महेश भट्ट यांनी स्वत:च्याच मुलीला केलेलं Lip Kiss; पूजासोबत लग्न करण्याचीही होती इच्छा

Mahesh Bhatt Birthday Special: लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिचे वडील आणि बॉलिवूडचे लोकप्रिय फिल्ममेकर महेश भट्ट यांचा आज ७४ वाढदिवस आहे. फिल्ममेकर महेश भट्ट यांच्या आयुष्यात ज्याप्रमाणे यशस्वी चित्रपट आहेत, त्याचप्रमाणे असंख्य वादग्रस्त घटना आहेत. त्यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक कॉन्ट्रोव्हर्सीजमुळे चर्चेत आले आहे. मात्र एक घटना अशी घडली होती, ज्यामुळे त्यांचे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. महेश यांचा असा एक फोटो समोर आला होता ज्यामध्ये ते त्यांच्या मुलीला पूजा भट्ट (Mahesh Bhatt and Pooja Bhatt Kiss) हिला लिप किस करत होते. हा फोटो पाहून अनेकांचे डोळे विस्फारले होते. समाजात अश्लिलता पसरवण्याचे काम करत आहेत, वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासत आहेत असे आरोप त्यांच्यावर झालेले. हा फोटो खूप वर्षांपूर्वीचा असला तरी त्यावर चर्चा आजही होते. सोशल मीडियावर अनेकदा हा फोटो व्हायरलही होतो. आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित अत्यंत वादग्रस्त अशा घटना…

​लेकीसोबत लिप किसचा फोटो

ही गोष्ट आहे ८० च्या दशकातील. महेश आणि त्यांची पहिली पत्नी किरण भट्ट यांची दोन मुलं- पूजा आणि राहुल. पूजाने खूप कमी वयातच बॉलिवूड पदार्पण केलेले. पूजाने डेब्यू सिनेमा ‘डॅडी’मध्ये अनेक बोल्ड सीन केले होते, ज्याचे दिग्दर्शन स्वत: तिच्या वडिलांनी अर्थात महेश यांचे होते. यामुळे दोघांवरही खूप टीका झाली होती. त्यावेळी एका मॅगझिनसाठी दोघांनी फोटोशूटही केले होते, ज्यात त्यांनी लिप किस केलेले. मॅगझिनच्या फ्रंटपेजवर हा फोटो छापला होता आणि सर्वत्र गोंधळ उडाला.

​यानंतर त्या वक्तव्यामुळे महेश यांच्यावर झाली जोरदार टीका

लेकीसोबतच्या लिप किसच्या फोटोमुळे महेश यांच्यावर प्रेक्षक नाराज झालेले, पण त्या आगीत तेल ओतण्याचे काम त्यांच्या वक्तव्याने केले होते. त्यांनी असे म्हटलेले की, ‘जर पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते’. त्यांच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला गेला. मात्र जेव्हा या गोष्टीमुळे प्रेक्षकांची नाराजी वाढली तेव्हा त्यांनी असे स्पष्टीकरण दिले होते की, ते नैराश्याचा सामना करत होते, त्यामुळे त्यांच्या तोंडून असे वक्तव्य समोर आले. त्यांच्या मते त्यांना कळलं नाही नेमकं ते काय बोलत आहेत.

​परवीन बाबी यांच्यासोबत झाली अफेअरची चर्चा

दरम्यान हे पहिल्यांदा घडत नव्हतं की एखाद्या वादग्रस्त घटनेत महेश यांचं नाव समोर आलं आहे. किरण भट्ट यांच्याशी लग्न झालेलं असतानाही त्यांचे दोन जणींशी विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले होते. मीडिया रिपोर्टनुसार त्यांचे अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत (Parveen Babi and Mahesh Bhatt) अफेअर होते. असेही बोलले जाते की ते बराच काळ एकत्र राहत होते. मात्र परवीन नैराश्याची शिकार ठरल्या, त्यांच्या घरातच त्यांचा मृतदेह आढळला होता.

​सोनी राजदान यांच्याशी केलं दुसरं लग्न

त्यावेळी समोर आलेल्या वृत्तांनुसार परवीन बाबी यांच्या निधनानंतर ते पुन्हा एकदा किरण यांच्यासोबत राहू लागले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलियाची आई अर्थात सोनी राजदान आल्या. सोनी आणि महेश कालांतराने एकत्र राहू लागले. त्यांनी लग्नही केलं. या जोडीच्या दोन मुली- शाहीन भट्ट आणि आलिया भट्ट. आलियाने फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावले असले तरी शाहीन काहीशी लाइमलाइटपासून दूर आहे. ती दीर्घकाळ नैराश्यात होती.

​जिया खानसोबतचे फोटो व्हायरल

अभिनेत्री जिया खान हिने काही वर्षांपूर्वी आत्महत्या करून तिचं जीवन संपवलं. दरम्यान महेश आणि जिया यांचे काही फोटो समोर आले होते, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. नैराश्य, सुसाइ़ड, महेश आणि बॉलिवूड अभिनेत्री असे संबंध अनेकदा जोडले गेले. जिया आणि परवीन यांच्या दोघींच्या आत्महत्येनंतर या ना त्या कारणाने महेश यांचे नाव समोर आलेले. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतरही महेश यांच्यावर टीका झालेली. त्यावेळी चाहत्यांनी उचलून धरलेला नेपोटिझमचा मुद्दा भट्ट कुटुंबियांसाठी मोठा झटका देणारा ठरला होता.

​रियासोबतही व्हायरल झालेले फोटो

२०२० साली सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty and Mahesh Bhatt) हे नाव अनेकदा माध्यमं, सोशल मीडिया यावर दिसत होते. तिच्यासोबत महेश यांचेही नाव अनेकदा जोडले गेले. त्यांचे काही फोटो समोर आलेले ज्यात दोघांमध्ये जवळीक दिसत होती. यानंतर रिया आणि महेश त्यांच्या अफेअरचीही चर्चा झाली. सुशांतच्या मृत्यूसाठी रियाप्रमाणेच महेश यांनाही अनेकांनी जबाबदार धरले होते.

​कंगनानेही केली सडकून टीका

बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रणौत हिनेही महेश यांच्यावर अनेकदा तोंडसुख घेतले आहे. अलिकडेच तिनं असं म्हटलं होतं की महेश यांचं खरं नाव अस्लम आहे. अभिनेत्री कंगनाने अशी इन्स्टास्टोरी पोस्ट केली होती की, ‘महेश भट्ट यांचं खरं नाव आहे अस्लम. ते त्यांनी वापरावं. धर्मांतर केलेलं नाव कशाला वापरता? हे नाव सुंदर आहे. पुढे ती लिहिते. महेश भट्ट हिंसाचार घडवण्यासाठी लोकांना भडकवतायत.’ सोनी राजदान यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी धर्म बदलल्याचा आरोप कंगनाने केला होता.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …