राजकारण

‘स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी….’ 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले, ‘असं असेल तर शिक्षेला तयार’

संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा ‘इंडिया आघाडी’ने दिला आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज एकूण 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. यासह निलंबित खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. ‘झी …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार

Maratha Reservation : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. आता कुणबी नोंदीसंदर्भातला न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सादर करण्यात आलाय. निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दुसरा आणि अखेरचा अहवाल सादर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिंदे समितीचे आभार मानले आहेत. या अहवालाबाबत पुढील कार्यवाही सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता मुख्यमंत्री आज सभागृहात हा अहवाल माडंणार आहेत. …

Read More »

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

Pune water closer on Thursday : येत्या गुरुवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद (Pune Water cut) असणार आहे. जल केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील जल केंद्रांच्या अखत्यारीतील पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी सोडता येणार नाही. शुक्रवारी सकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. पाणीपुरवठा बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना …

Read More »

‘परवाच्या दिवशी माझी बायको काय..’; दिशा सालियन प्रकरणाच्या आदित्य कनेक्शनवर राज ठाकरेंची कमेंट

Raj Thackeray About His Wife Comment Regarding Aditya Thackeray:  दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तपासासाठी विशेष पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना केली आहे. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरेंची चौकशी होणार आहे. मात्र आदित्य ठाकरेंवर या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात …

Read More »

धारावी प्रकल्पावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे! राज ठाकरे म्हणाले, ‘सेटलमेंट नीट होत नाही म्हणून..’

Raj Thackeray Questions Motive Of Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शनिवारी धारावी विकास प्रकल्पाविरोधात निघालेल्या मोर्चावरुन विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने काढण्यात आलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मोर्चाबद्दल राज यांना मुंबईमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज यांनी मोर्चा काढणाऱ्यांच्या हेतूवरच शंका घेतली आहे. …

Read More »

Shocking: घरभाडे फेडण्यासाठी दोन मित्रांसोबत केला पत्नीचा सौदा, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai News Today:  स्वतःचे घर नसल्याने आणि भाड्याने घर घेण्याइतकी रक्कम नसल्याने पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या पतीने व मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये ही घटना घडली आहे.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीनुसार सांगली पोलिसांनी सामूहिक बलात्कार, मारहाण आणि …

Read More »

‘…तर मी जाहीर आत्महत्या करणार’, बडगुजरांचा सरकारला इशारा

Sudhakar Badgujar: भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांनंतर सुधाकर बडगुजर यांना तातडीने नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलं होतं. त्यानंतर सुधाकर बडगुजर चौकशीसाठी नाशिक पोलीस ठाण्यातही दाखल झाले. दरम्यान बडगुजर यांनी यावर भाष्य करत सरकारला इशारा दिला आहे.  माझं डीड तपासायला एसीबीला 10 वर्षे का लागले? कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते? असा प्रश्न बडगुजर यांनी विचारला.  …

Read More »

‘अदानींकडे असं काय आहे की…’; ‘टाटां’चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

MNS Chief Raj Thackeray Slams Adani Group: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी मुंबई पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल बोलताना थेट अदानी समुहावर निशाणा साधताना अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. धारावीबद्दल राज ठाकरेंनी थेट अदानी समुहासंदर्भात उपस्थित केला प्रश्न मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी …

Read More »

पुण्यातील रिसॉर्टमध्ये बुडून 2 मुलांचा मृत्यू; पालकांना 1.99 कोटी देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

Pune News : कोची येथील एका ग्राहक हक्क समितीने पुण्यातील एका रिसॉर्टला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे आपले दोन मुल गमावलेल्या जोडप्याला 1.99 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातील या साहसी रिसॉर्टला कोची येथील ग्राहक हक्क समितीने सुरक्षेच्या उल्लंघनामुळे आपल्या दोन्ही मुलांना गमावलेल्या जोडप्याला 1.99 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. 25 ऑक्टोबर 2020 रोजी, रिसॉर्टमध्ये जोडप्याच्या दोन मुलांचा तलावात बुडून …

Read More »

‘केंद्रातील सरकारला शिव्या घालायच्या, मात्र…’; ‘शहाणपणानं वागावं’ म्हणत राऊतांचा ‘मनसे’ला टोला

Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut Slams Raj Thackeray MNS: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सूचक शब्दांमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला टोला लगावला आहे. पत्रकार परिषदेमध्ये सध्या मनसेकडून लोकसभेसाठीच्या निवडणुकीची तयारी आणि जागांसंदर्भातील चाचपणी सुरु आहे. याचाच संदर्भ घेऊन राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी राज्यात भूमिका बदलणारे …

Read More »

नशेत असताना अग्निशमन दलाला फोन केला, कारण ऐकून अधिकाऱ्याचे डोकंच फिरलं

Mumbai News Today: अग्निशमन दलाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 33 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे. वरळी येथील हा रहिवासी असून त्याने अग्निशमन दलाला फोन करुन खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दुपारी वरळी विभागातील अग्निशमन कक्षात भायखळा अग्निशमन कंट्रोल रुमकडून फोन आला. लोअर परळ आणि वरळी दरम्यान अशलेल्या …

Read More »

मुंबईकरांनो कबुतरांना दाणे टाकाल तर खबरदार, BMC आकारणार इतका दंड

Mumbai News: मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने कबुतरे आढळून येतात. मोठ्या चौका-चौकात कबुतरांचा वावर असतो. मात्र, कबुतरांमुळंच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढत असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळं कबुतरांचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. नागरिकांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगर पालिकेने उपाय काढला आहे. कबुतरांना दाणे टाकणाऱ्या नागरिकांवर मुंबई महानगरपालिका कारवाई करणार आहे. कबुतरांच्या विष्ठा आणि …

Read More »

सीएसएमटी कडे जाणारी लोकल… मध्य रेल्वेच्या स्टेशन वरील उद्घोषक कर्मचारीच अडचणीच्या फेऱ्यात

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई लोकल ही मुंबईची लाईफ लाईन मानली जाते. लाखो मुंबईकर रोज या लोकलने प्रवास करत असतात. मुंबईकरांचे जगणं हे लोकलवरच निर्भर आहे. मुंबई लोकल वेळेत नसेल तर मुंबईकरांचे सगळं गणितच बिघडून जातं. ही मुंबई लोकल सुरळीत ठेवण्यासाठी हजारो हात सतत कार्यरत असतात. मग दर रविवारी मेगाब्लॉक घेतल्यानंतर त्यावर काम करणारे ट्रॅकमॅन असतील किंवा रेल्वे …

Read More »

महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान नसलेले गाव; ग्रामस्थांकडे कोणताच पुरावा नाही

Nanded Local News :  नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्यातलं वाघदरी गाव. प्रांतवार रचनेनंतर अडीचशे लोकसंख्येचं हे गाव आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात आलं मात्र महाराष्ट्राच्या नकाशावर अजूनही गावाची नोंद नाही. नकाशावर नोंद नसल्यमुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  किनवट या गावाची महसुली नोंदच नसल्याने या गावात कुठल्याच सुविधा पोहोचल्या नाहीत. जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन असली तरी महसुली नोंद …

Read More »

पालक दिव्यांग, कुटुंबासाठी पार पाडले मुलाचे कर्तव्य; सोलार स्फोटात सहारे कुटुंबाचा आधार गेला

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (Solar Industries India Ltd) स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी 9.30 वाजता हा भयावह स्फोट झाला. सध्या मदत व बचाव कार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने मृतांना पाच लाखांची शासकीय मदत जाहीर केली …

Read More »

VIDEO: देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबईत; ट्रान्सहार्बर लिंकची पहिली झलक

Mumbai Trans Harbour Link Video: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. नव्या वर्षात या पुलावरुन नागरिकांना प्रवास करणे शक्य आहे. महत्त्वकांक्षी असलेल्या या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. 23 किमी लांबीच्या या प्रकल्पाची पहिली झलक आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.  शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गामुळं दोन …

Read More »

VIDEO: कबड्डी सामना सुरु असताना प्रेक्षकांसह कोसळली लोखंडी प्रेक्षक गॅलरी; अलिबागमध्ये मोठा अपघात

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : अलिबागमधून (Alibag News) अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. कबड्डी सामना (Kabaddi Match) सुरु असतानाच प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी बांधण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी अचानाक कोसळ्याने मोठा अपघाता झाला आहे. सामना पहात असलेले सर्वच जण अचानक प्रेक्षक गॅलरीसह कोसळ्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या अपघातामध्ये चारजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी …

Read More »

घुसखोरी दिल्लीच्या संसद भवनात; चौकशी कल्याणमध्ये

Parliament security breach :  संसदेमधील धुराच्या नळकांड्या प्रकरणानंतर कल्याणमधील दुकानांची झाडाझडती घेण्यात येत आहे. संसदेच्या अधिवेशनात करून रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन काही तरुण घुसले होते.मात्र या तरुणांनी या धुराचा नळकांड्या या कल्याण शहरातून खरेदी केल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये कसून चौकशी केली जात आहे.  या धुराचा नळकांड्या या कल्याण शहरातून खरेदी केल्याची चर्चा सुरू असताना  पोलिसांनी याची …

Read More »

महाराष्ट्रातील एक गाव जिथे दिवस फक्त 6-7 तासांचा असतो, स्वर्गाहूनही सुंदर आहे हे गाव

Fofsandi Village Ahmednagar: महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे सूर्योदय दोन ते अडीच तास उशीरा होतो आणि सूर्यास्त दोन-अडीज तास आधी होतो. या गावात दिवसच फक्त 6 ते 7 तासांचा असतो असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगात हे छोटंस गाव वसलं आहे. या गावाचे नाव आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.  सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगात हे वास वसलं आहे. फोफसंडी …

Read More »

ती दारुच्या नशेत आली, मला शिवीगाळ केली अन्…; तरुणीच्या अंगावर गाडी घालणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाने मांडली बाजू

Thane News Today: ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेत तरुणीचे नाव प्रिया सिंह असून तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रियकर अश्वजित गायकवाडविरोधात आरोप केले होते. मात्र, आता पोलिसांना दिलेल्या जबाबात अश्वजीत गायकवाड याने प्रियाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, प्रिया फक्त माझी मैत्रिण असल्याचे त्याने म्हटलं आहे.  अश्वजित गायकवाड …

Read More »