डायबिटीज झाला असेल तर सकाळी सकाळी दिसतात ही 7 भयंकर लक्षणं

मधुमेह (Diabetes) हा रक्तातील साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाशी संबंधित आजार आहे. याला सायलेंट किलर देखील म्हणतात, कारण मधुमेह हळूहळू जवळजवळ सर्व महत्वाच्या अवयवांना नष्ट किंवा खराब करण्याचे काम करतो. त्यात प्रामुख्याने हृदय, मेंदू, किडनी, यकृत, डोळे यांचा समावेश होतो. यासोबतच मधुमेहाचा परिणाम शरीराच्या प्रत्येक कार्यावर होतो. RSSDI चे अध्यक्ष, वरिष्ठ मधुमेह विशेषज्ञ डॉ. बीएम मक्कड सांगतात की, मधुमेहाचा धोका दर्शवणारे संकेत ओळखून मधुमेहाचा धोका वेळेआधीच टाळता येऊ शकतो. पण कधीकधी ही लक्षणे इतकी सूक्ष्म असतात की त्यांना शोधणे कठीण असते.

आपल्यापैकी अनेकांना हे देखील माहित नाही की आपले शरीर सकाळी सकाळी मधुमेह असल्यास अनेक सिग्नल देत असते, जे रक्तातील साखरेच्या पातळीत झालेल्या वाढीशी संबंधित असतात. चला जाणून घेऊया, मधुमेहाची ही लक्षणे कोणती आहेत.

तोंड कोरडे होणे

कोरडे तोंड हे सकाळी दिसणारे मधुमेहाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वारंवार कोरडे तोंड जाणवत असल्यास किंवा जास्त तहान लागल्यास, त्याचे कारण उच्च रक्तातील साखर असू शकते. अशा परिस्थितीत तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ही गोष्ट जाणवत असले तर अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या व काहीही गडबड असल्यास त्वरित उपचार सुरु करायला मागे पुढे पाहू नका.

हेही वाचा :  लेकिनं प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी आयुष्य संपवलं, जावयाच्या दारातच रचलं सरण

(वाचा :- Vicky Kaushal Weight Loss: बर्गर-पिझ्झा खाऊन वेटलॉस करणा-या विकी कौशलवर तुम्हीही जळाल, सिक्रेट वेटलॉस फंडा उघड)

मळमळणे

रोज सकाळी मळमळ होणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. पण यात अजून एक ट्रिकी गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा, मळमळ सामान्यपणे अशक्तपणामुळे होते. पण दरोरोज तुम्हाला सकाळी उठल्यावर मळमळल्यासारखे वाटत असेल तर मात्र हे मधुमेहाचे लक्षण असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांकडे त्वरित जाऊन उपचार घ्यावेत वा सर्वात आधी मधुमेहाचे निदान करून घ्यावे.

(वाचा :- Ayurveda Weight Loss: आयुर्वेद डॉ दावा – फक्त तीन आठवड्यांत जळून जाईल शरीरातील सर्व चरबी, फॉलो करा या 5 टिप्स)

धुसर दिसणे

मधुमेहाचा डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सकाळी स्पष्टपणे दिसण्यात अडचण येत असेल तर ते उच्च रक्तातील साखरेचे लक्षण असू शकते. डॉक्टर म्हणतात की मधुमेहामुळे लेन्स मोठी होऊ शकतात, ज्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते. अशा परिस्थितीत ही लक्षणे दिसताच रक्तातील साखरेची त्वरित तपासणी करून घेणे फायदेशीर ठरू शकते. दुर्लक्ष केल्यास त्यांचे मोठे परिणाम भोगावे लागू शकतात अन मधुमेहासारखा आजार आयुष्यभरासाठी वेताळासारखा चिकटून राहू शकतो.

(वाचा :- Weight Loss : अँटी-ऑबेसिटी गुणधर्मांनी ठासून भरलेत हे 5 कुकिंग ऑइल्स, जाळून टाकतात पोट, मांड्या व कंबरेची चरबी)

पाय सुन्न पडणे

रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो. अशा स्थितीत शरीराच्या काही भागात सुन्नपणा येऊ शकतो. डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे पाय आणि पायांमधील नसा सर्वात जास्त प्रभावित होतात. यामुळे मुंग्या येणे आणि वेदना होण्यापासून हात, पाय आणि पाय सुन्न होण्यापर्यंतची लक्षणे होऊ शकतात. जर तुम्हाला ही गोष्ट जाणवत असले तर अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या व काहीही गडबड असल्यास त्वरित उपचार सुरु करायला मागे पुढे पाहू नका.

हेही वाचा :  चालकाची 'ती' चूक जीवावर बेतली, पुलाचा कठडा तोडून ट्रक खाली कोसळला अन् पेट घेतला, समृद्धीवर भीषण अपघात

(वाचा :- Vitamin K Rich Foods : शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ नाहीतर)

थकवा

थकवा हे मधुमेहाचे सामान्य लक्षण आहे. इन्सुलिनचे कमी उत्पादन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे शरीर सुस्त होते. जरी थकवा ही एक सामान्य समस्या असली तरी ती जास्त कामामुळे, तणावामुळे उद्भवते. त्यामुळे लोकांना वाटते की ही एक मोठी समस्या नाही. पण इथेच आपण फसले जाते आणि दुर्लक्ष करतो. पण कधी कधी हे मधुमेहाचे लक्षण असू शकते आणि वेळीच ते नियंत्रणात ठेवले नाही तर मधुमेहाला शरीर बळी पडू शकते.

(वाचा :- स्टडीमध्ये खुलासा; घोरणा-या लोकांना आहे Cancer चा सर्वात जास्त धोका, या 5 घरगुती उपायांनी वेळीच कमी करा जोखिम)

हात थरथरणे

भूक लागणे, हात थरथरणे आणि घाम येणे ही मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे रक्तातील साखरेचे प्रमाण प्रति लिटर 4 मिलीमोल्स (mmol) पेक्षा कमी असल्यास उद्भवू शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये, तुम्हाला भ्रम होऊ शकतो लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचाराला सुरुवात करावी जेणेकरून वेळीच हा आजार रोखता येईल.

हेही वाचा :  डायबिटिज पेशंटला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची सर्वाधिक भीती, या ७ पद्धतीने शरीरातील साखर ठेवा नियंत्रित

(वाचा :- मॅच दरम्यान स्टार फुटबॉलरचं हृदय पडलं अचानक बंद, या भयंकर आजाराचं दिसत नाही एकही लक्षण, 6 गोष्टींपासून रहा दूर)

इरेक्टाइल डिस्फंक्शन

टाइप 2 मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या सामान्य आहे. वास्तविक, रक्तातील उच्च साखर नसा आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवण्याचे काम करते, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

(वाचा :- कॅन्सर, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधाने तडपवून मारतो सकाळ-सायंकाळ घेतला जाणारा हा पदार्थ, आजच बंद करा)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …