रतन टाटा यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिल्या यशाच्या १० Golden Advice

शाळा, कॉलेजमध्ये मुलांना पुस्तकी ज्ञान दिलं जातं. अनेकदा मुलं कॉलेजमधून बाहेर पडून कामाला लागली की, ते चिडचिड करतात, वैतागतात. कारण खऱ्या आयुष्यामधील गोष्टी मात्र वेगळ्याच असतात. यशाला समानार्थी दुसरा शब्द नाही असं रतन टाटा म्हणतात. रतन टाटा या वाक्याप्रमाणे जगणारे उत्तम उदाहरण आहे. रतन टाटा यांच्याकडे कायमच आदराने पाहिलं जातं. रतन टाटा ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या मेहनतीने मोठी उंची गाठली आहे. जगासमोर आजच्या तरूण पिढीसमोर मोठा आदर्श ठेवला आहे.

रतन टाटा यांच्या मार्गदर्शन तरूणाईला यशाचं शिखर गाठण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. पण या तरूणाईला सुजाण पालकांची साथ मिळाली तर यशाचा आनंद दुप्पटीने वाढेल, यात शंका नाही. अशावेळी रतन टाटा यांनी दिलेले १० सोनेरी आणि अतिशय महत्वाचे सल्ले आजच्या पिढीला आणि पालकांना महत्वाचे ठरतील. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​​आयुष्यात चढ-उतार महत्वाचे

जीवन जगत असताना चढ-उतार हा अतिशय महत्वाचा आहे. अगदी ECG मशिनमधील सरळ रेष देखील काहीतरी बिघडलं असल्याचं दर्शवते. त्यामुळे जीवनातील या चढ-उतारांना तुम्ही सहज हाताळणं शिकलं पाहिजे. गोष्टी तशाच राहत नाही. हे ही दिवस जातील असं म्हणत पुढे जाणं गरजेचे आहे. त्यामुळे रतन टाटा सांगतात प्रवाहासोबत चालत राहा.

हेही वाचा :  लक्षद्वीपसाठी उद्योगपती रतन टाटांकडून 'ही' खास भेट, केली मोठी घोषणा

या सगळ्यात पालक म्हणून तुम्ही मुलांसोबत राहा. मुलांचे चढ-उतार पालकांनी देखील अनुभवले तर दोघं मिळून ही परिस्थिती हाताळू शकता.

(वाचा – Madhuri Dixit ची पॅरेंटिंग स्टाइल सगळ्यात हटके, परदेशात राहूनही म्युझिक ते अगदी कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहेत मुलं))

​स्वतःला सिद्ध करा

स्वतःला पहिलं सिद्ध करा. जग तुम्हाला किंवा तुमच्या भावनांना समजून घेत बसणार नाही. अशावेळी तुम्ही पहिलं स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करणे म्हणजे स्वतःच कतृत्व सिद्ध करणे. आपण ज्या कामात आहात, त्यामध्ये टॉपला जा. अशावेळी पालकांनी मुलांना स्वतःला सिद्ध करणे म्हणजे काय हे समजावून सांगणे गरजेचे आहे.

(वाचा – वडील असूनही ते नसल्याचं भासवणं, त्यांच्याशी संपर्क न ठेवणं..श्रद्धा वालकर प्रकरणावरून पालकांनी काय शिकावं?))

​कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही

कोणतीच गोष्ट सहज आणि फुकट मिळतं नाही. शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या नोकरी मिळेलच असं नाही. कंपनीचा CEO हा गठ्ठा गाठणं सोपं नाही. एका रात्रीत चित्र बदलत नाही. यासाठी तुम्हाला अतिशय मेहनत घेऊन काम करावं लागेल. मुलांनी आणि पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

​तुमचे शिक्षक बॉसपेक्षा बरे आहेत

मुलांना शिक्षण घेत असताना शिक्षक हे अतिशय कठोर, शिस्तीचे वाटतात. पण थांबा, तुम्ही अजून तुमच्या बॉसला भेटला नाहीत. कारण तुम्ही अजून जगातील या व्यक्तीला भेटलेले नाहीत. बॉस हा वाईट नसतो. मात्र कायम तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती ही शिक्षक असते हे लक्षात ठेवा.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

