अनिल यांना जॅकी श्रॉफ यांच्यामुळे वाटायचं असुरक्षित
करणनं विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना अनिल कपूरनं सांगितलं की,’या सगळ्या मुद्द्यांवर टीका करणाऱ्यांकडे मी दुर्लक्ष करतो आणि मी फक्त माझ्या कामावर लक्ष देतो.’ अनिल यांनी पुढं सांगितलं की,’जॅकी श्रॉफमुळे मला सुरुवातीच्या काळात खूप असुरक्षित वाटायचं. खरं ते बाहेरून इथं आले होते.’
हे वाचा-सिनेविश्वात चाललंय तरी काय? परदेशींना रोजगार; स्थानिक कर्मचारी मात्र बेरोजगार!
अनिल यांनी पुढं सांगितलं की, ‘जॅकी आउटसायडर होता तरी त्याला सुभाष घई यांनी लाँच केलं होतं आणि त्यानंतर तो लगेचच ए लिस्ट स्टार अभिनेता झाला होता. मी छोट्या-मोठ्या भूमिका करत होतो, दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मी काम करत होतो. तेव्हा मला काहीसे वाईट वाटले होते. तो बाहेरचा असूनही सुभाष घईंनी त्यांना लाँच केलं होतं. त्याबद्दल मी खूप विचार करायचो.’ यश चोप्रांनी अनिल यांना सिनेमा ऑफर केल्यानंतर त्यांना काहीसं बरं वाटल्याचं अनिल कपूर सांगतात.
जेव्हा करणने विचारलं की जॅकी यांच्या यशाबाबत तुम्हाला असुरक्षित वाटलं का, तेव्हा अनिल यांनी हो असं उत्तर दिलं होतं. ते असं म्हणाले की, ‘जॅकी खूप चांगला आहे. त्याची सही घेण्यासाठी यायचे तेव्हा ऑटोग्राफ बुक त्याच्याकडे आधी द्यायचे. पण तो ती बुक माझ्याकडे द्यायचा आणि म्हणायचा हे तुझ्यासाठी आहे. तो हे सगळे माझ्यासाठी करायचे परंतु मला माहिती होतं की हे जे चाहते आले आहेत ते माझ्यासाठी नाही त्याच्यासाठी आले आहेत.’
हे वाचा-दीपिकामुळे टायगरला रणवीर सिंगची वाटते असूया, कॉफी विथ करण ७ मध्ये खरं काय ते सांगून टाकलं
दरम्यान, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी टोटल धमाल, राम लखन, त्रिमूर्ती यांसारख्या अनेक सिनेमांत काम केलं आहे. अनिल यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं तर लवकरच ते नो एंट्रीचा सिक्वेलमध्ये दिसणार आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या