याशिवाय स्त्रियांमध्ये ओव्हेरियन, सर्व्हाइकल आणि व्हजायनल असे कॅन्सर आढळतात. कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो त्याची लक्षणे ओळखता येणे महत्त्वाचे आहे. चिंता करण्याची गोष्ट ही आहे की कॅन्सरची लक्षणे खूप उशिरा समजू लागतात. आणि जोवर निदान होते तोवर कॅन्सर मोठया प्रमाणात पसरलेला असतो. हे रोखायचे असेल आणि जीव धोक्यात घालायचा नसेल आणि कॅन्सरच्या उपचारावर जास्त पैसा खर्च करायचा नसेल तर कॅन्सरची लक्षणे वेळीच ओळखून उपचार सुरु करणे गरजेचे आहे. आज आपण जाणून घेऊया की स्त्रियांमधील मुख्य कॅन्सर प्रकार कोणते आणि त्यांची लक्षणे कोणती? (फोटो क्रेडिट्स: TOI)
हे आहेत मुख्य प्रकार
अनेकांचा समज असतो की कॅन्सर एकच असतो. पण असे नसते कॅन्सरचे अनेक प्रकार असतात आणि स्त्री व पुरुष यांच्यातील कॅन्सरचे प्रकार वेगवेगळे असतात. आपल्याकडे आज सुद्धा या प्राथमिक गोष्टीची जागरूकता नाही त्यामुळे बाकीच्या गोष्टी तर दूरच राहिल्या. हेच कारण आहे की ज्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणार कॅन्सरने मृत्यू होतात. स्त्रियांमध्ये कॅन्सरचे मुख्य पाच प्रकार आढळतात. ते म्हणजे –
- ओवेरियन कॅन्सर (Ovarian cancer)
- सर्व्हाइकल कॅन्सर (Cervical cancer)
- वोम्ब कॅन्सर (womb cancer)
- व्हजायनल कॅन्सर (Vaginal cancer)
- वल्व्हर कॅन्सर (Vulvar cancer)
- शेवटचा प्रकार जो कि फार दुर्लभ आहे तो म्हणजे फेलोपियन ट्यूब कॅन्सर होय. (fallopian tube cancer)
(वाचा :- 24 तासांत किती वेळा जेवणं दीर्घायुष्यासाठी गरजेचं आहे? म्हातारपणात जागेला खिळायचं नसेल तर ऐका डॉक्टरांचा सल्ला..)
ही लक्षणे दुर्लक्षित करू नका
वर आम्ही सांगितलेले कॅन्सरचे प्रकार आणि ते ज्या जागेवर वाढत आहेत त्यानुसार तुम्हाला प्रजनन प्रणालीशी निगडीत लक्षणे दिसून येऊ शकतात. यामध्ये पेल्विक वेदना, सूज किंवा पोटदुखी आणि सेक्सवेळी किंवा सेक्स झाल्यावर वेदना यांचा समावेश असू शकतो. याशिवाय तुम्हाला योनी मधून रक्तस्त्राव किंवा लघवीमधून रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. ही लक्षणे दुसऱ्या स्टेजची देखील असू शकतात. जननेंद्रिय आणि त्याच्या आसपास गाठ तयार होऊ शकते. अन्य सामान्य लक्षणांमध्ये योनीमध्ये खाज येणे किंवा सतत लघुशंकेला जाण्याची गरज वाटणे यांचा समावेश आहे.
(वाचा :- Fatty Liver Disease : झोपण्याशी संबंधित ही सवय वाढवते लिव्हर सडण्याचा धोका, ताबडतोब बदला नाहीतर होईल लिव्हर फेल)
डॉक्टरांना कधी दाखवावं?
जर तुम्हाला वरीलपैकी एक लक्षण जरी दिसून आले तरी अजिबात वेळ न गमावता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. जितक्या लवकर प्राथमिक निदान होईल तेवढ्या लवकर तुम्ही उपचार सुरू करू शकता. पण एवढे लक्षात घ्या की ही लक्षणे दिसली म्हणजे तुम्हाला कॅन्सर आहे असे नाही. ही लक्षणे दिसूनही निदानामध्ये कॅन्सर दिसणार नाही, पण अशावेळी डॉक्टर तुम्हाला त्या मागचे नेमके कारण सांगू शकतील. त्यामुळे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवा आणि जी समस्या असेल त्यावर उपचार सुरू करा.
(वाचा :- High BP side effects : एक पॉइंटही वाढला ब्लड प्रेशर तर वितळतील पूर्ण शरीरातील हाडे, स्टडीमध्ये धक्कादायक खुलासा)
कोणाला आहे कॅन्सरचा धोका अधिक?
वरीलपैकी कोणताही कॅन्सर हा कोणत्याही स्त्रीला होऊ शकतो. कोणत्याही स्त्रीचे वय जस जसे वाढत जाते तस तसे कॅन्सरचा धोका बळावू शकतो. जाणकारांच्या मते ओव्हेरियन कॅन्सर हा अधिकाधिक महिलांमध्ये आढळतो. खास करून 50 किंवा जास्त वयाच्या स्त्रियांना ओव्हेरियन कॅन्सर होतो. सर्व्हाइकल कॅन्सर हा 30 ते 45 वयाच्या महिलांमध्ये जास्त आढळतो. वल्व्हर कॅन्सर हा 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना होऊ शकतो.
(वाचा :- चालताना पायांवर ठेवा बारीक नजर, हे 1 लक्षण दिसलं तर समजून जा रक्ताच्या नसांत भरलंय घाणेरड भयंकर LDL कोलेस्ट्रॉल)
टेस्ट करणं का गरजेचं आहे
सर्व्हायकल कॅन्सर सामान्य आहे आणि नियमितपणे गर्भाशयाच्या मुखाची तपासणी केल्यास त्याच्या योग्य उपचारात मदत होऊ शकते. पॅप चाचणी (pap test) कॅन्सरचा शोध लावून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अर्थात सर्व्हायकल कॅन्सर टाळण्यासही मदत करते. कर्करोगाच्या अनेक प्रकारच्या चाचण्या आहेत आणि त्यांची चिन्हे आणि लक्षणांवर आधारित तुम्ही कोणती निवड करावी हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात.
(वाचा :- मराठमोळ्या मुलाने ही साधी ट्रिक वापरुन घटवले तब्बल 26 किलो वजन,दिसू लागला इतका हॅंडसम की बनला मर्चंट नेवी ऑफिसर)
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या