हेही वाचा :  आमच्या मुलांना टार्गेट केले तर...; Starbucks च्या जाहिरातीवरुन थेट रतन टाटांना इशारा

​चुकांना कुणाला जबाबदार धरू नका

चूका या कायम तुमच्याच असतात. या चुकांना कुणाला जबाबदार धरू नका. कुणामुळे चूक झाली किंवा या चुकीला दुसरी व्यक्ती कारणीभूत आहे, असा विचार कधीच करू नका. तसेच या गोष्टीवर कधीच स्टिक राहू नका. पालकांनी देखील मुलांना या गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​पालक चुकीचे असल्याचा विचार टाळा

तुम्हाला पालक जर चुकीचे वाटत असतील तर तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करत आहात. पालक तुम्ही जन्माला येण्यापूर्वीही असेच होते. महत्वाचं म्हणजे पालकांनी तुमच्या संगोपनात प्रचंड मेहनत घेतली आहे, याची जाणीव मुलांनी ठेवावी.

(वाचा – तुम्हालाही आई म्हणून क्रांती रेडकर सारखा अनुभय आलाय? मुलं, आजी-आजोबा आणि त्यांचा गोंधळ…))

​जगात दुसरी संधी नसते

दुसरी संधी ही फक्त शाळेतच मिळते. आयुष्यात कधीच दुसरी संधी नसते. म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करा. जगातील नियम वेगळे आहे. प्रत्येकजण नंबर १ च्या माणसाला ओळखतात कारण दुसऱ्या व्यक्तीला कुणी ओळखत नाही.

(वाचा – चांगले पालक होण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा))

​जगाचं शिक्षण देणारा शिक्षक नसतो

खऱ्या आयुष्य वर्ग किंवा शिक्षक असा प्रकार नसतो. तुम्हालाच तुमच्या आयुष्यातून नव्याने शिकता आलं पाहिजे. रतन टाटा म्हणतात की, आयुष्यात लाँग व्हॅकेशन हा काही प्रकार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कृतीतूनच बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.

हेही वाचा :  या ५ आयुर्वेदिक भाज्यांमध्ये खच्चून भरलंय Protein,चिकन आणि अंड्याची गरजच भासणार नाही

(वाचा – मुलीचं नाव ठरवायला ऐश्वर्या आणि अभिषेकने लावले इतके दिवस, बच्चन कुटुंबियांपासूनही का लपवलं नाव?))

​आभासी जीवनातून बाहेर पडा

रतन टाटा म्हणतात की, आभासी जीवनातून बाहेर पडा. टीव्ही, मालिकांमध्ये दिसणारं जग हे आभासी आहे. खऱ्या आयुष्यात तुम्हाला फक्त काम आणि काम करायचं आहे. रतन टाटा यांनी दिलेल्या उदाहरणानुसार मोठ्या लक्झरी कार कंपन्या जश्या की, जागवार, बीएमडब्ल्यू या कंपन्या आपल्या जाहिरातील टीव्हीवर दाखवत नाहीत. कारण त्यांना माहित आहे की, या कार खरेदी करणाऱ्या व्यक्ती टीव्ही पाहत नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नसतो. म्हणून तुम्ही मेहनती व्हा.

(वाचा – कधीही आई न होऊ शकणाऱ्या Nita Ambani यांनी कसं अनुभवलं मातृत्व))

​कायम कृतज्ञ राहा

रतन दादा कायमच आपल्या वागणुकीतून ही गोष्ट आपल्याला शिकवत असतात. आपल्या कृतीतून आपण कायम कृतज्ञ राहायला पाहिजे. तुम्हाला मिळत असलेल्या प्रत्येक गोष्टीमागे कठोर मेहनत आहे. त्या व्यक्तींच्या मेहनतीसाठी कायम कृतज्ञ राहा.

(वाचा – अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला जुळ्या मुलांचा फोटो, बाळांच्या हटके नावांनी सगळ्यांच लक्ष वेधलं))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …