धर्मवीर हा सिनेमा झी टॉकीज वाहिनीवर २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पाहायाला मिळणार आहे. झी टॉकीज वर होणाऱ्या वर्ल्ड टेलीविजन प्रीमियरच्या निमित्ताने बोलताना क्षितिश म्हणाला, कपाळावरचा कुंकवाचा टिळा, केसाचा भांग पाडण्याची विशिष्ट पध्दत, पांढऱ्या रंगाचा शर्ट पँट हा पेहराव, बोलताना हाताची हालचाल, चालण्याची ढब हे सगळं निरीक्षणातून आत्मसात केलं. दिग्दर्शन टिमकडून काही इनपूट आलेच होते.
हेही वाचा – ‘धर्मवीर’ सिनेमा आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यांचा परस्पर संबंध होता का?; पाहा काय म्हणाला प्रसाद ओक
मेकअप आणि कॉश्च्युम आर्टिस्टनी एकनाथ शिंदे यांचा लुक देण्यात कुठेच कसर सोडली नव्हती. ते त्यांचच श्रेय आहे. पण पुढचा प्रवास मला एकट्याने करायचा होता हे मी मनावर बिंबवलं.
एकनाथ शिंदे समजून लोकांनी नमस्कार केला
लुक टेस्ट वेळचा किस्सा सांगताना क्षितीश म्हणाला, मी एकनाथ शिंदे यांचा लुक पूर्ण करून गाडीतून निघालो होतो. गाडी ठाण्यात आली. गाडीच्या काचा उघड्याच होत्या. तेव्हा जिथे सिग्नलला गाडी थांबेल किंवा ट्रॅफिकमध्ये गाडी स्लो होईल तेव्हा अनेक ठाणेकरांनी मला एकनाथ शिंदे समजून हात केला, नमस्कार केला, काही जणांनी शिंदे साहेब अशी हाक मारली. तिथे लुक म्हणून तर मी जिंकलो होतो आता पुढची जबाबदारी पार पाडायची हा निश्चय माझा ठाण्यातील त्याच छोट्या प्रवासात पक्का झाला.
क्षितीश दाते शिंदेच्या कुटुंबियांना भेटतो तेव्हा…
क्षितीश म्हणाला, एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली दादही मला या भूमिकेचं समाधान देणारी ठरली. एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी जेव्हा मला पाहिलं, मला भेटले तेव्हा मी त्यांना त्यांचा एकनाथच वाटलो. मुळशी पॅटर्न सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तीरेखेची, सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेक लोकांच्या मनात असलेल्या व्यक्तीमत्वाची भूमिका खरी वाटेल अशी साकारणं हे माझ्यातील अभिनेत्याला आव्हानात्मकच होतं. पण मी खूप मेहनत घेतली. एकही बारकावा निसटणार नाही यासाठी माझा प्रयत्न होता. एकनाथ शिंदे ही खरच माझ्यासाठी भूमिका नाही तर एका आस्तित्वात असलेल्या व्यक्तीचं आयुष्य जगण्याचा अनुभव होता जो माझ्यासाठी कायम अविस्मरणीय असा राहिल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या