कोहलीने डावाच्या सुरुवातीला सावध फलंदाजी केली. पहिल्या ११ चेंडूत कोहलीने १० धावा केल्या. डावाच्या सहाव्या षटकात कोहलीला गती मिळाली. त्याने मुजीब उर रहमानच्या चेंडूवर २ चौकार आणि एक षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. यानंतर कोहलीने मागे वळून पाहिले नाही. अर्धशतकानंतर कोहलीने दिमाखदार फटकेबाजी करत शतकाकडे कूच केलं. जसजसं तो शंभरीच्या जवळ पोहोचत होता, तसंतसं करोडो फॅन्सच्या हृदयाचे ठोके वाढत होते. पण विराटने यावेळी कुठलीही चूक केली नाही. १००० हजार दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कोहलीने हवेत बॅट उंचावली.
विराटच्या शतकानंतर अनेक क्रिकेटपटूंनी त्याचं अभिनंदन केलंय आणि त्याला शुभेच्छा दिल्यात. मिस्टर ३६० एबीडीने ट्विटमध्ये म्हटलंय, मी काल त्याच्याशी (विराट कोहली) बोललो तेव्हा मला कळले की काहीतरी मोठा धमाका होणार आहे आणि कालच विराटने शतक ठोकलं. मित्रा वेल प्लेड, मस्त खेळलास”. त्याचबरोबर ए बी डिव्हिलियर्सने विराटसोबतचा एक खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. एका स्कूटरवर बसून दोघे निवांत गप्पा मारताना दिसून येत आहेत. ७१ वं शतक आलं, तसे आणखीही शतकांची माळ लागेल, असा आशावाद एबीडीने ल्यक्त केलाय.
बायको अन् मुलीला शतक समर्पित
“जेव्हा मी शतक झळकावलं तेव्हा मी माझी रिंग पहिल्यांदा किस केली. मी इथे उभा आहे ते फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीमुळे, ती व्यक्ती म्हणजे अनुष्का. प्रत्येकवेळी ती माझ्याबरोबर उभी राहिली. त्यामुळे हे शतक मी तिला समर्पित करतो आणि त्याचबरोबर माझी लहान मुलगी वामिकालाही हे शतक समर्पित करतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर कायम असते तेव्हा काही गोष्टी सोप्या होतात”.
“छोट्याशा सुट्टीनंतर जेव्हा मी संघात परतलो, तेव्हा मला खूप भारी वाचत होतं. त्यापूर्वी मी सहा आठवड्यांची सुट्टी घेतली होती. या सुट्टीमध्ये मी किती थकलो आहे, हे मला जाणवले. या एका ब्रेकमुळे मला पुन्हा एकदा खेळाचा आनंद लुटता आला”, असं विराट म्हणाला.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या