क्रीडा

पाकिस्तानमधील पूरग्रस्तांसाठी बेन स्टोक्स मैदानात, कसोटी मालिकेपूर्वी मोठी घोषणा

PAK vs ENG: बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर कसोटी खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालाय. पाकिस्तान दौऱ्यात इंग्लंडचा संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. येत्या 1 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी बेन स्टोक्सनं ट्विटरद्वारे पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याची घोषणा केलीय. ज्यानंतर पाकिस्तान नव्हे तर संपूर्ण जगभरातून बेन स्टोक्सच्या निर्णयाचं कौतूक केलं जातंय.  पाकिस्तानविरुद्ध …

Read More »

शिवा सिंह आहे तरी कोण? ज्याच्या एका ओव्हरमध्ये ऋतुराजनं सात षटकार ठोकले

Maharashtra vs Uttar Pradesh, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) वादळी खेळीसमोर उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यातील 49 व्या षटकात ऋतुराजनं उत्तर प्रदेशचा गोलंदाज शिवा सिंहच्या (Shiva Singh) गोलंदाजीवर सात षटकार ठोकून इतिहास रचला. यासह उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंहच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झालीय. आतापर्यंत …

Read More »

आयपीएल ऑक्शनच्या तारिखेत बदल होणार का? फ्रँचायझींच्या विनंतीवर बोर्डाचं स्पष्टीकरण

IPL Mini Auction: आयपीएल 2023 ची (IPL 2023) तयारी जोरात सुरू आहे. सर्व फ्रँचायझींनी मिनि ऑक्शनपूर्वी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2023 साठी येत्या 23 डिसेंबर 2023 रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. परंतु, अनेक फ्रँचायझींनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तारिखेत बदल करण्याची विनंती केली होती. मात्र, बीसीसीआय आयपीलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोणताही बदल केलं जाणार नसल्याचं स्पष्ट …

Read More »

बीसीसीआयच्या नव्या निवड समितीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

BCCI New Selection Committee: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या नव्या निवड समितीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारिख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला आतापर्यंत एकूण 80 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात नवीन निवड संघाची घोषणा केली जाईल.  या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे उमेदवार लक्ष्मण शिवरामकृष्णनला हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. वरिष्ठ आणि …

Read More »

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विश्वविक्रम, गिनिज बुकमध्ये झाली नोंद

 Narendra Modi Stadium Ahmedabad: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने विश्वविक्रम केलाय. हा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. बीसीसीआय आणि जय शाह यांनी हा विश्वविक्रम झाल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. (BCCI Guinness World Record) आयपीएल फायनल सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी विश्वविक्रम केलाय. यासाठी याची नोंद गिनीज बुक …

Read More »

IND vs NZ: टीम इंडियाच्या नावावर आगळावेगळा विक्रम, प्रत्येक 25वा एकदिवसाय सामना रद्द

<p style="text-align: justify;"><strong>IND vs NZ 2nd ODI: &nbsp;</strong>पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द झालाय. जवळपास तेरा षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर पाऊस थांबलाच नाही. पंचाकडून &nbsp;सामना रद्द करण्यात आला. &nbsp;यासह टीम इंडियाच्या नावावर आगळावेगळा विक्रम झालाय. वन डे क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा ४२ वा सामना रद्द झालाय. हे इतर संघाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. टीम …

Read More »

प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या ‘काला चष्मा’ गाण्यावर धोनी-पांड्याचा जबरदस्त डान्स

Viral Video: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम लावला. धोनी भलंही भारतीय संघापासून दूर गेला असेल, पण भारतीय खेळाडू त्याच्यापासून दूर जाऊ शकले नाहीत. भारतीय खेळाडू अनेकदा धोनीला भेटतात. अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या टी-20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्यानं धोनीची भेट घेतली. त्यावेळी प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या गाला चष्मा गाण्यावर धोनी आणि हार्दिक पांड्यानं जबरदस्त डान्स केला, …

Read More »

…तर न्यूझीलंडचं मालिका जिंकणार; पावसानं टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं

IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात  हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) खेळला गेलेला दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाणेफेकीपूर्वीही पावसानं हजेरी लावली. परंतु, सामना वेळेत सुरू झाला. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दोन वेळा सामना थांबवण्यात आला. परंतु, हॅमिल्टन येथील पावसाचा अंदाज पाहता अखेर सामना रद्द करण्यात …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द; निर्णायक सामन्यात पावसाचा खोळंबा

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द (Abandoned) करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं (BCCI) ट्विटरद्वारे दिलीय. या सामन्यावर सुरुवातीपासूनच पावसाचं सावट होतं. ज्यामुळं नाणेफेकीलाही उशीर झाला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 12.5 षटकांत एक विकेट्स गमावून 89 धावा केल्या. मात्र, सततच्या पावसामुळं सामन्याला बराच उशीर झाला. अखेर हा सामना …

Read More »

अबूधाबीच्या टी-10 लीगमध्ये सुरेश रैनाची बॅट तळपली!

