खार – गोरेगाव सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण; पण प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Local Train Update Today: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत जवळपास 2,500 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. 

सोमवारपासून पश्चिम रेल्वेवरील गाड्या पूर्वपदावर आल्या आहेत. तर, सहाव्या मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवासही जलद होणार आहे. याअतिरिक्त लाईनमुळं पश्चिम रेल्वेची क्षमता वाढून गर्दीचे विभाजन होणार आहे. या नवीन मार्गाची 112 किलोमीटर प्रतितास वेगाने यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईकरांचे जलद प्रवासाचे स्वप्न

पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातील खार ते गोरेगाव दरम्यान 8.8 किमीची मार्गिका उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी रेल्वेने सहा स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम पूर्ण केले त्याचबरोबर पाचव्या मार्गिकेवर आणि दोन्ही जलद मार्गिकेवर 12 टर्नआउट्स आणि तीन ट्रॅप पॉइंट नवीन सहाव्या मार्गिकेवर आठ टर्नआउट्स घालण्यात आले. शिवाय सध्याच्या नऊ टर्नआउट्समधून तीन ट्रॅप पॉईंट्स काढण्यात आले. 

हेही वाचा :  पश्चिम रेल्वेच्या 'या' निर्णयाने मुंबईकरांना मनस्ताप, मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई सेंट्रल ते बोरीवरीपर्यंत सहावी मार्गिका पूर्ण तयार झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवर 20 टक्क्यांपर्यंत लोकलची क्षमता वाढवण्यात येईल. लोकल ट्रेनच्या फेऱ्याही वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत सहाव्या मार्गिकेचे काम पश्चिम रेल्वेने हाती घेतले असून दहा किलोमीटरच्या या मार्गिकेचे काम 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर, एकीकडे बोरीवली ते विरारपर्यंत पाचवी व सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल विकास निगम (MRVC) करत आहेत. त्याचबरोबर, गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत हार्बर लाइनचा विस्तारदेखील करण्यात येत आहे. 

सहाव्या मार्गिकेचे काम कुठपर्यंत 

पहिला टप्पाः  खार ते गोरेगावपर्यंतचा ९ किमी पर्यंतची मार्गिका तयार आहे. 

दुसरा टप्पाः गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत 11 किमीचा दुसरा टप्प्याचे नियोजन करण्यात आले असून 2025 पर्यंत ही मार्गिका तयार होईल

तिसरा टप्पाः मुंबई सेंट्रल ते खारपर्यंत काम तिसऱ्या टप्प्यात केले जाईल मात्र त्याची तारीख अजून ठरवण्यात आली नाहीये. 

सहाव्या मार्गिकेच्या या प्रकल्पासाठी एकूण 918 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …