राजकारण

मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले…

Nashik Crime : दिवाळीत तुम्ही चमचमीत पदार्थ बनवत असाल तर सावधान…कारण तुम्ही वापरत असलेले मसाले भेसळयुक्त (colored chili powder) असण्याची शक्यता आहे. कारण मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून भेसळ करणाऱ्या मसाल्यांचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. गुलशन-ए-मदिना नावाच्या बंगल्यात SEA-MA मसाले प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीच्या कारखाना सुरू होता. या कारखान्यात रंगांचा वापर करून तिखट आणि …

Read More »

Weather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. दिवाळीच्या तयारीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या अनेकांनाच पावसानं सळो की पळो करून सोडलं. तिथं मराठवाड्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या कोकण पट्ट्यासह दक्षिण भागामध्येही पुढील दोन दिवस जोरदार पावसाची हजेरी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळू …

Read More »

Diwali 2023 : मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, तब्बल ‘इतके’ हजार सानुग्रह अनुदानाची घोषणा!

MMRDA employees grace grants : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी दिवाळीनिमित्त 42,350 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे केली. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यास मंजुरी देत असल्याचे परिपत्रक एमएमआरडीएचे (MMRDA) आयुक्त डॉ.संजय मुखर्जी …

Read More »

‘माझ्यासोबत चल’, प्रभादेवी स्थानकावर सर्वांसमोर महिलेशी छेडछाड; रेल्वेने दिलं उत्तर

मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकावर एका महिलेची छेड काढण्यात आली. स्थानकावर गर्दी असतानाच व्यक्तीने महिलेचा हात पकडला. पीडित महिला बेंचवर बसलेली असताना आरोपी तिच्या शेजारी बसला होता. यावेळी त्याने आक्षेपार्ह कमेंट्स करत तिचा हात ओढला. यानंतर त्याने तिला माझ्यासोबत चल असं म्हटलं. एका दक्ष नागरिकाने हा सगळा प्रकार एक्सवर शेअर केला आहे. यानंतर रेल्वेनेही या पोस्टवर उत्तर दिलं आहे.  आरोपीच्या या …

Read More »

काकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर… पुतण्याचं धक्कादायक कृत्य

Crime News : गेल्या काही वर्षात वाढत्या तंत्रज्ञानासोबत सायबर गुन्ह्यांमध्येही (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तंत्रज्ञानात साक्षर नसणाऱ्यांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. अशातच नाशकात पुतण्याने काकाचा मोबाईल हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकाला हा सगळा प्रकार कळल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात (Nashik Police) धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या …

Read More »

‘मराठा विरुद्ध OBC वरुन कॅबिनेटमध्ये गँगवार, एक-दोन मंत्री मार खातील’; शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचा टोला

Sanjay Raut On Maratha Aarakshan vs OBC Reservation: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य मंत्रिमंडळात गँगवॉर सुरु असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी हा दावा केला आहे. सध्या मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील विरुद्ध ओबीसी नेते असा शाब्दिक संघर्ष रंगल्याचं चित्र दिसत आहे. ओबीसी नेत्यांपैकी …

Read More »

मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, काचा फोडल्या; डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यानची घटना

Mumbai AC Local:  लोकल ही मुंबईची लाइफलाइन समजली जाते. सकाळी चाकरमान्यांची ऑफिसला जाण्याची गडबड असते. सकाळच्या गर्दीच्या वेळात एसी लोकलवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते डोंबिवलीदरम्यानची घटना असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घटना घडली आहे.  मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते सीएसएमटी एसी लोकलवर ही दगडफेक करण्यात आली आहे. सकाळी 8.33 च्या …

Read More »

‘आरक्षण मिळणार नाही असं वाटतंय’; विजेच्या तारांना स्पर्श करुन मराठा तरुणाने संपवलं जीवन

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) सध्या राज्यात आंदोलन पेटलं आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्याव या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केलं होतं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत सरकारने 24 डिसेंबरपर्यंत याबाबत तोडगा काढणार असल्याचे सांगितले आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. …

Read More »

मेट्रोची कामे तात्काळ बंद करा; बीएमसीने का दिला असा आदेश? वाचा…

Mumbai Metro 3: मुंबईत मेट्रो आणि उड्डाणपुलांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, आता मुंबई महानगरपालिकेने मेट्राच्या कंत्राटदाराला काही दिवस काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेकडून हे आदेश देण्यात आले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडली आहे. प्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसतोय. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून नियमावलीही राबवण्यात आली आहे. काही विकासक आणि …

Read More »

‘तुझं हेल्मेट कुठंय?’ भररस्त्यात महिलेचा पोलिसाला सवाल; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर…

Mumbai Police Viral Video: वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळणे सगळ्यांसाठी बंधनकारक असतात. दुचाकी चालवत असताना हेल्मेट आणि कार चालवत असताना सीटबेल्ट लावणं बंधनकारक आहे. अशावेळी जर आपल्याकडून नियम पाळले गेले नाही तर दंड आकारला जातो. वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात मग तो सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा अधिकारी. सोशल मीडियावर एसाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पोलीस कर्मचारी …

Read More »

कोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मुंबई आणि पुणे येथे प्रदूषणामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरतही दिवाळीपूर्वीच प्रदूषणामुळे श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे डॉक्टर सांगताय. श्वसन विकरांच्या रुग्णांना सामान्यांच्या तुलनेत धोकाही दुप्पट झालाय. दिवाळी आणि थंडी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे. मात्र वातावरणातील बदल, वाढणारी थंडी अशावेळी वाढणारे ओझोनचे प्रमाण, त्यात दिवाळीत फटाके व अन्य वायू प्रदूषण …

Read More »

गज कापून 4 कुख्यात कैदी जेल मधून पळाले; ड्युटीवर असलेल्या पोलिसांना कळालेच नाही

Sangmner Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चार कैदी जेलमधून फरार झाले आहेत. कारागृहाचे गज कापून या कैद्यांनी पलायन केले आहे. संगमनेरमधील कारागृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चार पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना कैदी पळाले आहेत. पोलीसांचा आरोपींना पळविण्यात पोलिसांचा सहभाग तर नाहही याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी उपकारागृहाचे गज तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना …

Read More »

नीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात खास बॅरेक; संजय राऊतांचा खुलासा, म्हणाले ‘टीव्ही, बाथरुम…’

आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी खास बॅरेक असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंय या बॅरेकमध्ये पंचतारांकित सुविधा देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. नीरव मोदीसाठी खास बॅरेक तयार करण्यात आलं असून त्यात टीव्ही आणि बाथरूमसह विविध सेवा देण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या दिवाळी अंकात ‘कसाबच्या यार्डात’ …

Read More »

दिवाळीत गावी जायचंय, पण तिकिट मिळेना; मध्य रेल्वेची मोठी घोषणा, मुंबई-पुण्यातून…

Cenral Railway Special Train For Diwali: दिवाळीत अनेकांना गावी जाण्याचे वेध लागतात. सण आपल्या माणसांसोबत साजरा करण्याची मज्जा वेगळीच असते. त्यामुळं दिवाळीच्या आधीच आपसूकच चाकरमान्यांचे पाय गावाकडे वळू लागतात. मात्र, अनेकदा गावी जाण्यासाठी ट्रेनचे तिकिट कॅन्सल होते किंवा आयत्यावेळी तिकिट मिळत नाही आणि सगळा हिरमोड होऊन जातो. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. प्रवाशांची गर्दी …

Read More »

Weather Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या ‘या’ भागात ढगाळ वातावरण तर, ‘इथं’ पावसाच्या सरी

Maharashtra Weather Update : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरीही सध्या त्याची अनुभूती मात्र राज्याच्या फार कमी भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मान्सूननं माघार घेतल्यानंतर राज्यात मुंबईसह (Mumbai Weather) कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये तापमानाच लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. हवेतील आर्द्रतेमुळं उष्णतेचा दाह आणखी जाणवू लागला. पण, विदर्भ मात्र याला अपवाद ठरला. कारण, इथं मात्र थंडीची चाहूल लागल्याचं स्पष्ट झालं.  हवामान विभागाच्या …

Read More »

भुजबळांना ओबीसी नेत्यांचं वाढतं समर्थन; जो OBC की बात करेगा, वही महाराष्ट्र में राज करेगा

Chhagan Bhujbal : मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याविरोधात ओबीसी नेते प्रचंड आक्रमक झालेत. सरसकट कुणबी दाखले देण्याविरोधात दिवाळीनंतर रस्त्यावर लढाई सुरू करण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय. त्याचबरोबर याविरोधात कोर्टातही जाण्याचा इशारा देण्यात आलाय.  सरसकट मराठा आरक्षणाला विरोध करण्यावरुन छगन भुजबळांविरोधात सर्वपक्षीय मराठा नेते एकवटलेले असताना..भुजबळांना ओबीसी नेत्यांचं समर्थन वाढलंय. राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आणि भुजबळांच्या भूमिकेचं …

Read More »

मराठा आरक्षणावरुन महायुतीतच महाभारत! भुजबळांना पक्षातूनही विरोध, शिंदे गटही आक्रमक

Chhagan Bhujbal on Maratha Reservation : सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करत, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसींनी रस्त्यावर उतरुन विरोध करावा, अशी निर्वाणीची भाषा छगन भुजबळांनी केली होती. भुजबळांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर जरांगे-पाटीलही आक्रमक झाले. त्यात आता महायुतीतल्या नेत्यांमध्येही वादावादी सुरु झाली आहे. छगन भुजबळांना अजित पवारांनी समज द्यावी अशी आक्रमक भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटाचे नेते …

Read More »

प्रदूषणाचा मुंबईतील ज्वेलर्सना फटका; सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित

देवेंद्र कोल्हटकर, झी मिडिया, मुंबई : मुंबईतील सी विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित करण्याची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. महानगरपालिका …

Read More »

पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस…

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: पुण्यामध्ये रक्षकच भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचं घर सोडून आलेल्या अल्पवयीन मला – मुलींना वासनेची शिकार बनवण्याचा धंदा पुणे स्टेशन परिसरामध्ये सुरू होता.  पुणे रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारा आरपीएफचा कर्मचारी आणि रेल्वेच्याच इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या एनजीओचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान या घटनेला एक महिना झाला तरी आरोपी सापडत …

Read More »

खार – गोरेगाव सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण; पण प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Local Train Update Today: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत जवळपास 2,500 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.  सोमवारपासून पश्चिम रेल्वेवरील गाड्या पूर्वपदावर आल्या …

Read More »