Abu Dhabi T10 League: भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनानं (Suresh Raina) 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यानंतर त्यानं देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएललाही अलविदा केला. सध्या तो अबूधाबीच्या टी-10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळत आहे. या लीगमधील नववा सामना डेक्कन ग्लॅडिएटर्स आणि न्यूयॉर्क स्ट्रायकर्स (Deccan Gladiators vs New York Strikers) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सुरेश रैना त्याच्या जुन्या अंदाजात …

Read More »

पुन्हा एकदा संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर, ट्विटरवर चाहते संतापले

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसानं हजेरी लावलीय. या सामन्यात भारताचा युवा विकेटकिपर आणि फंलदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) संघातून वगळण्यात आलं. त्याच्याऐवजी दीपक हुडाला संघात संधी देण्यात आलीय. ज्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त करत टीम इंडियाच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न चिन्ह …

Read More »

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाची एन्ट्री

IND vs NZ 2nd ODI: हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park) येथे सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामन्यात पावसानं एन्ट्री केलीय. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पावसाला सुरुवात झाली आणि सामना तूर्तास थांबवण्यात आलाय. भारतानं एकही विकेट्स न गमावता 22 …

Read More »

शार्दूल ठाकूर, दिपक चहरचं कमबॅक; न्यूझीलंडच्या संघातही एक बदल

IND vs NZ 2nd ODI: हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. न्यूझीलंडचा संघ विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल. तर, या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या …

Read More »

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND VS NZ 2nd ODI LIVE Updates: पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय युवा संघ (India vs New Zealand) दुसरा सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. तर, न्यूझीलंडच्या संघाचा हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार केन विल्यमसन देखील फॉर्ममध्ये आलाय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठं पाहायचा? A टू z माहिती

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज (27 नोव्हेंबर 2022) हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, मालिकेतील …

Read More »

IND vs NZ : पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी, दुसऱ्या सामन्यात बदल होणार?

<p style="text-align: justify;"><strong>IND vs NZ 2nd ODI:</strong> पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेईंग11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यजमान न्यूझीडंलने पहिल्या सामन्यात भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 306 धावांचा डोंगर उभा केला होता. न्यूझीलंडने हे आवाहान सात गडी राखून 48 व्या षटकात पूर्ण केले होतं. श्रेयस अय्यर (80), कर्णधार शिखर धवन …

Read More »

पहिल्या वन डेमध्ये न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय, काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं?

IND vs NZ : भारतीय संघाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. 307 धावाचं लक्ष्य देऊनही न्यूझीलंडने 47.1 षटकातंच केवळ 3 विकेट्स गमावून सामना जिंकला. या मोठ्या पराभवामुळे आगामी एकदिवसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) साठीची तयारीची भारताची सुरुवात खराब झाली आहे. तर या मोठ्या पराभवामागे काही खास कारणं आहेत, त्यातीस मुख्य …

Read More »

टॉम लेथमची तुफान फटकेबाजी, जोडीला केनची दमदार बॅटिंग, न्यूझीलंडचा 7 गडी राखून दमदार विजय

IND vs NZ, 1st ODI Highlights : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) हा पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे नुकताच पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत 307 धावांचं आव्हान केवळ 47.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण करत भारतावर 7 विकेट्सनी विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही किवींनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. …

Read More »

IND vs NZ : श्रेयस अय्यरचा न्यूझीलंडच्या भूमीवर खास विक्रम, एमएस धोनीला टाकलं मागे

IND vs NZ, 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने (Shryeas Iyer) न्यूझीलंडच्या भूमीवर एकदिवसीय सामन्यांमध्ये खास रेकॉर्ड नावावर केला आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 80 धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचं हे 13 वं अर्धशतक आहे. याशिवाय एकदिवसीय सामन्यांच्या शेवटच्या आठ डावांमध्ये त्याने सहा अर्धशतकं …

Read More »

धवन-गिलच्या अर्धशतकानंतर अय्यरची तडाखेबाज खेळी, भारताचं न्यूझीलंडसमोर 307 धावाचं आव्हान

Team India for IND vs NZ, 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने दमदार फलंदाजी करत 300 पार धावसंख्या नेली आहे. सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर …

Read More »