. त्यानंतर त्यांनी १० वर्षांचा संसार केला.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

तब्बल 83 सामन्यानंतर शतक मारलेल्या विराटला, अनुष्का फक्त चार शब्दात म्हणाली

मुंबई, 9 सप्टेंबर-   आशिया चषक 2022 मध्ये काल भारतानं अफगाणिस्तानविरोधात सुपर फोर फेरीतली औपचारिक लढत …

महाकाल मंदिरात विरोधानंतर रणबीर पोहोचला लालबागच्या राजाच्या चरणी; समोर आला VIDEO

मुंबई, 9 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर भट्टने आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं …