चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले; रात्री उशिराच घटना

वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला.

रात्री उशिराच घटना

चंद्रपूर:चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत आहे. काल मंगळवारी रात्री या भागात वाघ फिरत होता. वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. त्या व्यक्तीची सायकल रस्त्यावर पडून आहे, गेट नंबर 13 ची घटना आहे. संबंधित कर्मचारी हा CTPS मधील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनी मध्ये काम करणारा होता. वन विभाग व वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. काही पूर्वी वीज केंद्रातून एका पाच वर्षीय मुलीला वाघाने उचलून नेले होते. तिचा मृतदेह मिळाला होता. त्यानंतर हिराई विश्राम गृह जवळ वाघाच्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतरची ही तिसरी घटना आहे.

Loksatta Telegram

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

हेही वाचा :  OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजूनही आम्ही…”

Web Title: Chandrapur power station tiger picked up the worker tiger attack worker akp



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …