”माझे सुपर हिरो” आजोबांच्या निधनानंतर महेशबाबूच्या मुलीची पोस्ट व्हायरल, असं करा तुमच्या आजोबांसोबतचे नातं घट्ट

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते कृष्णा हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी सकाळी रुग्णालयात निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हे वर्ष दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू अतिशय दु:खाचे आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. यावर्षाच्या सुरुवातीला महेश बाबूने त्याचा भावाला, मग आई आणि आता बाबांना गमवलं. अशात लेकीनं सितारा हिनं आजोबांच्या आठवणीला उजाळा देणारी एक भावुक पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टवरून सितारा तिच्या आजोबांशी भावनिकरित्या जुळलेली होती हे लक्षात येतं. तिच्या या पोस्टमधून तुम्ही देखील अनेक गोष्टी शिकू शकता. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीसोबतचे नाते कसे घट्ट करावे. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​काय आहे पोस्ट

यावेळी सिताराने तिच्या लाडक्या आजोबांसाठी एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये तीने लिहले की सुट्टीच्या दिवशी केला जाणारे जेवण आता पुन्हा पूर्वीसारखे होणार नाही.. तुम्ही मला आयुष्यात खूप मौल्यवान गोष्टी शिकवल्या.. माझ्या चेहऱ्यावरील हास्य नेहमी कायम ठेवले. पण आता फक्त तुमच्या आठवणी उरल्या आहेत. तुम्ही माझे हिरो आहात मला आशा आहे की मी तुला कधीतरी अभिमान वाटेल. मला तुझी खूप आठवण येईल आजोबा. (वाचा :- “आयुष्याच्या या वळणावर जोडीदार असावा असं वाटतं,” रतन टाटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

हेही वाचा :  नम्रता शिरोडकरनं लग्नाच्या 17 वर्षांनंतर केला गौप्यस्फोट; म्हणाली, 'म्हणून मी करिअर सोडले...'

​आजी आजोबांसोबत वेळ घालवा

नातू किंवा नात आजी आजोबांच्या आयुष्यातील शेवटचा मित्र असतो. तर आजी आजोबा नातवाच्या आयुष्यातील पहिले मित्र. पण भारतात, लोक बऱ्याच काळापासून संयुक्त कुटुंबात राहतात, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना जबाबदाऱ्या आणि बदलांमुळे लहान कुटुंब म्हणून जगावे लागते. पालकांसोबत वाढलेली मुले शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने मूळ घरापासून दूर इतर शहरात राहण्यास भाग पाडतात. यामुळे मुलांना त्यांच्या आजी आजोबांसोबत वेळ घालवता येत नाही. पण असे करु नका. (वाचा :- डेटिंग अ‍ॅपवर प्रेम आणि मग क्रुर हत्या आफताब हा काही पहिला क्रूरकर्मा नाही, या काही कहाण्या थरकाप उडवतील)

​एक-दोन महिन्यात जुन्या घराला भेट द्यायलाच हवी

ज्या पालकांना आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांपासून मजबुरीमुळे दूर राहावे लागते, ते शक्य असल्यास एक-दोन महिन्यांत आपल्या जुन्या घराला भेट देऊ शकतात. असे केल्याने, ते त्यांच्या पालकांना भेटण्यास सक्षम असतील, तसेच त्यांचे मूल त्यांच्या आजी-आजोबांना ओळखण्यास आणि समजून घेण्यास सक्षम असेल. अशा परिस्थितीत मुलाला आजी-आजोबांसोबत वेळ घालवता येईल आणि त्यांच्यासोबत अविस्मरणीय क्षण जगता येतील. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  माझी कहाणी : माझा नवराच मुलाच्या जीवावर उठलाय, मला त्याची खूप भीती वाटते मी काय करु ?​

​जुने किस्से सांगा

ज्या पालकांना आपल्या मुलांसह लहान कुटुंबात राहावे लागते ते आपल्या लहानपणापासूनच्या गोष्टी सांगून मुलांना नातेसंबंधांचे महत्त्व समजावून सांगू शकतात. आजी आजोबांच्या गोष्टी ऐकून लहान मुले त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शिकू शकता. (वाचा :- माझी कहाणी : लग्नाच्या 5 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या EX ला भेटले, त्यानंतर जे झालं ते सांगायला ही मला लाज वाटते)

​कौटुंबिक सहल

कौटुंबिक सहल हा नातेसंबंधांमध्ये बंध वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही तुमच्या पालकांसह आणि मुलांसोबत कुठेतरी कौटुंबिक सहलीची योजना आखता आणि तेथे दर्जेदार वेळ घालवता. या दरम्यान, आपल्या मुलांना शक्य तितक्या त्यांच्या आजी-आजोबांकडे ठेवा. (वाचा :- माझी कहाणी : माझा नवराच मुलाच्या जीवावर उठलाय, मला त्याची खूप भीती वाटते मी काय करु ?)

​नात्यांचे महत्त्व समजावून सांगा

लहानपणीच जर मुलांना नात्यांचे महत्त्व समजावून सांगितलेत तर त्यांना नात्यांचे महत्त्व कळू शकेल. त्यांच्या मनात सन्मान निर्माण होईल त्यामुळे लहानपणापासून त्यांना आजी आजोबांची सवय लावा. (वाचा :- माझी कहाणी : एका महिन्यात माझं १० किलो वजन वाढलं, नात्यातील नैराश्यामुळे माझ्या खाण्यावर माझे नियंत्रण नाही)

हेही वाचा :  Ghattamaneni Krishna Passed Away : सुपरस्टार महेश बाबूला पितृशोक, वडिल कृष्णा घट्टामनेनी यांचं

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …